Posts

Showing posts from January, 2025

Life and Skills | जीवन कौशल्ये

Image
कलाकौशल्य कमी असतील तरी एकवेळ चालेल पण जीवन जगण्याची कला मुलाला साधलीच पाहिजे. भले तो अर्धी भाकरी मिळवेल, पण खुमारीत जगण्याची ताकद त्याच्या अंतःकरणात असली पाहिजे. याचं शिक्षण सर्वात प्रथम त्याला दिलं पाहिजे. आधी त्याचं मन तयार करा, त्याची वृत्ती तयार करा. मुलाला एक वेळ लिहिता - वाचता येत नसेल तर ते नंतरही पाहून घेता येईल; मुलात एखादी skills - त्याला कमी असेल तरी हरकत नाही, पण आधी त्याची जीवन वृत्ती तयार करा. वृत्तीवर्तन जीवने ही महत्त्वाची गोष्ट आहे. नचिकता म्हणतो आहे की, 'बाबा! अनुपश्य यथा पूर्वे आपले पूर्वज अटीतटीच्या प्रसंगांना कसे सामोरे गेले त्याचा तुम्ही विचार करा. तसंच प्रतिपश्य तथापरे - सध्याचे जे कोणते सद् पुरुष आहेत त्यांचे जीवन ध्यानात घ्या. म्हणजे तुमची शोकाविष्ठता कमी होईल. तुम्ही मला यम राजाला दिला आहे तर आता मला यम राजाकडे जाऊ द्या. त्यात कसला शोक करायचा?'     अशी ध्येयनिष्ठा आपल्या देशातल्या पूर्वजांनी दाखवलेली आहे. राजा हरिश्चंद्र ने स्वप्नात दिलेले वचन पाळण्यासाठी आपल्या राज्यावर पाणी सोडलं. तेव्हा तारामती किंवा रोहिदासांनी अशी तक्रार नाही केली की...

History and Culture Real life | इतिहास आणि संस्कृती वास्तविक जीवन

Image
     जीवनात माणसाने नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवावी की, आपल्या पूर्वजांची संस्कृती काय होती? परंपरा काय होती? ज्यांना संस्कृतीच नाही त्यांनी आजचा आणि आत्ताचाच विचार केला तर ते बरोबर आहे. पण ज्यांना दहा-दहा हजार वर्षाची प्राचीन संस्कृती आहे त्यांनी तरी आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा विचार केला पाहिजे. ती जाणून घेतली पाहिजे. या परंपरेच शिक्षण म्हणजेच इतिहास. आमक्या साली, आमक्या आमक्या ठिकाणी काय घडलं हे जाणून घेतलं म्हणजे इतिहास पुरा नाही होत. इतिहास म्हणजे परंपरा समजून घेणे. परंपरा टिकवते वेळी आपल्या पूर्वजांनी काय काय मेहनत केली हे जाणून घेतलं पाहिजे. त्या आपल्या पूर्वजांच्या मेहनतीशी तद्रूप होण, तदाकार होण हे सगळं इतिहासात येऊन जातं.        इतिहास हा फार महत्त्वाचा विषय आहे, कारण की त्याच्या मधून माणसाची वृत्ती तयार होते, जीवन निष्ठा निर्माण होते, जीवनदृष्टी मिळते, मनाचा खंबीरपणा तयार होतो आणि या सगळ्या गोष्टी जीवनात अत्यंत आवश्यक आहेत. त्या जर नसतील तर जसं हाडा शिवायचं शरीर अगदीच लोळा गोळा होऊन जाईल तसं माणसाचं जीवन बनून राहील. अनुपश्च यथा ...

The True Value of Culture and Life Values | संस्कार आणि जीवनमूल्यांची योग्य किंमत

Image
    सत्कुले योजयेत् कन्यां पुत्रं विद्याषु योजयेत् | व्यसने योजयेत् शत्रूं इष्टं धर्में नियोजयेत्||       सगळं अगदी पद्धतशीर लिखाण आहे आपल्या शास्त्रात. मुलीला कुठल्या घरात द्याल? पै - पैसा कमी असला तरी हरकत नाही. पण मुलीला सत्कुळात द्या. सत्कुले योजयेत् कन्याम्| सत्कुळ आणि चांगली बुद्धी असणाऱ्याला मुलगी द्या. चांगली बुद्धी असेल अशाच मुलाला कन्यादान करा. तसेच मुलाला काय द्याल? ज्ञान टिकवण्यासाठी आपलं शास्त्र सांगते, मुलाला सद्विद्या द्या, सद्विचार द्या. ज्या विद्याने मुलगा ताठ मानेने जगू शकेल, ज्या विद्याने सुखी भाकरी खात असला तरी ती तत्त्वज्ञानात बुडवून खात असल्याने त्याचे गाल टोमॅटो सारखे लाल राहतील, अशी विद्या त्याला द्या. अशी विद्या आणि विचारधारा देण्याचे काम बापाचे आहे. जो बाप मुलाला उपनिषदाची संगत मिळून देत नाही तो बाप आपलं कर्तव्य करत नाही. उपनयन म्हणजे गीता आणि उपनिषद यांच्या पाशी मुलाला घेऊन जाणं. गीता आणि उपनिषद यांचा अभ्यास करण्यासाठी मुलगा आपण होऊन जायचा नाही. त्याला घेऊन जावं लागतं. जो बाप मुलाला तिथे घेऊन जात नाही तो गुन्हेगार आहे,...

Importance of Geeta | गीतेचे महत्व

Image
            तव मुरली मोहन गीत |निर्जीवा करी जिवंत|  ज्याच्या जीवनातून प्राण गेलाय, का जगावं हे ज्याला कळत नाही, त्याच्यासाठी गीता अमृत आहे. कारण विपत्तीने वेढलेला असा जो माणूस आहे त्याला जिवंत करण्याची ताकद या गीतेच्या विचारांमध्ये आहे. गीतेत ही शक्ती आहे.  तव मुरली मोहन गीत| निर्जीवा करी जीवंत| षंढास समरर्पंडित| रणधीर रिपुसी भयभीत| अबलांस करी बलशाली, हरि वाजिव गीतामुरली|  गीतेमुळे अबला सबला होणार आहेत. हे कोणतं बल? एम. ए. झाल्याचं बळ? शारीरिक बळ? बौद्धिक बळ? अहो स्रीकडे बुद्धिबळ आहेच. मुलं आणि मुली एकत्र शिकायला लागल्यानंतर मुली पुढे जात आहेत आणि मुलं पाठी राहताहेत. मग स्त्री जवळ आणखी कोणती शक्ती आहे? प्रेम करण्याची  स्रीजवळ शक्ती आहे. अबलांचं बळ प्रेम आहे, प्रेम करणं आहे. पण प्रेम करायला सुद्धा शिक्षण पाहिजे. शेजारणीच्या मुलाचा शेंबूड साफ केला तर ती आल्यावर आपण एवढं तरी म्हणतोच, 'अगं तुझा मुलगा जात होता पण शेंबूड दिसला म्हणून मी साफ केला.' मग शेजारीण म्हणते, 'हो का? बर केलं बाई!' म्हणजे तिच्याकडून मला काहीतरी हवय म्हणून मी ...

It is a journey of spiritual and human consciousness.

Image
त्याचप्रमाणे तीर्थयात्रा म्हणजे काय? याचा विचार कर. पूर्वी येथून कच्छला जायला फार त्रास होत होता. तीन - तीन दिवस लागायचे. मी तसाही प्रवास पाहिला आहे. त्यामुळे प्रत्येकाला जाता येणे शक्य नसायचं. आता तसं काहीच राहिलं नाही. पूर्वी या कच्छी लोकांना मी विचारायचो बाबारे तू आपल्या गावी जातोस तेव्हा तुझ्या गावातल्या शेजाऱ्याला देखील भेटतोच ना; तू इथे मुंबईत गिरगावात राहत असलास आणि त्याचा मुलगा चिंचपोकलीला राहत असला तरी गावी जाताना त्या मुलाला भेटून येतोस आणि गावी गेल्या गेल्या त्याच्या वडिलांना भेटून सांगतोस, 'तुमचा मुलगा बरा आहे, सगळं आनंदात चालल आहे त्याचं! त्याला विचारलं, वडिलांना पत्र - बित्र लिहितोस की नाही? तो म्हणाला, 'नाही' तेव्हा त्याला सांगून आलो, पत्र लिहीत जा रे!' तशीच आहे तीर्थयात्रा! देवाला सांगायचं आपण की, देवा! मी पाचशे लोकांना भेटून आलो आहे. अहो, आपल्या मुलाची ख्यालीखुशाली घेऊन येणाऱ्या माणसाला बाप कमीत कमी चहा शिरा तर देणारच! तसेच तुम्ही जर देवाच्या लेकरांची ख्याली खुशाली विचारून आला तर देव का नाही काही देईल की नाही! अशा तीर्थयात्रेचा जिर्णोद्धार स...

