लक्ष्मी आणि सरस्वती | Laxmi And Saraswati
लक्ष्मीने एक स्टेटमेंट दिले आहे. एकदा सगळ्यांनी लक्ष्मीला सांगितले की, तुमच्याबद्दल सगळ्यांची तक्रार आहे, 'काही लोक म्हणतात की लक्ष्मी मूर्खांकडे जाते. ब्राह्मण म्हणतात की लक्ष्मी आमच्याकडे येत नाही.' मधल्या काळात लोक अशा प्रकारे बोलत होते की लक्ष्मी आणि सरस्वती मध्ये भांडण आहे. का? तर म्हणे, ज्याच्या घरी सरस्वती असते त्याच्या घरी लक्ष्मी येत नाही. पण खरे तर त्यांचा दृष्टिकोन outlook वेगळा असायचा. सरस्वतीच्या उपासकाला शंभर रुपये मिळाले तर त्याचे दोनशे कसे होतील हे न पाहता तो शंभर रुपयांची पुस्तके घेतो. म्हणजे त्याच्यापाशी संपत्ती येत नाही असे नाही, तर त्याचा outlook वेगळा असल्याने दुनियेला तसे वाटते. आपण असे समजतो की लक्ष्मी आणि सरस्वती चे भांडण आहे.
म्हणूनच एकदा एक ब्राह्मणाने म्हटले आहे, आम्हा ब्राह्मणांच्या घरी लक्ष्मी येत नाही त्याला कारण आहे. एकदा नारायणाने लक्ष्मीला विचारलं की 'तू बाकी सर्वांच्या घरी जातेस पण ब्राह्मण, जे संस्कृतीचे काम करतात, चांगले काम करतात त्यांच्या घरात तु का जात नाहीस? तर लक्ष्मी म्हणाली, 'मी ब्राह्मणांच्या घरी का जाऊ? ब्राम्हणांनी तर माझा सत्यानाश केला आहे.' का? काय झाले? तर ती म्हणाली, 'ब्राह्मणांचे घर मी कायमचे सोडले आहे?' 'का बरे?' तर म्हणाली, 'या ब्राह्मणांनी माझा केवढा मोठा अपराध केला आहे. एक बहाद्दर ब्राह्मण उठला आणि त्या अगस्ती ऋषींनी माझ्या पित्यालाच पिऊन टाकले. ठीक आहे. लग्न झाल्यावर माहेरची ओढ कमी होते पण पतीचे घर तर जास्त प्रिय असते की नाही? पतीचा अपमान केला तर पत्नीला कसे चालेल? पती बद्दल कोणी वाईट बोलला तर ते पत्नीला चालेल? पतीची कोणी उपेक्षा केली तर कोणती पत्नी त्याच्या घरी जाईल? पण ब्राह्मणातील एक महापुरुष असा निघाला की त्याने माझा जो वल्लभ, म्हणजे देवा तुम्ही विष्णू, तुमच्या छातीवर एका ब्राह्मणानेच लाथ मारली. अशा कुटुंबात मी कशाला जाऊ? त्यानंतर लहानपणापासून या ब्राह्मणांनी विचार, विद्या मिळवली ती म्हणजे माझी वैरीणच. माझे घर म्हणजे कमळ तेथे ब्राह्मण रोज सकाळी उठून तोडतात. एक वेळ तेही ठीक आहे पण तोडल्यावर हे भगवान तुमच्या चरण कमलावर ते वाहिले तरी हरकत नाही. पण शंकराच्या पायावर वाहतात. अशा प्रकारे या ब्राह्मणांनी माझ्या पतीचा अपमान केला आहे, बापाचा अपमान केला आहे. माझे माहेर सासर सर्व ज्यांनी उडवले आहे, त्यांच्या घरी तुम्ही मला जायला सांगता? म्हणून मी ब्राह्मणाच्या घरात जाण्यास उत्सुक नसते.
अर्थात हा सर्व विनोद आहे. ही वस्तुस्थिती नाही. वस्तुतः लक्ष्मी स्वतःच्या स्टेटमेंट मध्ये सांगते -
लक्ष्मी नाही लक्ष्मीवान चंचल.
काही लोक म्हणतात की, दुराचारी लोकांकडं लक्ष्मी जाते, सरळ, सात्विक लोकांकडे लक्ष्मी जातच नाही. ही गोष्ट खोटी आहे. उलट लक्ष्मी तर इथे स्वतःच सांगते आहे की मी दुश्चारीने नाही, चंचल नाही, मी फक्त शूर, पंडित किंवा लुच्च्या पाशी जाते असे नाही किंवा कमी शिकलेले असतात त्यांच्याकडे जाते असेही नाही. लक्ष्मी म्हणते, काही लोक माझ्याबद्दल म्हणतात की, 'लक्ष्मी चंचल आहे. चार दिवस याच्या घरी आणि चार दिवस त्याच्या घरी राहते.' पण लक्ष्मी चंचल नाही, लक्ष्मी वान चंचल आहे. जोपर्यंत लक्ष्मी तुमच्याकडे नसते तोपर्यंतचे तुमचे वर्तन, आणि लक्ष्मी तुमच्याकडे आल्यानंतर चे तुमचे वर्तन, तुम्हीच तपासाल तर त्यात फरक दिसेल. तुमच्या विचारात, वृत्तीत फरक पडतो. सर्वच गोष्टी तुम्ही बदलून जाता. जोपर्यंत लक्ष्मी येत नाही तोपर्यंत म्हणता, देवा जर लक्ष्मी घरी आली तर मी घराघरात गीता घेऊन जाईन. सर्व शक्ती या कामात वापरेन.' आणि लक्ष्मी आली की विचार करता, 'गोष्ट बरोबर आहे पण गीता काही घराघरात जाईल असे वाटत नाही. एवढा मोठा समुद्र आहे. सगळा खारट आहे. एवढ्या खाऱ्या समुद्रात एखादी गोणी साखरेची टाकाल तर काय समुद्र गोड होणार आहे?
'जशी समुद्रात एक गोणी साखर टाकली तरी तो खराच गोड होणार नाही. तेव्हा तुम्ही तुमचे गुण जपा, सांभाळून ठेवा.' म्हणजे सांगायचं हेच की, वित्त आल्यावर आपली वृत्ती बदलते. लक्ष्मी चंचल नाही. चंचल आपण आहोत.
यातून लक्ष्मी (संपत्ती) आणि सरस्वती (विद्या) यांच्यातील भिन्न दृष्टिकोन स्पष्ट होतो. यामधून जीवनात समन्वयाचा महत्त्वाचा धडा मिळतो, कारण विद्या आणि संपत्ती या परस्पर पूरक आहेत, विरोधक नव्हेत.
कथेतले महत्त्वाचे मुद्दे:
1. लक्ष्मी आणि सरस्वतीचा दृष्टिकोन:
सरस्वतीच्या उपासकांचे लक्ष विद्या आणि ज्ञानार्जनावर असते. त्यांना संपत्तीचा उपयोग शिक्षणात किंवा बुद्धिमत्तेसाठी कसा करायचा हे महत्त्वाचे वाटते.
लक्ष्मी म्हणते की, ती कोणालाही निवडकपणे जात नाही. जो त्याचा विचार, वृत्ती आणि आचरणाने संपत्ती टिकवतो, त्याच्याकडे ती टिकते.
2. ब्राह्मणांचा विनोदी उल्लेख:
ब्राह्मणांच्या घरात लक्ष्मी का जात नाही, याबाबतचा विनोद त्यांची विचारसरणी आणि संस्कृतीसाठी समर्पितता यावर प्रकाश टाकतो.
यातून हसत-हसत हेही सांगितले जाते की, संपत्ती टिकवण्यासाठी समर्पक आचरण, विवेक आणि संतुलन आवश्यक आहे.
3. लक्ष्मी चंचल नाही:
लक्ष्मीच्या चंचलतेची लोकांच्या विचारसरणीतील गैरसमजुतींचा उल्लेख आहे. लक्ष्मी स्वतःच सांगते की ती चंचल नाही, तर माणसांचे वर्तन आणि वृत्ती तिच्या येण्याने बदलतात.
या कथेमागची शिकवण:
विद्या आणि संपत्ती यांच्यातील समन्वय जीवन समृद्ध करतो.
संपत्तीचा उपयोग योग्य कार्यांसाठी केला तरच ती टिकते.
आपल्या विचारसरणीतूनच आपल्याला आयुष्यात स्थैर्य आणि समाधान मिळते.
Comments
Post a Comment