अर्थप्रधानता - भौतिक गोष्टी यात सूख आहे का ?
अर्थप्रधानता
ऋषींना वित्ताची गरज नसते. त्यांच्या दृष्टीने वित्त खोटे ठरले आहे. त्यासाठी मेहनत करण्याची ऋषींना काय गरज आहे? समाजात अर्थप्रधानता आली की भेदभावामुळे समाज खलास होऊन जातो. नीती खलास होते आणि त्यामुळे मानवी जीवन खलास होते. आज सर्वांच्या डोक्यात एकच गडबड आहे. आम्ही धर्माची भाषा बोलतो पण डोक्यात अर्थप्राधानता बाळगतो. हे दोन्ही एकत्र कसे राहील? समाजात अर्थप्रचुरता असेल पण अर्थ प्रधानता असू नये. अर्थाची असक्ती सुद्धा असेल, आवश्यकता सुद्धा असेल पण अर्थ प्राधानता असलेली चालणार नाही. एकदा तुम्ही अर्थप्रधान त्याचा स्वीकार केला की मग दुसऱ्याला बोलणे व्यर्थ आहे. लोक लाच -लुचपतीच्या विरुद्ध ओरड करतात, काळ्या बाजाराला विरोध करतात. परंतु त्यांनी अर्थप्रधानतेचा स्वीकार केलेला असतो. तुम्ही मंदिरात जाता तेव्हा अर्थ मागता. अर्थप्रधानतेचा स्वीकार केल्यावर लाच घेणे आणि काळाबाजार करणे या आर्थिक सिद्धांत बनून जातात. अर्थाची आवश्यकता आहे पण अर्थ प्रधानता असता कामा नये.
दुसऱ्या पाशी कमी आहे ती वस्तू माझ्यापाशी असेल तर ही पैसा कमवायला चांगली संधी आहे. पैसा गोळा करणे हे जीवनातली मुख्य गोष्ट होऊन जाते. शासनही आर्थिक विकासाची भाषा बोलत असते. कोण जाणे आर्थिक विकासाशिवाय दुसरा कोणता विकास नाहीच मुळे आणि करायचा सुद्धा नाही. असे करणारे लोक लावतात बाबळ आणि त्यांना आंब्याचे फळ हवे असते. ते कसे मिळेल? पैसा कमावणे हीच जीवनातली मुख्य गोष्ट झाली की मग लाच घेणे, काळ्या बाजाराला उत्तेजन देणे वगैरे गोष्टी आर्थिक सिद्धांत बनून जातात. वाटेल त्या मार्गाने पैसा मिळवावा ही नीती बनून जाते. पैसा कमावण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी जी शक्ती खर्चावी लागते ती खर्चायची आणि तिलाच नीती मानायची. आज लोक त्याविरुद्ध ओरड करतात. पण त्यांनी जे पेरले आहे त्याचेच फळ मिळते आहे. त्यांनी ओरड करण्याची काही गरज नाही. ज्या खुर्चीवर बसून पैसा गोळा करू शकतो ती खुर्ची मिळवण्यासाठी सर्वच लोक प्रयत्न करणार. अर्थप्रधानता स्वीकारल्यावर त्याविरुद्ध ओरड करणे व्यर्थ आहे.
अर्थप्रधानता ही वेगळी गोष्ट आहे आणि अर्थकारण ही वेगळी गोष्ट आहे.श्रीसुक्तात अर्थकारणाचा स्वीकार आहे. अर्थ प्रधानता स्वीकारल्यावर सामाजिक आणि आर्थिक विषमता उभी राहणारच. ते टाळू शकत नाही. याचे कारण लोकांना अर्थच जीवनाचे सर्वस्व वाटते.
व्यापारी दुकानात बोर्डावर लितात की प्रामाणिकता आमची उत्तम पॉलिसी आहे. ते खरंच लिहितात. प्रामाणिकपणा हा त्यांच्या जीवनाचा सिद्धांत नाही, पॉलिसी आहे. सिद्धांत नाही बदलू शकत, पॉलिसी तर वाटेल तेव्हा बदलू शकते. एकदा का प्रामाणिकता पॉलिसी बनली की मग नीतिमत्ता, शिक्षण, मंदिर आणि भक्ती देखील त्यासाठीच. ते गरिबांना जरूर काही देतील पण ते स्वतःचे मोठेपण टिकावे एवढ्यासाठीच! याला काय समाजाचे धोरण म्हणायचे? गेल्या पिढीने तुमच्या डोक्यात धर्माचा कचरा भरला आहे, त्यामुळे धर्म आणि लोक दोघेही एकाच वेळी तीच गोष्ट बोलतात.
Comments
Post a Comment