कर्माची गहन गती | Profound motion of karma
माणसाच्या पाठीशी भगवद्शक्ती उभी आहे. वैयक्तिक जीवनातही तिचा प्रत्यय येतो. तुम्हाला वित्त, विद्या, अधिकार वगैरे गोष्टी या जन्मात मिळाल्या असतील तर समजून चला की तुम्ही गेल्या जन्मी प्रभू चे लाडके होण्याचा प्रयत्न केला असेल, प्रभूचे कार्य केले त्याचे हे फळ मिळाले आहे. जे मिळाले आहे ते प्रभूचे प्रेमपत्र आहे. भगवंताने प्रेमाने पाठवलेले फुल जर आपण कुस्करून टाकले तर मग पुढच्या जन्मी मिळण्याची शक्यता नाही. प्रभू प्रेमाचा फुलांचा सुगंध जसा घेतला पाहिजे तसे त्याचे फळ देखील खाता आले पाहिजे. आपल्याला प्रभू प्रेमाच्या फुलाचा सुगंध घेताच येत नाही, हातात फुल आले तर ते कुस्करून टाकतो. आपल्या हे लक्षातच येत नाही की त्याच्या पाठीशी भगवत् शक्ती बसलेली आहे.
एकाच बापाची चार मुले, पण तरीही कोण कुठे जाऊन पडतो. कर्माची गती अतिशय गहन आहे. एका बगीच्यात मोगऱ्याचे एक झाड होते. त्यावरची चार फुले काढून एकाच माळ्याला विकण्यात आली. त्यातल्या एका फुलाचे भाग्य असे मोठे की ते एका सुंदर स्त्रीच्या वेणीत जाऊन बसले. दुसरे फुल एका माणसाने आपल्या शर्टच्या बटन होलमध्ये लावले. तिसरे फुल एका माणसाने लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात देवाच्या पायावर वाहिले. आणि चौथ्या फुलाचे नशीबच इतके फुटके की ते एका प्रेतावर वाहण्यात आले. त्या चौथ्या फुलाचे नशीबच इतके वाईट की त्याला प्रेतच वाट्याला आले.
दैव एक जबरदस्त शक्ती आहे. त्यामुळे माणूस यशस्वी होतो. जो माणूस स्वप्नातही प्रभुला विसरत नाही. प्रभूची विद्या, प्रभूची शक्ती, प्रभूचे विचार, प्रभूचे जीवन, प्रभुचे कार्य जो सोडत नाही, आणि स्वतः या प्रभू कार्यात सतत साथ देत असतो, या विचारानुसार चालत असतो आणि प्रभूला 'आप्त' समजतो, अशा माणसाच्या पाठीमागे दैव उभे राहते. जरी त्याला वनवास प्राप्त झाला तरीही! पांडवांना राज्य सोडून वनवासात जावे लागले. परंतु भगवान कृष्ण त्यांच्या पाठीशी उभा होता.
लेखाचा सारांश:
कर्म, दैव, आणि भगवंताशी असलेल्या नात्याचा सुंदर विचार मांडला आहे. माणसाला जीवनात मिळणाऱ्या सुखदुःखांचे, संपत्तीचे किंवा अधिकाराचे कारण त्याचे पूर्वजन्मीचे कर्म आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भगवंताने दिलेली देणगी ही प्रेमाचा संदेश आहे. जर आपण ती नीट जपली नाही, तर भविष्यात ती मिळणार नाही.
लेखात चार फुलांच्या उदाहरणातून कर्म आणि दैव यांची गहनता मांडली आहे. तीच फुले वेगवेगळ्या परिस्थितीत टाकली गेली – काहींना चांगले भाग्य लाभले, तर काहींना दुःखद परिस्थिती. यातून कर्माच्या फलनाची गहनता आणि दैवाची अपरिहार्यता अधोरेखित होते.
ज्यांच्या जीवनात भगवंताचे विचार, कार्य, आणि शक्ती हे केंद्रस्थानी असतात, त्यांना दैवाची साथ मिळते. पांडवांच्या वनवासाचे उदाहरण देऊन सांगितले आहे की, जरी कठीण परिस्थिती आली, तरी भगवंताचा आधार असतो. त्यामुळे माणसाने आपल्या कर्माने भगवंताशी जोडलेले राहिले पाहिजे.
मुख्य संदेश:
कर्म आणि दैव यांची गती गहन असून, भगवंताचे विचार आणि कार्य आत्मसात केल्याने जीवनात यश आणि दैवाची साथ मिळते
Comments
Post a Comment