संचार व खरा कर्मयोगी | Communication and a True Karma Yogi


         
     
आज भले आपल्यासाठी जीवन जणू काही कारावास वाटत असला तरी संचार करायला निघाल्यावर मग खूप सुख वाटू लागते. मग भगवंतच विचारतो की, 'कुठे निघाला?' माणूस सांगतो, 'संचार करायला निघालो.' 'कुठे जाणार आहेस?' 'सध्या मृत्यू लोकात चाललोय.' 'असे? तिथे काय करशील?' 'सर्वत्र फिरणार आहे. त्यात आनंद आहे.' त्याला कशाची चिंता आहे!
      
चोवीस चे चोवीस तास भगवंत देखील त्याच्याबरोबर फिरत असतो. तो बघत असतो की आपला लेक काय करतोय? जेथे फिरायला जाण्याची इच्छा असते तिथे जा असे जरी त्याला जगत पित्याने सांगितले असले तरी हळूच तो मुलाला विचारतो, 'तुला कुठे जायचंय? तू म्हणशील तिथे जाऊ. पण मीही तुझ्यासोबत येतो.' मुलाच्या इच्छेप्रमाणे बाप त्याला फिरायला घेऊन जातो. अशा प्रकारे इमाल्लोकान् कामांन्नी कामरूपी अनुसंचारन् अस्ते यात फार मोठा अर्थ भरला आहे. म्हणजे हे की ज्याला लगाम नाही, बंधन नाही असे फिरणे म्हणजे संचार. 

असतो मा सत गमाय| तमसो मा ज्योतिर्गमय| मृत्योर्माऽमृतन गमय|
     
हजारो जन्मापासून तपश्चर्या केली असेल तेव्हा हा माणूस 'जन्मसंसिद्ध' बनला असेल. आता किती जन्म ते प्रभुलाच माहित! पशुपासून सुरुवात करून आपले कितीतरी जन्म होतात; त्याच्यातून मानवी जन्म घेण्यासाठी कितीतरी तीव्र इच्छा केली असेल, उत्कट इच्छा बाळगली असेल तेव्हा कुठे माणूस जन्म प्राप्त होतो. आणि मानव जन्म मिळाल्यानंतरही विकास करता करता अनेक जन्म निघून जातात. अशा प्रकारे आज हा या सर्व परीक्षा मधून उत्तीर्ण होऊन असतो मा सत् गमय| बनला आहे. 'मी असत् होतो तो सत् झालो आहे' हा त्याचा महान आनंद आहे. 'मी विद्वान नव्हतो आता विद्वान झालो आहे' हा जसा मोठा आनंद आहे तसा 'मी आता ज्योती रूप बनलो आहे' हा अत्युच्च आनंद आहे. तमसो मा ज्योतिर्गमय| मी आंधार नाही, आता मी प्रकाश आहे. आता मी ज्योती रूप बनलो आहे. अशा प्रकारे त्याची अनेक वर्षाची मागणी, अनेक जन्माची उत्कट इच्छा आज पूर्ण झाली आहे. तो ज्योती रूप बनला आहे, कोळसा नाही, अग्नि बनला आहे.
     
कोळसा आणि अग्नी यामध्ये फरक आहे. अग्नी दुसऱ्याला बदलू शकतो. कोळशात दुसऱ्याला बदलण्याची ताकद नाही. अग्नी दुसऱ्याचा रंग बदलू शकतो. आता कोणी म्हणेल, 'शास्त्रीजी! सुद्धा दुसऱ्याचा रंग बदलू शकतो.' कोळशाच्या सानिध्याने रंग बदलत नाही तर डाग पडतात. आणि अग्नीच्या सानिध्याने रंग बदलतो. काळ्याचे लाल होतो. 'मी कोळसा नाही, मी अग्नीरूप आहे.' हा त्याचा सार्थ अभिमान आहे.
   
