सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 5. कोणतीही गोष्ट सुंदर असते जी अलौकिक बुद्धिमत्तेचे काम असते.




5. Anything is beautiful which is the work of genius.
      महापुरुषांची प्रत्येक क्रिया- बघणे, हसणे, बोलणे वगैरे प्रसादिक बनून जाते. प्रसादस्तू प्रसन्नता| त्यांना बघून प्रसन्नता येते. सर्व महापुरुषांना या स्थितीचा अनुभव समानच आहे. कारण भगवंताकडून त्यांना परत मिळालेले मन आणि बुद्धि प्रसादिक असते. हे महापुरुष बिना तिकिटाचे प्रवासी आहेत. त्यांचे स्वतःचे कोणतेही खाते नसते. त्यांची कुंडली बनवणे व्यर्थ आहे. वशिष्ठांची कुंडली काय कामाची? ते वैश्विक गरज म्हणून आलेले असतात. वैश्विक गरज म्हणून भगवान त्यांच्यासारख्यांना पाठवतो. ते भगवंताची सुंदर कृती आहे. आपण वासनेने जन्म घेतो. आपला कचरा आपल्याबरोबर असतो. आपण परोपजीवी नाही. आपण स्वावलंबी आहोत. आपण आपली कर्मे आणि नशीब घेऊन आलो आहोत. मागील जन्मात कर्म केली होती. ती खलास झाली. 
        या महापुरुषांना मागावे लागत नाही. त्यांना भगवंत पाठवून देतो. महापुरुषांची बुद्धी बदलून जाते. एक अशी समाधीची स्थिती येते की त्यांची बुद्धी बदलून जाते. त्यांचे मन बदलून जाते. त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. महाराष्ट्राचे महान संत म्हणतात 'मीच मज व्यालो पोटी आपूल्या झालो| हा त्यांचा या जन्मातला दुसरा जन्म होय.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन