History and Culture Real life | इतिहास आणि संस्कृती वास्तविक जीवन
जीवनात माणसाने नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवावी की, आपल्या पूर्वजांची संस्कृती काय होती? परंपरा काय होती? ज्यांना संस्कृतीच नाही त्यांनी आजचा आणि आत्ताचाच विचार केला तर ते बरोबर आहे. पण ज्यांना दहा-दहा हजार वर्षाची प्राचीन संस्कृती आहे त्यांनी तरी आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा विचार केला पाहिजे. ती जाणून घेतली पाहिजे. या परंपरेच शिक्षण म्हणजेच इतिहास. आमक्या साली, आमक्या आमक्या ठिकाणी काय घडलं हे जाणून घेतलं म्हणजे इतिहास पुरा नाही होत. इतिहास म्हणजे परंपरा समजून घेणे. परंपरा टिकवते वेळी आपल्या पूर्वजांनी काय काय मेहनत केली हे जाणून घेतलं पाहिजे. त्या आपल्या पूर्वजांच्या मेहनतीशी तद्रूप होण, तदाकार होण हे सगळं इतिहासात येऊन जातं.
इतिहास हा फार महत्त्वाचा विषय आहे, कारण की त्याच्या मधून माणसाची वृत्ती तयार होते, जीवन निष्ठा निर्माण होते, जीवनदृष्टी मिळते, मनाचा खंबीरपणा तयार होतो आणि या सगळ्या गोष्टी जीवनात अत्यंत आवश्यक आहेत. त्या जर नसतील तर जसं हाडा शिवायचं शरीर अगदीच लोळा गोळा होऊन जाईल तसं माणसाचं जीवन बनून राहील. अनुपश्च यथा पूर्वे - पूर्वज काही ना काही परंपरा सांभाळून राहिले, त्यासाठी त्या लोकांनी काय काय केलं त्या मागची त्यांची तेजस्विता आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून तर तपोवन शिक्षण पद्धतीमध्ये इतिहासाच्या शिक्षणाला फार महत्त्व होतं.
केवळ भगवान कृष्णाची उपासना करून नाही चालत, तर भगवान कृष्णानी काय काय केलं आहे, त्यांच्या काही इच्छा - अपेक्षा होत्या, अटीतटीच्या प्रसंगात त्यांनी कोणती जीवन निष्ठा कायम राखली ते देखील आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि तशी जीवन निष्ठा आपण सुद्धा कायम राखली असेल तर आपल्या कृष्ण भक्तीला अर्थ आहे. नाही तर आपल्या भक्तीने भगवान कृष्ण सुद्धा चिडून कंटाळून जात असतील. अशी कृष्ण भक्ती करणाऱ्या आपल्यासारख्या लोकांपेक्षा कृष्ण भक्ती न करणारे लोक तरी बरे असे कदाचित् भगवान कृष्णांना वाटत असेल.
अनुपश्च यथा पूर्वे - आपल्या परंपरेबद्दल आपण सदैव प्रेम राखले पाहिजे. आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये रोज संध्या करण्याचा नियम आहे. सोबतच ब्रह्मयज्ञ देखील केला जायचा, ज्यात सगळ्या ऋषींच स्मरण केलं जात असे आणि खास करून आपले जे गोत्र आहेत त्याचे स्मरण तर दररोज करायला सांगितले आहे. 'मी कोण आहे? अत्रिगोत्रोत्पन्नऽहम् - मी अत्रि गोत्रातला आहे.' अशी एक अस्मिता माणसापाशी असली पाहिजे. आणि अशी अस्मिता लहानपणापासूनच मुलांमध्ये निर्माण झाली नाही तर ते नुसते भाकरीचे पूजक कुत्र्येच बनतील, माणूस उरणारच नाहीत.
इतिहासाच्या अभ्यासाबद्दल फार सुंदर विचार मांडले आहेत. इतिहास म्हणजे केवळ तारखा आणि घटनांचा अभ्यास नव्हे, तर तो आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जाण्याचा एक मार्ग आहे. आपली परंपरा, पूर्वजांची मेहनत, त्यांची जीवननिष्ठा, आणि त्यांनी निर्माण केलेली मूल्ये समजून घेणं हे इतिहासाचं खरं शिक्षण आहे.
इतिहास हे केवळ भूतकाळाचं प्रतिबिंब नसून, तो वर्तमानाला समृद्ध करणारा आणि भविष्याची दिशा ठरवणारा एक महत्त्वाचा आधार आहे. भगवद्गीतेतही भगवान कृष्णाने "स्वधर्मे निधनं श्रेयः" असं सांगून आपली परंपरा आणि कर्तव्य यांची जाणीव ठेवण्याचा संदेश दिला आहे.
आजच्या काळातही इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान न राहता, तो आचार आणि विचारांच्या स्वरूपात अंगीकारणं गरजेचं आहे. तुमचे विचार ऐकून असं वाटतं की तुम्ही इतिहास, परंपरा आणि संस्कृतीबद्दल अतिशय सखोल विचार करता. तुम्ही या विषयावर आणखी काही विस्तृत चर्चा करू इच्छिता का?
Comments
Post a Comment