Science and Spirituality | विज्ञान आणि अध्यात्म

Image
         लोकांस कळेना वर्म| मानिती अधर्मा धर्म| देव मानतो ना! बस! आगतिक माणूस दुसरं करेल काय? देवाला मानल्याशिवाय गत्यंतरच नाही म्हणून मानतो. पण अधर्मालाच धर्म मानतो. धर्म कोणता आणि अधर्म कोणता हे फक्त गीताच सांगू शकते. ही हिंमत कुठल्याही तत्वज्ञानात नाही. थोरो मी वाचलाय. पण गीतेनेच सांगितलं आहे की,  अधर्म धर्ममिती या मन्यते तमासावृत्ता| सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धी: सा पार्थ तामसी||  तामसी बुद्धीची माणसं अधर्मालाच धर्म समजतात. म्हणून धर्माला ग्लानी आली आहे. लोकांस कळेना वर्म| मानिती अधर्मा धर्म| एकादशी म्हणजे काय? सुरण खाल्ला, भगर' साबुदाण्याची खिचडी खाल्ली की पुण्य मिळालं, म्हणजे झाली एकादशी! अर्थात मी याच्या विरुद्ध नाही हा! पण ही ऋषींची कल्पना नव्हती, असणं शक्यच नाही. इतके ऋषी निर्बुद्ध नव्हते. आपण एकादशी करतो म्हणजे उपवास करतो बस! खलास! दुसर काही नाही! अरे एक दिवस देवाला दे तुम्ही म्हणाल नाही पण आमचा व्यापार धंदा चालू आहे मग काय करायचं मग आपला त्या एक दिवसाचे उत्पन्न देवाला दे! त्या दिवशी तू तुझ्यासाठी नाहीस! देवाचा   प्रतिन...

People couldn't understand the secret/essence | लोकांस कळेना वर्म

Image
          कवी सांगतो, लोकांस कळेना वर्म -  आम्हाला मनुष्य जीवन का दिल देवाने? त्यातलं वर्म काय? आम्ही तर पशु सारखे राहतो. एखादा मला विचारील, 'काय सांगता? आम्ही तर दोन पायाने चालतो आणि तुम्ही आम्हाला पशुसारखे म्हणतात! तुम्ही बुवा फार कडू बोलता!' अरे! तू दोन पायाने चालतोस म्हणून जर तू मनुष्य असलास तर कावळा देखील दोन पायानीच चालतो. मग माणूस आहे का तो? तेव्हा मला मनुष्यजन्म का मिळाला आहे? देवाला ओळखता यावं म्हणून मला मनुष्य जन्म मिळाला आहे. त्याला ओळखण कठीण असलं तरी हा मान मला मिळाला आहे. त्याच ऐकशील म्हणून मिळाला आहे. रेल्वेत पूर्वी तीन क्लास असायचे - फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि थर्ड क्लास. त्यात कुठे जरी बसला माणूस तरी मुक्कामी पोहोचून जायचा‌. पण आपलं तर तिकीटच नाही. लोकास कळेना वर्म| मनुष्य जन्म का मिळाला आहे? खा, प्या आणि रहा. नोकरी करा. बस्! हाच का माणसाचा जन्म?       आपल्या गुजरातच्या - सौराष्ट्रमधल्या स्वाध्यायींना माहित असेल. तिथल्या जंगलातही स्वाध्याय चालतो. रात्री सिंह आवाज करतो आहे आणि आपले लोक स्वाध्याय करत आहेत. मी एकदा...

Air is pleasant | वायू रमणीय आहे

Image
                                                         भगवंताचा स्पर्श प्रेमाचा आहे, आत्मियतेचा आहे. 'बाळ मी तुझा झालो आहे' असा भगवंताचा संदेश घेऊन रोज वायू निघतो. म्हणून खरा रमणीय जर कोणी असेल तर तो वायू होय. तदेव रूपं रमणीयम् असं आमचे पंडितही सांगतात. तो क्षणोक्षणी नवा वाटतो, रोजच्या रोज नवा वाटतो. रमनियता म्हणजे काय? जो क्षणोक्षणी नवनवीन वाटतो तदेव रूपं रमणीय असा रमणीय वायू आत्मियतेचा स्पर्श, अज्ञातेचा संदेश घेऊन येतो की ज्यात भगवंत म्हणत असतो, 'मी तुझा आहे!'      भगवंता! तू फक्त माझा कसा असेल? शेकडो लोकांना तू सांभाळतोस. मला एकट्यालाच थोडा सांभाळतोस. पण भगवंत म्हणत असेल, 'अरे तुला काय माहिती!' एखादा शेठजी आपल्या घरवालीला जेव्हा सांगतो की, मी दहा माणसं पोहोचतोय.' यावर जर ती म्हणाली, 'अहो कशासाठी पण?' तर हा सांगतो आग, वेडे, तुझ्यासाठी! तुझ्यासाठी त्यांना पोहोचतोय. तुला उपयोगाला यावेत यासाठी. आज उपयोगी नाही आले तर उद्या...