मृत्योर्माऽमृतं गमय| तो आता म्हणू शकतो की, 'मी अमृतमय आहे. मला घाबरवणारे सगळे खोटे आहेत आणि मला भिणारे सगळे अज्ञानी आहेत.' आपण अज्ञानी आहोत तोपर्यंत आपल्याला सगळे घाबरवतात. जरा काही झाले की आपण घाबरतो. शेजारी - पाजारी सर्व लोक आपल्याला घाबरवतच असतात आणि आपणही सर्व भीत भीतच जगत असतो. आपली सज्जनता ही भीतीपोटीच असते. 'लोक काय म्हणतील?' हे भय तर शेवटी आहेच. त्याचे कारणच मुळी हे आहे की, 'लोकभय.' माणसे अगदी सज्जन आणि प्रामाणिक असतात असे नाही. तरुण सुंदर स्त्री रस्त्यावरून जात असेल तर आपण मान वळून बघणार नाही, ते का तर लोक काय म्हणतील हे आपल्याला भीती आहे! आणि म्हणूनच मोटारी वगैरे वाहने रस्त्यावरून नीट चालतात! नाही तर पाच - पंचवीस मोटारी एकमेकांवर आदळून रोजच अपघात झाले असते. आपल्याला नैतिक बनवले आहे ते लोकांनी. आपल्याला सुसंस्कृत बनवल आहे ते या लोकांच्या भीतीने. सगळ्या प्रकारची भीती आहे तशी शेवटची भीती म्हणजे यमो निहन्ता पितृधर्मराजा वैवस्वतो दण्डधरश्च काल:| 

हे अंतिम भय आहे. सर्व प्रकारच्या भयाने आपण भरलेले आहोत. मृत्योर्माऽमृतं गमय| मात्र हे सगळे या पुरुषश्रेष्ठाला घाबरू शकत नाहीत. शनि - मंगळ त्याला घाबरवत नाहीत. तो त्यांना सरळ सांगू शकतो, 'तुम्ही तुमचे काम करा.' त्याला घाबरवू शकणारे असे कोणीही नाहीत. शनि - मंगळ कशाला, अहो आजूबाजूचे देखील कोणी त्याला भीती घालू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारच्या भयाने भिणारा असा हा माणूस नाही. खरी गोष्ट ही आहे की जो 'जगदीशा' चा झाला त्याला डर कसले? तुष्यन्ति च रमन्ति च| असे हे लोक बिनधास्तपणे जगात फिरत असतात.

वरील लेखन मनुष्याच्या आध्यात्मिक प्रवासाचे, त्याच्या आत्मज्ञानाचे आणि जगातील संचाराच्या महत्त्वाचे सुंदर वर्णन करते. या प्रवासामध्ये व्यक्ती आपल्या आतल्या आत्म्याला ओळखते, आपल्या आयुष्याला नवी दिशा देते आणि अंतिम सत्याच्या जवळ जाते. या संचारामध्ये तीन मुख्य टप्पे स्पष्ट केले आहेत:

1. संचाराचा आनंद:
माणूस जेव्हा जीवनाच्या बंधनातून मुक्त होतो, तेव्हा तो स्वतंत्र होतो आणि त्याला जगणे अधिक सुंदर वाटते. भगवंताच्या सहवासाने त्याचा आत्मविश्वास वाढतो, आणि त्याला जीवनातील बंधने उरल्यासारखी वाटत नाहीत.

2. आत्मज्ञानाची प्रगती:
"असतो मा सत गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्माऽमृतं गमय" हे वाक्य जीवनाच्या तीन मुख्य टप्प्यांचे प्रतीक आहे:

असत्यातून सत्याकडे जाणे.

अंधारातून प्रकाशाकडे जाणे.

मृत्यूपासून अमृतत्वाकडे जाणे.

माणसाने जेव्हा कोळसा (काळोख) सोडून अग्नी (प्रकाश) बनण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन बदलतो. अग्नीप्रमाणे तो दुसऱ्यांना बदलण्याची ताकद मिळवतो, आणि त्याच्या आत्मज्ञानामुळे तो अज्ञानी भीतींवर विजय मिळवतो.

3. भीतीमुक्त जीवन:
लेखात म्हटल्याप्रमाणे, माणूस भयमुक्त झाला तरच तो खरा कर्मयोगी बनतो. "लोक काय म्हणतील" याची भीती, यमाची भीती किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या भीतींवर तो मात करतो. भगवंताशी जोडलेली नाळ त्याला निर्भय बनवते, आणि तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो.

निष्कर्ष:

ही प्रक्रिया म्हणजे आध्यात्मिक मुक्तीचा प्रवास आहे, ज्यामध्ये माणूस केवळ स्वतःचाच नव्हे तर इतरांचाही जीवनमार्ग प्रकाशित करू शकतो. 'मी कोळसा नाही, मी अग्नी आहे' हा अभिमान आत्मविश्वासाचा स्रोत बनतो आणि त्याच्यातील खऱ्या कर्मयोगीचे दर्शन घडवतो.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन