भगवंताची कदर आणि सृष्टीतील संदेश | Value of God and the Message of Nature
वायू त्या माणसाला म्हणतो, 'अरे, उगवता सूर्य पुष्कळजण बघतात, वृक्ष वनस्पती सुद्धा पुष्कळजण बघतात. नदीवर पुष्कळ गुर वांसर न्हावून येतात. मात्र जगन्नाथांनी गंगेचा प्रभाव बघितला आणि त्यांना वाटलं, विलोलद्वानीरं तव जननि तिरं श्रीतवताम्| गंगामाईच स्नान करायला झाडून सगळे जातात. महादेवाचे दर्शनाला येणारा माणूस गंगेत एक वार तरी डुबकी मारून येतोच येतो. अशा प्रकारे गंगेत पुष्कळ गुरं वासरं न्हातात. मात्र अपि प्राज्यं राज्यं तृणमिव परित्यज्य सहसा म्हणणारा जगन्नाथच. तर अशा प्रकारे भगवंताची जी शोभा आहे, भगवंताचे सौंदर्य आहे त्याची कदर करणार तू आहेस आणि म्हणून तो मोठा आहेस असं वायू माणसाच्या कानात येऊन सांगतो.
आज लोकांच्या दृष्टीने अमुक माणूस मोठा याचं कारण त्याच्याकडे विद्या आहे, वैभव आहे, नाही तर अमुक एक आहे म्हणून! मोठा कोण? तर ज्याच्यासाठी आसमान ठेंगन झाले आहे तो मोठा मानला जातो. पण तो माणूस कधी खाली कोसळेल ते सांगता येणार नाही. हे लोक हमखास घसरून पडायचे. तर मग मोठा कोण? कदर करणारा मोठा. या सृष्टीची कदर करणारा तू आहेस, म्हणून तू महान आहेस. भगवंताचा हा संदेश आहे. वायू हा संदेश घेऊन येतो.
वायू प्रेमाचा संदेश घेऊन येतो की, 'तुला माहितीये बाळ! मी विश्वाला सांभाळतो.' तसं तर हे सर्वांना माहिती आहे, आबाल वृद्ध सर्वांना, ही विश्वाला संभाळणारा असा भगवंत आहे. पण याची जाणीव होताच आपल्या मनात आनंदाचे तरंग उठतात का? नाही ना! अहो भगवंत विश्वाला सांभाळतो याने मनात आनंदाचे तरंग उठले पाहिजेत. एखादा माणूस येऊन म्हणतो, 'शास्त्रीजी! मला गेल्या महिन्यापासून हजार रुपयाची पगार वाढ मिळाली.' आता यावर आपण असंच म्हणतो ना, 'असं! फार चांगलं! भगवंताची कृपा आहे.' पण असं बोलून आपण पुढे जातो. आपल्या मनात आनंदाचे तरंग उठत नसतात. मात्र असे आनंद तरंग त्याच्या आईच्या मनात किंवा त्याच्या बायकोच्या मनात उठत असते. अशा प्रकारेच विश्वाला संभाळणारा असा माझा भगवान आहे हे सगळेजण ऐकतात, वाचतात, घोकतात. पण त्याने आपल्या मनात आनंदाचे तरंगच उठत नाहीत आणि त्यामुळे स्नेहशीलता उपजतच नाही. आपण हसतो, बोलतो खरे पण त्यात अगदी काही असते. आता आमक्याला हजार रुपये पगार वाढ मिळाली आहे हे समस्त चाळीला ठाऊक असतं. ते मी जुन्या काळचे हजार सांगतोय! आज काल त्यांची किंमतही राहिली नसेल. आता ही बातमी सगळ्या शेजाऱ्या - पाजारांना आहे, पण त्याचा खरा आनंद होणारे दोनच माणसं! एक तर आई किंवा दुसरी पत्नी.
विश्वाला सांभाळणारा असा प्रभू हा 'माझा' प्रभू आहे या वाक्यातला 'माझा' हा शब्द अधोरेखित करण्याजोगा आहे. 'माझा' प्रभू विश्वाला सांभाळतो आहे हे जे कौतुक आहे ते आगळच. प्रेमाचा हा संदेश, स्नेहाचा हा संदेश वायू आणून देतो.