Bharata tari ya kaali, kaali hari vajiva Geetamurali | भारता तारि या काळी, काळी हरि वाजिव गीतामुरली

Image
शोध लागल्यानंतर माणसाने त्यावर अधिक काम केलं. त्या लोकांच्या कामाला मी कमी लेखत नाही. पण हे 'देवदत्त' आहे. देवानी दिलेलं आहे. आता ही इलेक्ट्रिसिटी देवांनी दिली आहे ती माणसाचं जीवन सुखी व्हावे म्हणून दिली आहे. मात्र यात तुम्ही मात्र भौतिक जीवन बघायला लागलेत. आता या इलेक्ट्रिसिटीत, या पंख्यात ही ताकद आहे का, की तो 'आईवर प्रेम करावं' असं सांगेल? दुसऱ्यावर प्रेम करावं असं तो सांगेल? ती ताकद त्याच्यात नाही. पण प्रेमाशिवाय जीवन व्यर्थ आहे. म्हणून आपल्यातल्या ज्ञानसंपन्न लोकांनी असं सांगितलं आहे : हरि वाजिव गीतामुरली|        केवळ भौतिकवादी विचारसरणीचा पुरस्कार करणारी अशी ज्या वेळेला स्थिती येते तेव्हा मग काय कराल? हरि वाजिव गीतामुरली| तेच गीतेना संस्कृतात म्हटलंय अध्येष्यते च य इमं धर्मं संवादमावयो:| देवाच्या हातात मुरली तर आहेच. पावा आपण पण वाजवतो आणि लोकांचं मनोरंजन करतो तेव्हा दिङमूढ होतात लोक. पण आम्हाला जो पावा पाहिजे, आम्हाला जी मुरली पाहिजे, आम्हाला जी मुरली पाहिजे ती ज्ञानाची मुरली पाहिजे. हरि वाजिव गीतामुरली| देवा! परत एकदा वाजवशील का रे ती गीतामुरली!    ...

Everything happens by the grace of God, and it is essential to express gratitude for it | सगळं भगवंताच्या कृपेनेच चालतं, आणि त्यासाठी कृतज्ञता दाखवणं आवश्यक आहे

Image
लोक सांगतात, समाजात दुःख आहेत की नाहीत? त्याच्यावर औषध सांगा. समतेचा झाला अंत| पडलेच ज्ञान बंदीत| ज्ञान आहे ना ते जेलखाण्यात पडल आहे. युनिव्हर्सिटी वाल्यांनी आपल्याजवळ ज्ञान ठेवल आहे. म्हणजे तुम्ही एम.ए चा शिक्का घ्याल तर तुम्ही ज्ञानी. 'कुठली डिग्री आहे तुमच्याजवळ?' डिग्री आणि विचारतात. जी डी ग्रेड करते माणसाला ती डिग्री! पण तरी ती हवी! ज्ञान त्यांनी त्यांच्या हातात ठेवल आहे. एकेकाळी ब्राह्मणांनी आपल्या हातात ठेवलं होतं, आता युनिव्हर्सिटीने आपल्या हातात ठेवल आहे. आम्ही सांगू ते ज्ञान, बस खलास! आज दहा टक्के लोक शिकत असतील तेवढेच! आपण आदिवासी लोकात फिरतो त्या बिचाऱ्यांना काहीही माहित नाही तुकाराम कोण होते. अशी स्थिती झाली आहे. त्यांनी हे ज्ञान बंदिस्त ठेवले आहे. झालय काय सांगू काय! युनिव्हर्स आहे जगात आणि युनिव्हर्सिटी आहेत फोर्ट मध्ये! म्हणजे माझ्या फोर्ट मध्ये नाही. युनिव्हर्सिटी आहे तिथे युनिवहर्सच नाही. एक मोठी बिल्डिंग म्हणजे युनिव्हर्सिटी! आणि इथे लाखो माणसं ज्यांना मिळतं काही नाही त्याच्याबद्दल कोणाला काही वाटतं का हो? साक्षर करा म्हणजे लिहायला वाचायला शिकवा क...

Spiritual bliss and the joy of deep meditation are the same | आध्यात्मिक किंवा समाधीचा आनंद सारखाच

Image
आध्यात्मिक किंवा समाधीचा आनंद सारखाच       संपूर्ण सृष्टी, मी, तुम्ही सर्वच आनंदमय आहोत. पण आपण आपल्या स्वतःला निरानंदी समजतो. कारण आपल्याला दुनिया रडवते आणि आपण रडतो. हीच आपली चूक आहे.       वास्तविक, सर्वांना आध्यात्मिक किंवा समाधीचा आनंद सारखाच आहे‌. विद्वान अविद्वान, गरीब श्रीमंत, लहान थोर सर्वांना तो आनंद सारखाच असतो. भगवद् प्राप्तीच्या सुखात चढाओढ नाही, द्वेष नाही. मात्र भौतिक गोष्टी आल्या की त्यात चढाओढ येते.       आकाशात इंद्रधनुष्य बघायचे असेल तर  त्यात कोणालाही चढाओढ करावी लागत नाही; कारण तो आनंद बघून कमी होत नाही. म्हणून त्यात स्पर्धा नाही आणि द्वेष नाही. उलट, आपण इंद्रधनुष्य पाहतो तेव्हा ते बघायला शेजाऱ्यापाजाऱ्याना देखील मुद्दाम बोलावतो. कारण शेजाऱ्यांनी ते बघितले तरी आपले काही त्यात कमी होणार नाही‌. इंद्रधनुष्य आपल्या मालकीचे नाही. अर्थात त्यावर कोणाची मालकी हक्क नाही‌.       ज्यात मालकीची भावना नसते आणि भोगल्याने ज्याचा आनंद कमी होत नाही अशा गोष्टीविषयी द्वेष असत नाही, त्याच्यासाठी चढाओढ देख...

भगवंताची कदर आणि सृष्टीतील संदेश | Value of God and the Message of Nature

Image
    वायू त्या माणसाला म्हणतो, 'अरे, उगवता सूर्य पुष्कळजण बघतात, वृक्ष वनस्पती सुद्धा पुष्कळजण बघतात. नदीवर पुष्कळ गुर वांसर न्हावून येतात. मात्र जगन्नाथांनी गंगेचा प्रभाव बघितला आणि त्यांना वाटलं, विलोलद्वानीरं तव जननि तिरं श्रीतवताम्| गंगामाईच स्नान करायला झाडून सगळे जातात. महादेवाचे दर्शनाला येणारा माणूस गंगेत एक वार तरी डुबकी मारून येतोच येतो. अशा प्रकारे गंगेत पुष्कळ गुरं वासरं न्हातात. मात्र अपि प्राज्यं राज्यं  तृणमिव परित्यज्य सहसा म्हणणारा जगन्नाथच. तर अशा प्रकारे भगवंताची जी शोभा आहे, भगवंताचे सौंदर्य आहे त्याची कदर करणार तू आहेस आणि म्हणून तो मोठा आहेस असं वायू माणसाच्या कानात येऊन सांगतो.      आज लोकांच्या दृष्टीने अमुक माणूस मोठा याचं कारण त्याच्याकडे विद्या आहे, वैभव आहे, नाही तर अमुक एक आहे म्हणून! मोठा कोण? तर ज्याच्यासाठी आसमान ठेंगन झाले आहे तो मोठा मानला जातो. पण तो माणूस कधी खाली कोसळेल ते सांगता येणार नाही. हे लोक हमखास घसरून पडायचे. तर मग मोठा कोण? कदर करणारा मोठा. या सृष्टीची कदर करणारा तू आहेस, म्हणून तू महान आहेस. भगवंताच...

समतेचा झाला अंत | Equality has come to an end.

Image
   कलहाचे नाचे भूत| समतेचा झाला अंत| समता दिसतच नाही. अशी कशी येईल समता? अशी कधीच समता असणार नाही, खरं पाहिलं तर बुद्धीची समता असू शकत नाही. कर्तुत्वाची समता असू शकत नाही. पैशाची सुद्धा समता राहू शकत नाही. एखादा म्हणेल, 'तुम्ही सगळ्यांना सारखे पैसे देऊ.' वाटून बघा. चार लोकांना जर तुम्ही शंभर - शंभर रुपये दिलेत तर एक माणूस शंभर रुपये गुंतून त्याचे सव्वाशे करतो. हे सहास आहे. माझे पैसे दुसऱ्याच्या जवळ देणे हे सहासच आहे मोठे. दुसरा म्हणतो, आपले पैसे कोणाला द्यायचे नाहीत. आपल्या जवळच ठेवायचे. परहस्तगतं धनम् - दुसऱ्याच्या हातात पैसा गेला की खलास! म्हणून तो शंभर रुपये तसेच ठेवतो. पहिल्याचे सव्वाशे झाले तर याचे शंभरच राहिले. तिसरा माणूस म्हणतो, शंभर मिळाले आहेत ना! दारू प्या! आजचा दिवस मज्याकरुन घ्या! दूर्गुणांनी गुणांनी त्याचे पन्नास होतात. तर काही लोक आपल्याला शांती पाहिजे म्हणून त्या पैशाने ज्ञानेश्वरी विकत घेतात. ज्ञानेश्वरी सुद्धा dead investment आहे पैशाच्या दृष्टीने. तोही पन्नासावर आला! दारुड्याही पन्नासावर आला‌. आणि ज्ञानेश्वरी घेणाराही पन्नासावर आला. मात्र ज्याच्य...

