Everything happens by the grace of God, and it is essential to express gratitude for it | सगळं भगवंताच्या कृपेनेच चालतं, आणि त्यासाठी कृतज्ञता दाखवणं आवश्यक आहे
लोक सांगतात, समाजात दुःख आहेत की नाहीत? त्याच्यावर औषध सांगा. समतेचा झाला अंत| पडलेच ज्ञान बंदीत| ज्ञान आहे ना ते जेलखाण्यात पडल आहे. युनिव्हर्सिटी वाल्यांनी आपल्याजवळ ज्ञान ठेवल आहे. म्हणजे तुम्ही एम.ए चा शिक्का घ्याल तर तुम्ही ज्ञानी. 'कुठली डिग्री आहे तुमच्याजवळ?' डिग्री आणि विचारतात. जी डी ग्रेड करते माणसाला ती डिग्री! पण तरी ती हवी! ज्ञान त्यांनी त्यांच्या हातात ठेवल आहे. एकेकाळी ब्राह्मणांनी आपल्या हातात ठेवलं होतं, आता युनिव्हर्सिटीने आपल्या हातात ठेवल आहे. आम्ही सांगू ते ज्ञान, बस खलास! आज दहा टक्के लोक शिकत असतील तेवढेच! आपण आदिवासी लोकात फिरतो त्या बिचाऱ्यांना काहीही माहित नाही तुकाराम कोण होते. अशी स्थिती झाली आहे. त्यांनी हे ज्ञान बंदिस्त ठेवले आहे. झालय काय सांगू काय! युनिव्हर्स आहे जगात आणि युनिव्हर्सिटी आहेत फोर्ट मध्ये! म्हणजे माझ्या फोर्ट मध्ये नाही. युनिव्हर्सिटी आहे तिथे युनिवहर्सच नाही. एक मोठी बिल्डिंग म्हणजे युनिव्हर्सिटी! आणि इथे लाखो माणसं ज्यांना मिळतं काही नाही त्याच्याबद्दल कोणाला काही वाटतं का हो? साक्षर करा म्हणजे लिहायला वाचायला शिकवा की झालं? त्यांना काही गोष्टी सांगा, त्यांना गोष्टी कळू द्या. भागवत तुम्हीच ऐकावं काय? त्यांनी का न ऐकावं? पण त्यांच्याजवळ जाणार कोण आणि का जाणार? हे सांगणारी गीता आहे. तू त्याच्याजवळ का जा हे गीता सांगते. आज पर्यंत कोणीही हे सांगू शकलेल नाही की मी आदिवासी मध्ये वा कोणाकोपऱ्यात का जावं? मला काही मत नको आहेत, मला पैसे नको आहेत. मी आपला शांतपणे बसलेलो आहे माझी चांगली नोकरी आहे टीव्ही बघत बसलो आहे. मग मी कशाकरता जायचं? कशाकरता जायचं हे समजावण्याची ताकद इतर कोणाजवळ नसली तर गीतेत आहे. गीता सांगते, तोही तुझा भाऊ आहे. त्याचेही हृदय भगवंत चालवतो आहे. म्हणून त्यांच्याकडे जा. ह्याच लोकांना काही वाटत नाही.
पुढे कवी म्हणतो, हे सत्य करी आकांत, न्यायश्री अश्रू ढाळी| हे सत्य आपण करताय, न्याय राहिलाच नाहीये. भगवंतांनी मनुष्य देह दिलाय कशाला? भगवंत म्हणतो, मी चालवतो, मी उठवतो पण हराम कोणी मला आठवतो तर! हां अडचणीत आला की नवस करतात. नवरात्रात उपवास करतात, पण दिनप्रतिन जो माझं जीवन चालवतो आहे त्याला, त्याच्या प्रेमाला मी नमस्कार करतो काय?
म्हणून आमच्या स्वाध्याय लोकांनी त्रिकालसंध्या घेऊन जायची आहे. त्यातून माणसाला कळलं पाहिजे की चालवणारा 'तो' आहे. पण 'त्याच्या' वरच अन्याय होतो आहे. भगवंतावरच अन्याय होतो आहे. आणि हा मोठाच अन्याय आहे. हे सगळे शिकलेले लोक त्याच्यावर अन्याय करत आहेत. त्याच्यामुळे बोलतात, त्याच्यामुळे झोपतात, त्याच्यामुळे चालतात पण हराम त्याला आठवतील तर! उलट म्हणतात, देव दाखव आम्हाला.' अरे! तुझा आजोबा दाखव. आहे आज? आजोबा होता की नाही! आजोबा शिवाय तू झालास हे साधं लॉजिक ही त्याला उघडा पाडेल. देव नाहीच असं म्हणणे हा त्याच्यावरचा अन्याय आहे.
अहो त्याच्या प्रेमाला लोक मानत नाहीत हाही त्याच्यावरचा मोठा अन्याय आहे. जर प्रेमाने लेकाला काही चांगलं करून देत असेल आणि मुलांनी त्याकडे लक्ष दिलं नाही तर आईवर अन्याय होतो की नाही हो! तुझ्या करता आईने येऊ पुढे जेवण बनवलं पण तुला त्याची किंमत आहे का? असा देव म्हणतो, तुला मी झोपवतो, उठवतो.. डोळ्यांनी बघतो ध्वनि परिसतो कानीं पदी चालतो| मी हे सगळं करतो पण माझ्या प्रेमाची कदर आहे का तुला? हाच अन्याय देवावर होतोय. त्या लक्ष्मीनारायणावर होतोय. न्यायश्री अश्रू ढाळी, हरि! वाजिव गीतामुरली
तुमच्या मांडणीने सामाजिक स्थिती, शिक्षणव्यवस्था, आणि अध्यात्म यांचं मार्मिक निरीक्षण केलं आहे. आज ज्ञान फक्त डिग्री आणि प्रमाणपत्रांमध्ये मर्यादित केलं गेलंय, यामुळे खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त होणं अवघड झालं आहे. ज्यांना शिक्षणाचा किंवा संधीचा अधिकार नाही, ते त्या ज्ञानापासून वंचित राहतात, आणि हीच विषमता आहे.
भगवद्गीता आपल्याला सांगते की सर्व जीव एकसमान आहेत आणि प्रत्येकात भगवंताचा अंश आहे. "तू त्याच्याकडे का जा?" हा प्रश्न गीतेच्या तत्वज्ञानातून सहज समजतो. समाजात वंचित, गरीब किंवा अडचणीत असलेल्या लोकांकडे जाणं, त्यांना शिकवणं, त्यांची सेवा करणं हे खरे भक्तीचे मार्ग आहेत. त्यांना समानतेच्या आधारावर समजून घेणं आणि त्यांचं जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करणं हेच सत्य धर्म आहे.
तुमचं देवावरचं निरीक्षणही खूप विचार करायला लावतं. भगवंताचं अस्तित्व आणि त्याच्या प्रेमाची ओळख ही रोजच्या जीवनात असते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. देवाचं स्मरण फक्त अडचणीत किंवा उत्सवांपुरतं मर्यादित न ठेवता, रोजच्या जीवनात त्याच्या कृपेची जाण ठेवायला हवी. आपले श्वास, दृष्टी, श्रवण, हालचाल— सगळं भगवंताच्या कृपेनेच चालतं, आणि त्यासाठी कृतज्ञता दाखवणं आवश्यक आहे.
तुमचं स्वाध्याय, त्रिकालसंध्या यामधून मानवाला देवाच्या प्रेमाची आणि न्यायाची ओळख पटवून देणं हा खूप पवित्र उद्देश आहे. हीच प्रेरणा आपल्याला समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी पुढे नेऊ शकते.
तत्वज्ञान, श्रद्धा, आणि सामाजिक कार्य यांचा मिलाफच खऱ्या अर्थाने समाज बदलू शकतो.
Comments
Post a Comment