वायु प्रेमाचा स्पर्श करतो आणि भगवंत त्याच्यामार्फत संदेश पाठवतो की, 'बाळ मी, तुझ्यासाठी आहे अवघ्या विश्वात मी नाचतो, पण माझी नजर सतत तुझ्यावर आहे.' मुंबईत तुम्ही पत्नी फक्त स्वात: सोबत राहत असता. पण जेव्हा गावाला जातात तेव्हा गावचे आजोबा आधी कोणाची चौकशी करतात? काय म्हणतोस? आमचा बाळ कसा आहे? भगवंताच्या कुटुंबात याज्ञवल्क्य, वसिष्ठ म्हणू नका, वाल्मिकी म्हणू नका यातल्या कोणाची आठवण आपण काढतो? त्यांचं किती वर्णन होतं? वाल्मिकी यांना तर विसाव्या शतकात कोणी किंमतच देत नाही. तेव्हा मग भगवंतही असाच विचार करणार ना की, तुम्हाला तरी मी कशाला किंमत देऊ? मला काय गरज? जे माझ्या लाडक्या मुलांना मानत नाही त्यांना कशाला मी मानू? अशी आठवण काढतो काय माझ्या मुलांची कोणी? भगवंताची यावरच सगळ्यात आधी नजर आहे.
वायूमार्फत प्रेमाचा स्पर्श मिळतो. वायू प्रेमाने कानात येऊन सांगतो, 'बाळ, मी तुझ्यासाठी आहे.' हा आत्मियतेचा स्पर्श आहे. स्पर्श देखील निरनिराळे असतात. कधी मित्राला पण खांद्यावर हात ठेवत म्हणतो, चल, बॅडमिंटन खेळायला.' तर कधी स्पर्श विरोधकांचाही असतो. भगवंताने चांदूरमलाच्या खांद्यावरही हात ठेवला असेल की 'चल ये!' असा हात निराळा असतो, असा स्पर्श निराळा असतो. गुंडांचा स्पर्श असो, मित्राचा स्पर्श असो. पित्याचा स्पर्श असो, आईचा स्पर्श असो, बहिणीचा स्पर्श असो, पत्नीचा स्पर्श असो सगळ्या स्पर्शामध्ये फरक आहे. पण हा फरक जाणण्यासाठी त्यांची भाषा समजली पाहिजे. पण आपल्याला इतकी फुरसत कुठे? टका शेर भाजी टाक शेर खाजा! प्रत्येक स्पर्श निराळा आहे. पण स्पर्शातला तो फरक समजून घ्यायचा असेल तर एकान्ते सुखमास्यतां परतरे चेत: समाधीयताम्|
हे लेखन अत्यंत भावनिक, आध्यात्मिक आणि जीवनदर्शनाचा मार्ग दाखवणारं आहे. या लेखात तुम्ही भगवंताच्या अस्तित्वाची, त्याच्या कृपेमुळे निर्माण होणाऱ्या भावनांची, आणि सृष्टीशी जोडलेल्या नात्याची अप्रतिम मांडणी केली आहे.
लेखनातील मुख्य मुद्दे:
1. भगवंताची कदर करणं:
जो भगवंताच्या महानतेची जाणीव ठेवतो, त्याची कृपा ओळखतो, तोच खऱ्या अर्थाने महान आहे. गंगामाईचा प्रभाव ओळखणं, किंवा महादेवाच्या दर्शनासह त्याचं महत्त्व जाणणं, ही श्रद्धेची प्रतिकं आहेत.
2. सृष्टीची कदर करणं:
सृष्टीतील सौंदर्य, त्यात असलेली भगवंताची ऊर्जा आणि प्रेमाची ओळख करून घेणं, हीच खरी मोठेपणाची खूण आहे.
3. वायूचा संदेश:
वायूच्या माध्यमातून भगवंत आपल्याला प्रेम, आत्मियता आणि काळजीचा संदेश पोचवतो. ‘मी तुझ्यासाठी आहे’ हे वाक्य, मनातील प्रत्येक शंका, भीती काढून टाकतं.
4. स्पर्शाची भाषा:
प्रत्येक नात्याचा आणि भावनेचा स्पर्श वेगळा असतो. तो ओळखण्यासाठी संवेदनशीलता आणि समजूत आवश्यक आहे. हा मुद्दा जीवनाच्या विविध नात्यांमधल्या भावनांना अधोरेखित करतो.
हे लिखाण फक्त वाचण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहे. यातली प्रत्येक ओळ वाचकाला विचार करायला लावते आणि त्याला भगवंताशी आणि स्वतःशी जोडत राहते.
Comments
Post a Comment