सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 4.माध्यमाच्या यशस्वी प्रदर्शनामुळे कोणतीही गोष्ट सुंदर असते.



4. Anything is beautiful which results from successful expolition of medium
        मानबुद्धी हे विकासाचे माध्यम आहे. बुद्धीला विकासाचे माध्यम बनवले पाहिजे. गीतेने म्हटले आहे बुद्धीयोगमुपास्रित मच्चित: सततं भव| माझी बुद्धी टिकली पाहिजे. म्हणून स्थितप्रज्ञाला महत्त्व आहे. आपली बुद्धी हालते, त्या बुद्धीला सांभाळा. कोणी घेऊन जाईल तिथे आपली बुद्धी जाते. आपण बुद्धी विकतो. पंडित बुद्धी विकतात. बुद्धीला सतत सांभाळले पाहिजे. त्याने विषय त्याग केला पण तिरस्काराने केला तर त्यात सौंदर्य नाही. चाळीस वर्षाचा झाल्यावर तो तत्वज्ञान सांगू लागतो की 'आम्ही तर ऋषी सारखे राहू इच्छितो'. त्याने विषय त्याग केला पण तिरसकाराने केला. विषय त्या विकासाचे माध्यम झाले पाहिजे विषयत्याग केला तो साधन बनवून केला पाहिजे. अमुक एका कार्याचे मी साधन, निमित्तमात्रं भव सव्यासचिन अशी साधन भक्ती गीतेने सांगितले आहे.
            एक व्हायोलिन वादक होता. त्याने व्हायोलिन वाजून पुष्कळ धन मिळवले होते. तो रात्री दुसऱ्या गावी जायला निघाला. चोरांना बातमी लागली आणि त्यांनी त्याला जंगलात लुटले. त्याचे व्हायोलिन पण हिसकावून घेतले. व्हायोलिन वादक रडू लागला. चोरांनी त्याला विचारले 'तु का रडतोस? तुला पाहिजे ते तू मागून घे' त्याने स्वतःचे व्हायोलिन परत मागितले. चोरांना नवल वाटले की, त्याने सोने न मागता व्हायोलिन का मागितले? चोरांनी त्याला व्हायोलिन दिले. तो खुश होऊन व्हायलीन वाजू लागला. चोर त्यात तल्लीन होऊन गेले. चोरारामध्ये देखील सज्जनता असते. त्यांनी त्याचे सर्व सोने परत देऊन टाकले आणि निघून गेले. व्हायोलिन वादकाने सोने  न मागता स्वतःचे साधन मागितले. त्याला वाटले की व्हायलीन मुळे माझ्या जीवनात संगीत आले तर दुसऱ्याच्या जीवनातही मी संगीत आणू शकेन. साधनाशिवाय सारे व्यर्थ आहे. जीवनात बुद्धी साधन आहे, ती सांभाळली पाहिजे माझी बुद्धी स्थिर राहिली पाहिजे. हा बुद्धरूपी माध्यमाचा सफल वापर आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन