आयुष्याचा अल्पकालिक आणि सत्य विचार | The fleeting nature and truth of life.
ज्याला विद्या मिळवायची आहे त्याने क्षणाक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे आणि ज्याला पैसा मिळवायचा आहे त्याने कणाकणाकडे लक्ष दिले पाहिजे. भले माझ्याकडे लाखो रुपये असतील, पण दहा आणे सुद्धा फुकट जाता उपयोगी नाही. समजून समजून एखाद्याला दहा हजार रुपये द्या, पण न समजता मूर्खासारखे दहा आणे सुद्धा जाऊ देऊ नका. हा एक प्रकारचा अभ्यास आहे.
रक्षितं वर्धयेन्नित्यम् - जे कमावून ठेवले आहे ते नुसते सांभाळून ठेवून देऊ नका, ते वाढवा, पुष्कळ वाढवा. पण याच्या पुढची ओळ जरा डोक्यात न उतरण्यासाखी आहे - वृद्धं तीर्थेषु निक्षिपेत्| हे सर्व वाढवायचे ते कशासाठी? सत्कृत्यामध्ये खर्चण्यासाठी. पुष्कळ कमवा आणि सत्कृत्यामध्ये द्या. कारण की तोच पैसा तुमचा आहे. जेवढा पैसा सत्कृत्यामध्ये द्याल तेवढाच आपला. बाकी आपले काही नाही! बाकी सगळे इथेच ठेवून निघून जायचं आहे.
वाटेल तेवढे धन कमवाल, बँक अकाउंट येथेच राहते. गाडी - घोडे सुद्धा सगळे तबेल्यातून बाहेर यायचे नाही. पत्नी घराच्या उंबरठ्यापर्यंत, जन: स्मश्याने - हे सगळे तुमच्या घरी चहापाणी पिणारे स्मशानापर्यंतच! आणि ते सुद्धा मशानातच येतील आणि तुमच्या चित्तेवर विडी पेटून फुंकत बसतील. का तर एवढी चिता पेटत राहिलेली आहे मग उगाच एक आगपेटीची काडी फुकट का घालवा? अरे आयुष्यभर ज्याच्या सोबत राहिलात, ज्याच्यापाशी बसून लहानाचे मोठे झालात, पैसेवाले झालात त्या व्यक्तीला चितेवर ठेवले आहे त्यावेळी दोन असू देखील तुमच्या डोळ्यातून निघत नाहीत! उलट त्या ठिकाणी बसून लोक बाजार गप्पा करतात!
'त्यात काय रडायचे? त्यात कसला शोक करायचा?' जसे काही सगळे तत्त्वज्ञानी! अशी माणसे असतात.
एकदा का देह चितेवर जळू लागला की चहा कांदेपोहे सोबत खाणारे कोण मित्र येणार आहेत? कोणीही यायचा नाही. कर्माच्या सिद्धांतानुसार जीव एकटाच जायचा आहे. म्हणून जेवढी जास्त शक्ती आहे तेवढे कमवा. पण कशासाठी? सत्कर्मामध्ये वापरण्यासाठी.
पुष्कळ वैभव मिळवा. पण त्याचा संभाळ करण्याचे काम कष्ट वाटता कामा नये. ते व्रत्त असले पाहिजे.
वरील मजकूर जीवनाचे महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञान समजावून सांगतो. त्यात आर्थिक, सामाजिक आणि नैतिक दृष्टीकोनातून जीवन जगण्याची योग्य दिशा दिली आहे. मुख्य मुद्दे असे आहेत:
1. ज्ञान आणि संपत्ती यांची काळजीपूर्वक वाढ:
जसे विद्यार्थी क्षणोक्षणाचे मूल्य ओळखून ज्ञान मिळवतात, तसेच पैसा कमवणाऱ्याने पैशाचा प्रत्येक कण जपून वापरायला हवा.
"रक्षितं वर्धयेन्नित्यम्" – कमावलेल्या संपत्तीचे फक्त रक्षण न करता ते योग्य पद्धतीने वाढवले पाहिजे.
2. संपत्तीचा उद्देश:
संपत्ती वाढवायची ती केवळ स्वत:च्या फायद्यासाठी नाही तर सत्कर्मासाठी, समाजासाठी, योग्य कार्यासाठी वापरण्यासाठी.
खऱ्या अर्थाने "आपली" संपत्ती हीच असते जी सत्कृत्यांसाठी वापरली जाते.
3. आयुष्याचा अल्पकालिक आणि सत्य विचार:
संपत्ती, संपत्तीची साधने, नातेसंबंध – सगळे याच जगात राहून जाणारे आहेत.
मृत्यूनंतर कुटुंबीय, मित्र, वैभव कोणतेच तुमच्यासोबत येणार नाही.
कर्माच्या सिद्धांतानुसार प्रत्येकजण एकटाच प्रवास करतो.
4. सत्कर्मांचा महत्त्व:
धनाचा उपयोग सत्कर्मांसाठी झाला तरच त्याला खरा अर्थ आहे. अन्यथा, तो फक्त तात्पुरता संग्रह आहे.
व्यक्तीच्या जीवनाचा खरा मोल त्याच्या योगदानातून ठरतो, नुसत्या संपत्तीच्या संग्रहातून नाही.
5. समाजातील मानसिकता:
मृत्यूनंतर माणसाचे महत्त्व संपते. स्मशानातही नातलग किंवा मित्र आपले शोक व्यक्त न करता चहाच्या गप्पा मारतात. यावरून या जगाचे क्षणभंगुर स्वरूप कळते.
शिकवण:
जीवन संपत्ती, नातेसंबंध, प्रतिष्ठा यापलीकडे आहे.
कमवा, वाढवा, पण त्याचा उपयोग सत्कर्मांसाठी करा. कारण आयुष्यात शेवटी फक्त चांगली कर्मेच तुमच्यासोबत राहतील.
Comments
Post a Comment