संचार व खरा कर्मयोगी | Communication and a True Karma Yogi

Image
                आज भले आपल्यासाठी जीवन जणू काही कारावास वाटत असला तरी संचार करायला निघाल्यावर मग खूप सुख वाटू लागते. मग भगवंतच विचारतो की, 'कुठे निघाला?' माणूस सांगतो, 'संचार करायला निघालो.' 'कुठे जाणार आहेस?' 'सध्या मृत्यू लोकात चाललोय.' 'असे? तिथे काय करशील?' 'सर्वत्र फिरणार आहे. त्यात आनंद आहे.' त्याला कशाची चिंता आहे!        चोवीस चे चोवीस तास भगवंत देखील त्याच्याबरोबर फिरत असतो. तो बघत असतो की आपला लेक काय करतोय? जेथे फिरायला जाण्याची इच्छा असते तिथे जा असे जरी त्याला जगत पित्याने सांगितले असले तरी हळूच तो मुलाला विचारतो, 'तुला कुठे जायचंय? तू म्हणशील तिथे जाऊ. पण मीही तुझ्यासोबत येतो.' मुलाच्या इच्छेप्रमाणे बाप त्याला फिरायला घेऊन जातो. अशा प्रकारे इमाल्लोकान् कामांन्नी कामरूपी अनुसंचारन् अस्ते यात फार मोठा अर्थ भरला आहे. म्हणजे हे की ज्याला लगाम नाही, बंधन नाही असे फिरणे म्हणजे संचार.  असतो मा सत गमाय| तमसो मा ज्योतिर्गमय| मृत्योर्माऽमृतन गमय|       हजारो जन्मापासून तपश्चर्या केली असेल तेव...

ही सृष्टी चोरांची नसून सज्जनांची आहे, आणि सज्जनांसाठीच बनवलेली आहे.

Image
अहमन्नम् - हे अन्न माझ्यायोगेच आहे. अख्ख्या जगातले अन्न माझे आहे. त्याचप्रमाणे अख्ख्या जगातल्या अन्नाला महत्त्व हे मी दिलेले आहे.       अन्नाचे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे भौतिक अन्न, म्हणजे वैभव. हे सगळे वैभव त्याचेच तर आहे. अरे! तो म्हणजेच वैभव! ज्याच्या वैभवामधून भगवंत वजा झाला आहे ते वैभव कसले? पण अशा प्रकारच्या पिशाच्चांमध्ये देखील काही सिद्धी असतात हे जरी खरे असले तरी यांच्या जीवनातून भगवान वजा झाला आहे त्याच्या वैभावाला किंमत नाही. अशी पुष्कळ वैभवसंपन्न माणसे जगात दिसतात. पण त्यांच्या चेहऱ्यावरची रेषही हालत नाही. तोच खरा वैभववान की ज्याला 'मी' चे वैभव लाभले आहे. ज्याला 'माझे' वैभव मिळाले आहे. असा वैभवसंपन्न माणूस ज्याच्या घरी आला असेल त्याच्या घरी वैभव येते. असा वैभव संपन्न माणूस आपल्या घरी आला की वैभव सोबत यायचेच.      दुसऱ्या अन्नाचा प्रकार आहे भावनेचे अन्न. जगामध्ये ही जी भावना उभी राहिली आहे त्याचे कारण म्हणजे हा   Superman. खुद्द भगवंताची या महान माणसावर भावना जडलेली असते. जगदीश सगळ्या जगाकडे जो भावनेच्या दृष्टीने बघतो, आत्म...

कमवा आणि खर्च करा | Earn and spend

Image
    अशा प्रकारे ज्याने स्वतःचा आनंद मिळवला, हा जो आनंदमय आत्मा आहे त्याच्याशी तादात्म्य पावून, म्हणजेच ज्याने शरीर भगवंताचे समजून दैवी बनवले, प्राण दैवी बनवला, प्राणाकडे बघण्याचा दृष्टिकोन दैवी बनवला, मन भव्य आणि दिव्य बनवले, भौतिक विद्यांकडे देखील ईश्वरी दृष्टीने आणि ईश्वराच्या कामी उपयोगी या दृष्टीने पाहू लागला. त्याचप्रमाणे ईश्वर भक्तीचा आनंद आणि स्वतःचा आनंद इथपर्यंत याची आनंदाची व्याख्या आली, असा माणूस या लोकी, म्हणजे केवळ पृथ्वीवरच नाही, भू: लोकी किंवा भुव: लोकी गेला तरीही सत्कार आणि स्व: लोकी गेला तरी सत्कारच प्राप्त करतो, तसेच चतुर्दशभुवनामध्ये इमाल्लोकान् अनुसंचारन् अस्ते|       एक वेळ अशा प्रकारची मेहनत करा आणि नंतर सृष्टीमध्ये फिरत रहा. मग सृष्टीत शोभा बघत फिरा. खूप पैसा कमावलेला माणूस असतो त्याला फक्त विचार करण्याची खोटी की आता कुठे जायचे? यावर्षी महाबळेश्वर, नाहीतर उटीला जाऊ. दुसरा त्याला धंदाच नाही. उटीमध्ये बसल्या बसल्या विचार करतो की पुढच्या वर्षी कुठे जायचे? सिमला! कारण काही कमवायचेच राहिलेले नाही. धंदा करायची कटकट नाही, मेहनत करायची...

लक्ष्मी आणि सरस्वती | Laxmi And Saraswati

Image
           लक्ष्मीने एक स्टेटमेंट दिले आहे. एकदा सगळ्यांनी लक्ष्मीला सांगितले की, तुमच्याबद्दल सगळ्यांची तक्रार आहे, 'काही लोक म्हणतात की लक्ष्मी मूर्खांकडे जाते. ब्राह्मण म्हणतात की लक्ष्मी आमच्याकडे येत नाही.' मधल्या काळात लोक अशा प्रकारे बोलत होते की लक्ष्मी आणि सरस्वती मध्ये भांडण आहे. का? तर म्हणे, ज्याच्या घरी सरस्वती असते त्याच्या घरी लक्ष्मी येत नाही. पण खरे तर त्यांचा दृष्टिकोन outlook वेगळा असायचा. सरस्वतीच्या उपासकाला शंभर रुपये मिळाले तर त्याचे दोनशे कसे होतील हे न पाहता तो शंभर रुपयांची पुस्तके घेतो. म्हणजे त्याच्यापाशी संपत्ती येत नाही असे नाही, तर त्याचा outlook वेगळा असल्याने दुनियेला तसे वाटते. आपण असे समजतो की लक्ष्मी आणि सरस्वती चे भांडण आहे.      म्हणूनच एकदा एक ब्राह्मणाने म्हटले आहे, आम्हा ब्राह्मणांच्या घरी लक्ष्मी येत नाही त्याला कारण आहे. एकदा नारायणाने लक्ष्मीला विचारलं की 'तू बाकी सर्वांच्या घरी जातेस पण ब्राह्मण, जे संस्कृतीचे काम करतात, चांगले काम करतात त्यांच्या घरात तु का जात नाहीस? तर लक्ष्मी म्हणाल...

"Right hand and Left hand"

Image
    पंडितांची सभा भरली होती. एका पंडिताने प्रश्न विचारला, 'उजव्या हाताला जसे महत्व आहे तसे डाव्या हाताला महत्त्व का नाही? त्यावर एका पंडिताने उत्तर दिले, 'सर्वात पवित्र जर कोणी असेल तर तो उजवा हात आहे. कारण की माणूस सर्वच उजव्या हाताने करतो‌. देवाची पूजा उजव्या हाताने होते. फूल जर डाव्या हाताने देवाला वाहिले तर देवाचा अपमान होईल. डाव्या हाताने कोणाला काही देतही नाहीत. कोणी दिले तर डाव्या हाताने घेत नाहीत. तेव्हा दुसरा पंडितानी डाव्या हाताची ब्रीप घेतली. तर तो म्हणाला, 'डावा हात किती काम करतो हे माहित आहे? शूर माणूस रणांगणात शत्रूची शेंडी पकडतो आणि मग त्याचे डोके धडा वेगळे करतो. मात्र ती शेंडी कोणत्या हाताने पकडतो? डाव्या हाताने. आणि मग उजवा हात डोके उडवतो. जेव्हा तुम्ही घोड्यावर बसून चाललेला असता तेव्हा घोड्याचा लागण कोण खेचतो? डावा हात! म्हणजे सगळे जीवन डाव्या हातात आहे. घोडा जरा उलटा फिरला तर माणूस उलटा खाली! म्हणजे डाव्या हातावर मोठी जबाबदारी आहे. लढायला जात्यावेळी राजा संग्राम भूमीवर धनुष्य डाव्या हाताने धरतो आणि मग प्रत्यांच्या खेचतो. एकूण काय तर सर्व काही ...

रघूवंश आणि संस्कृतीक उन्नती | Raghuvansha and Cultural Prosperity

Image
      पैसा पुष्कळ कमवा, त्याला ना नाही. रघू राजाने पैसा कमावला होता! देशादेशांतराहून त्याने पैसा आणला‌. एक देश असा ठेवला नाही की जिथून त्याने पैसा आणला नसेल. पण तो कशासाठी?  सत्कृत्ये करण्यासाठी. सत्कृत्ये म्हणजे एखादी शेंडी राखणाऱ्या आणि चंदन चोपडणाऱ्या ब्राह्मणाला दक्षिणा दिली की झाले असे समजू नका. मानवाचा सांस्कृतिक व नैतिक स्तर  ज्याद्वारे उंचावेल अशाप्रकारची जी जी कृत्ये आहेत ती ती रघुने उभी केली. रघुने जे प्रयत्न केले, इन्वेस्टमेंट केली त्याच्यातून रामराज्य उभे राहिले. रामराज्य काही एका पिढीत उभे राहत नाही. रामाने काही जादूची कांडी फिरवलेली नव्हती. आणि जर तशीच फिरवायची असती तर वरती बसूनच नाही का फिरवली असती! खाली यायचे कारण नाही. रघु, अज, दशरथ आणि मग राम या तीन पिढ्यांची ही मेहनत आहे की ज्याच्या नंतर रामराज्य उभे राहिले.     न मे स्तेनो जनपदे न कदर्यो न मद्यप:| या राज्यात एकही माणूस कंजूष नव्हता, क्षुद्र नव्हता, हलका नव्हता. अशा प्रकारचे जे राज्य उभे राहिले, त्याचे कारण रघू आहे. रघुनी पुष्कळ कमावले. मला नाही वाटत की रघू एवढे कोणी कमाव...

आयुष्याचा अल्पकालिक आणि सत्य विचार | The fleeting nature and truth of life.

Image
ज्याला विद्या मिळवायची आहे त्याने क्षणाक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे आणि ज्याला पैसा मिळवायचा आहे त्याने कणाकणाकडे लक्ष दिले पाहिजे. भले माझ्याकडे लाखो रुपये असतील, पण दहा आणे सुद्धा फुकट जाता उपयोगी नाही. समजून समजून एखाद्याला दहा हजार रुपये द्या, पण न समजता मूर्खासारखे दहा आणे सुद्धा जाऊ देऊ नका. हा एक प्रकारचा अभ्यास आहे.      रक्षितं वर्धयेन्नित्यम् - जे कमावून ठेवले आहे ते नुसते सांभाळून ठेवून देऊ नका, ते वाढवा, पुष्कळ वाढवा. पण याच्या पुढची ओळ जरा डोक्यात न उतरण्यासाखी आहे - वृद्धं तीर्थेषु निक्षिपेत्| हे सर्व वाढवायचे ते कशासाठी? सत्कृत्यामध्ये खर्चण्यासाठी. पुष्कळ कमवा आणि सत्कृत्यामध्ये द्या. कारण की तोच पैसा तुमचा आहे. जेवढा पैसा सत्कृत्यामध्ये द्याल तेवढाच आपला. बाकी आपले काही नाही! बाकी सगळे इथेच ठेवून निघून जायचं आहे.      वाटेल तेवढे धन कमवाल, बँक अकाउंट येथेच राहते. गाडी - घोडे सुद्धा सगळे तबेल्यातून बाहेर यायचे नाही. पत्नी घराच्या उंबरठ्यापर्यंत, जन: स्मश्याने - हे सगळे तुमच्या घरी चहापाणी पिणारे स्मशानापर्यंतच! आणि ते सुद्धा मशानातच...

कर्माची गहन गती | Profound motion of karma

Image
   माणसाच्या पाठीशी भगवद्शक्ती उभी आहे. वैयक्तिक जीवनातही तिचा प्रत्यय येतो. तुम्हाला वित्त, विद्या, अधिकार वगैरे गोष्टी या जन्मात मिळाल्या असतील तर समजून चला की तुम्ही गेल्या जन्मी प्रभू चे लाडके होण्याचा प्रयत्न केला असेल, प्रभूचे कार्य केले त्याचे हे फळ मिळाले आहे. जे मिळाले आहे ते प्रभूचे प्रेमपत्र आहे. भगवंताने प्रेमाने पाठवलेले फुल जर आपण  कुस्करून टाकले तर मग पुढच्या जन्मी मिळण्याची शक्यता नाही. प्रभू प्रेमाचा फुलांचा सुगंध जसा घेतला पाहिजे तसे त्याचे फळ देखील खाता आले पाहिजे. आपल्याला प्रभू प्रेमाच्या फुलाचा सुगंध घेताच येत नाही, हातात फुल आले तर ते कुस्करून टाकतो. आपल्या हे लक्षातच येत नाही की त्याच्या पाठीशी भगवत् शक्ती बसलेली आहे.       एकाच बापाची चार मुले, पण तरीही कोण कुठे जाऊन पडतो. कर्माची गती अतिशय गहन आहे. एका बगीच्यात मोगऱ्याचे एक झाड होते. त्यावरची चार फुले काढून एकाच माळ्याला विकण्यात आली. त्यातल्या एका फुलाचे भाग्य असे मोठे की ते एका सुंदर स्त्रीच्या वेणीत जाऊन बसले. दुसरे फुल एका माणसाने आपल्या शर्टच्या बटन होलमध्ये लावले....