भगवंताचे धरतीवर येण्याचे नियोजन
भगवंत येण्याचे प्रयोजन
तथाकथित ईश्वरवादी म्लान आणि आकर्मण्य बनले आहेत आणि म्हणून बोलतात की सर्व ईश्वराच्या इच्छेने चालले आहे. भगवंताच्या इच्छेनेच जग असे झाले आहे. भगवंताचीच अशी इच्छा आहे म्हणून सारे बिघडले आहेत, कलियुग आले ते भगवंताच्या इच्छामुळेच. भगवान इथे येईल आणि सगळे सुधारेल. ते म्हणतात की, 'तुमची स्वाध्याय प्रवृत्ती ईश्वर विरोधी आहे तुम्ही सर्व लोकांना चांगले करायला निघाला आहात .तुम्ही स्वाध्याय प्रवृत्ती करून भगवंताला येण्यापासून रोखत आहात .'त्यांना काही विचारच करायचा नाही. ते काही अभ्यासच करत नाहीत. अशा लोकांना सांगितले पाहिजे की तुम्ही मूर्ख आहात. तुम्ही काही वाचले नाही. सगळे बिघडले की मग भगवान् येईल ही खोटी मान्यता आहे. सगळ्या बिघडल्यांना भगवान मासे बनवून समुद्रात सोडून देऊ शकतो आणि माशांना माणसे बनवू शकतो. त्यासाठी त्याला जगात येण्याची जरूर नाही. भगवंताने गीतेत सांगितले आहे: परित्राणाय साधूनाम्... सज्जन लोक, सात्विक लोक, भगवंत प्रिय लोक रात्रंदिवस भगवंताचे काम करतात.
त्यांना पाठबळ देण्यासाठी भगवंत येतो.
अशा लोकांना मार्गदर्शन देण्यासाठी भगवंत येतो.
त्यांना आश्वासन देण्यासाठी भगवंत येतो, त्यांना पाहण्यासाठी तो येतो. प्रभूचे येणे या लोकांवरच्या प्रेमामुळे असते, दुष्टांच्या व्देषामुळे नसते.
Comments
Post a Comment