भगवंता सोबत मानवी जीवन कसे असावे ?


      


भगवंत ज्याचे ध्यान करतो तो श्रेष्ठ. श्रेष्ठ म्हणजे सत्यं, शिवं, सुंदरम् जीवन असले पाहिजे. आपले जीवन भगवंताला सुंदर वाटले पाहिजे. जो भगवंताला चांगला वाटतो त्याचे जीवन अंतिम, उच्च स्थितीवर आहे. त्याचे आपण पाय धरतो. त्याला श्रीफळ अर्पण करतो. सुंदर बनायचे असेल तर जीवनाकडे बघण्याची दृष्टी सौंदर्यवादी झाली पाहिजे. सौंदर्याची व्याख्या करता येऊ शकत नाही. जीवन सुंदर बनवायचे आहे. भगवंताला चांगले आवडेल असे बनायचे आहे. आदर्श सौंदर्यात साधेपणा आणि शांती असली पाहिजे. (The ideal of beauty is simplicity and tranquility).
    काही लोकांच्या जीवनात अस्वस्थता दिसत नाही तसाच उतावळेपणाही दिसत नाही. गटे म्हणतो की स्वतःच्या नैसर्गिक विकासाचा उत्कर्ष झाला की वस्तू किंवा व्यक्ती सुंदर वाटते. तेव्हा जीवन सुंदर वाटते. वसिष्ठ, याज्ञवल्क्यांचे जीवन सुंदर वाटते.
    सौंदर्य म्हणजे सत्य आणि असत्य यांची संध्यावस्था. अर्थात सौंदर्य म्हणजे प्रकाशही नाही आणि अंधार देखील नाही. सौंदर्य म्हणजे भगवंता सारखे प्रकाशमान जीवन नाही. आणि क्षुद्र शंकररावा सारखे अंधकारमय जीवनही नाही. सौंदर्यवंत भगवान पण नाही आणि माणूस पण नाही. त्याचे जीवन प्रभू सारखे अपरिवर्तनीय जीवन नाही. भगवंताला आपण अंतिम सत्य म्हणू, पण ह्याचे जीवन अंतिम सत्य नाही तसेच सृष्टी सारखे क्षणिकही नाही. असे ज्याचे जीवन आहे तो सुंदर आहे. तेजस्वी आहे. तो वृत्तीने सुंदर, बुद्धीने सुंदर, ज्ञानाने सुंदर, भक्तीने सुंदर असतो. प्राचीन ऋषींचे जाऊद्या, परंतु निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम.. यांचे जीवन खलास झाले? सॉक्रेटिसचे जीवन खलास झाले? सॉक्रेटिसला मरणाधीन म्हणणारे कित्येक लोक आले आणि गेले. कित्येक राजसत्ता येऊन गेल्या पण सॉक्रेटिस आजही उभा आहे. भारत भूमीवर किती राज्य आले आणि गेले पण राहिले कोण? वाल्मिकी सारखे. त्यांची रामरक्षा आजही आपण वाचतो. 
  त्यांची वृत्ती सुंदर, बुद्धी सुंदर, ते ज्ञानाने सुंदर आणि त्यांची भक्ती ही सुंदर. बुद्धीच्या सौंदर्य ही निराळी गोष्ट आहे. ज्यांच्या ज्ञानात सुंदरता आहे ते बोलायला लागले की आपल्याला ऐकत राहावेसे वाटते. ते कदाचित आपल्याला मान्य असेल किंवा नसेलही तरी ऐकण्याची इच्छा होते.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन