People couldn't understand the secret/essence | लोकांस कळेना वर्म

         

कवी सांगतो, लोकांस कळेना वर्म - 
आम्हाला मनुष्य जीवन का दिल देवाने? त्यातलं वर्म काय? आम्ही तर पशु सारखे राहतो. एखादा मला विचारील, 'काय सांगता? आम्ही तर दोन पायाने चालतो आणि तुम्ही आम्हाला पशुसारखे म्हणतात! तुम्ही बुवा फार कडू बोलता!' अरे! तू दोन पायाने चालतोस म्हणून जर तू मनुष्य असलास तर कावळा देखील दोन पायानीच चालतो. मग माणूस आहे का तो? तेव्हा मला मनुष्यजन्म का मिळाला आहे? देवाला ओळखता यावं म्हणून मला मनुष्य जन्म मिळाला आहे. त्याला ओळखण कठीण असलं तरी हा मान मला मिळाला आहे. त्याच ऐकशील म्हणून मिळाला आहे. रेल्वेत पूर्वी तीन क्लास असायचे - फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि थर्ड क्लास. त्यात कुठे जरी बसला माणूस तरी मुक्कामी पोहोचून जायचा‌. पण आपलं तर तिकीटच नाही. लोकास कळेना वर्म| मनुष्य जन्म का मिळाला आहे? खा, प्या आणि रहा. नोकरी करा. बस्! हाच का माणसाचा जन्म?
     
आपल्या गुजरातच्या - सौराष्ट्रमधल्या स्वाध्यायींना माहित असेल. तिथल्या जंगलातही स्वाध्याय चालतो. रात्री सिंह आवाज करतो आहे आणि आपले लोक स्वाध्याय करत आहेत. मी एकदा तिथल्या गीरच्या जंगलात फिरत होतो तेव्हा सिंह बघायला मिळाले. तेव्हा तिथल्या माणसांनी मला सांगितले, सिंह आणि सिंहीण एकत्र राहतात. छावा जन्माला आला की ते एकमेकांना सोडणार नाहीत. मुदतीचं लग्न ज्याला आपण म्हणतो तसे ते दोघे बरोबरच असतात. ज्या वेळेला छावा पहिल्यांदा शिकार करतो तेव्हाही दोघं बघत असतात. मात्र तेही सींहीण पोराला शिकवते. ही पुरुष जात ना जवळजवळ निरोपयोगीच आहे. सिंह कधीच काही शिकवत नाही, सिंहीण शिकवते, सिंह बघत असतो. तो प्रोटेक्टर संरक्षक असतो. सिंहाच्या छाव्याने एक जरी शिकार केली की मग दोघे निराळे! घटस्फोट! ती कुठल्यातरी जंगलात जाते आणि तो कुठल्यातरी जंगलात जातो. हेच पशुच जीवन आहे. मुलाला पहिली शिकार करायला शिकवणारे पशुच कर्तव्य आहे, तसं मुलाला नोकरीला लावायचं काम बापाचा आहे. त्यात विशेष काय केलं त्यांने? म्हणे आम्ही आमच्या मुलाला नोकरी लावून दिली! त्याला धंदा काढून दिला! यात काही मोठा वाघ नाही मारला तुम्ही! हे पशुत्वच आहे‌.
     
पशु हलका नाही. जसं तुमचं हृदय 'तो' चालवतो आहे तसं पशुचही हृदय तोच चालवतो आहे. अहो! बैलाचा सुद्धा हार्ट फेल होतो! मी बघितलंय! आपली कच्छमध्ये एक मोठी संस्था आहे तिथे मी गेलो होतो. मी सकाळी बैलाला चारा घालून आलो, जेवलो आणि निघालो तासाभराने तर निघताना एक जण मला म्हणाले, 'बैल मेला' कसा? 'हार्टफेल झाला.' हे असं मी पहिल्यांदाच ऐकलं. त्यालाही हार्ट आहे आणि त्याचाही हार्ट फेल होऊ शकतो! या दृष्टीने आम्ही मोठे काय केले? लोकांस कळेना वर्म| कशाला मनुष्य म्हणायचं मग? काय आहे तुझ्याजवळ प्लस? खातोस, पितोस, राहतोस आणि मुलाला नोकरीला लावतोस‌. हे केलेच पाहिजे तुला. केलं नाहीस तर पापी आहेस. पण करतो यात विशेष वाघ मारला नाहीस. हे वर्मच कळत नाही माणसाला. हे कोण सांगेल माणसाला, म्हणून हरि वाजिव गीतामुरली|

लोकांस कळेना वर्म या लेखात कवीने मनुष्यजन्माच्या महत्वावर प्रकाश टाकला आहे. तो विचारतो, देवाने आपणाला मनुष्य म्हणून जन्म दिला, त्यामागचे रहस्य काय? आपण फक्त खाणे, पिणे, राहणे, नोकरी करणे, आणि मूलांना व्यवस्थित ठेवणे यापुरते मर्यादित आहोत का? हे सगळे तर प्राणीही करतात. मग आपण माणूस म्हणून विशेष काय करतो?

कवी पुढे प्राण्यांचे उदाहरण देतो. सिंह आणि सिंहीण आपल्या पिल्लाला शिकवतात, ते संरक्षक बनतात, पण नंतर ते आपापल्या वाटेला जातात. त्यांना फक्त त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या असतात. कवी म्हणतो, आपणही जर फक्त मुलांना नोकरीला लावून दिले, व्यवसाय दिला, तर त्यात काय मोठेपणा आहे? यात माणसाच्या जीवनाचे वर्म, त्याचा उद्देश दिसत नाही.

माणसाचे हृदय, विचारशक्ती, आणि भावना यांमुळे त्याचा स्तर प्राण्यांपेक्षा उंच आहे. देवाने माणसाला स्वतःला ओळखण्याची, त्याच्या अस्तित्वाचा शोध घेण्याची संधी दिली आहे. परंतु, हे वर्म अनेकांना कळत नाही. माणूस फक्त भौतिक गरजांमध्ये गुंततो आणि त्याचा खरा उद्देश हरवतो.

कवीचा हा संदेश आहे की माणसाने आपले जीवन फक्त संसारापुरते मर्यादित ठेवू नये. त्याला त्याच्या अस्तित्वाचा उद्देश शोधावा लागतो. देवाच्या आदेशानुसार आणि त्याला ओळखून जगण्याचा मार्ग आपल्याला आत्मचिंतन आणि स्वाध्यायातून गवसतो. "लोकांस कळेना वर्म" म्हणजेच माणसाचे खरे जीवनातील वर्म कधीच सहज समजत नाही, त्यासाठी चिंतन आणि आध्यात्मिक शोध आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन