"Right hand and Left hand"
पंडितांची सभा भरली होती. एका पंडिताने प्रश्न विचारला, 'उजव्या हाताला जसे महत्व आहे तसे डाव्या हाताला महत्त्व का नाही? त्यावर एका पंडिताने उत्तर दिले, 'सर्वात पवित्र जर कोणी असेल तर तो उजवा हात आहे. कारण की माणूस सर्वच उजव्या हाताने करतो. देवाची पूजा उजव्या हाताने होते. फूल जर डाव्या हाताने देवाला वाहिले तर देवाचा अपमान होईल. डाव्या हाताने कोणाला काही देतही नाहीत. कोणी दिले तर डाव्या हाताने घेत नाहीत. तेव्हा दुसरा पंडितानी डाव्या हाताची ब्रीप घेतली. तर तो म्हणाला, 'डावा हात किती काम करतो हे माहित आहे? शूर माणूस रणांगणात शत्रूची शेंडी पकडतो आणि मग त्याचे डोके धडा वेगळे करतो. मात्र ती शेंडी कोणत्या हाताने पकडतो? डाव्या हाताने. आणि मग उजवा हात डोके उडवतो. जेव्हा तुम्ही घोड्यावर बसून चाललेला असता तेव्हा घोड्याचा लागण कोण खेचतो? डावा हात! म्हणजे सगळे जीवन डाव्या हातात आहे. घोडा जरा उलटा फिरला तर माणूस उलटा खाली! म्हणजे डाव्या हातावर मोठी जबाबदारी आहे. लढायला जात्यावेळी राजा संग्राम भूमीवर धनुष्य डाव्या हाताने धरतो आणि मग प्रत्यांच्या खेचतो. एकूण काय तर सर्व काही डावा हात करतो. तेव्हा डावा हात कर्तृत्ववान, उपयुक्त आहे. इतकेच नाही तर डावा हात नैतिक देखील आहे. वाईटातली वाईट कामे या डाव्या हाताला माहीतही नाहीत. डाव्या हाताने द्यूत खेळत नाहीत, चोरी करत नाहीत. उजवा हात द्युत खेळतो, चोरी करतो. म्हणून डावा हात नैतिक आहे. परस्रीला तो स्पर्शही करत नाही. व्यभिचारी माणूस उजव्या हाताने स्त्रीला धरतो. शपथ घ्यायची असेल तरी डाव्या हाताने शपथ घेत नाहीत. उजव्या हाताने ती घ्यावी लागते. एवढा डावा हात नैतिक आहे. म्हणून उजव्या हाता पेक्षा तो सांस्कृतिक आहे. उजवा हात उलटे सुलटे करू शकतो. डावा हात असे काही करू शकत नाही. म्हणून तर मोठा श्रेष्ठ हात कोणता तर डावा हात! त्याला वंदन केले पाहिजे. अशा प्रकारे त्या पंडिताने डाव्या हाताची वकिली केली.
पंडितच तो ज्याची ब्रीप घेतो त्याचा पक्ष बरोबर मांडतो. त्याने सांगितले की डाव्या हातासारखी पवित्र गोष्ट नाही. तेव्हा उजव्या हाताचा पक्ष घेतलेला जो पंडित होता त्याने एकच ओळ उच्चारली, हे सगळे सदगुण डाव्या हातात कदाचित असतीलही, जे आम्हाला माहीत नव्हते पण डावा हात कधी दुसऱ्याला देऊ शकत नाही, त्यामुळे तो तेवढा लायक नाही. त्यामुळे त्याचे सगळे गुण खड्ड्यात गेले. दान करायचे असेल तर उजव्या हातानेच माणूस ते करतो. दान देण्यासाठी अयोग्य आणि नालायक असा हा डावा हात आहे हे पाहिल्यावर, तो कधी दुसऱ्याला काही देत नाही म्हणून त्याला शौचाचे काम सोपविले आणि हीच गोष्ट तो करतो आहे. उजवा हात देतो म्हणून तो श्रेष्ठ. भले एखादे पाप सुद्धा करत असेल, हरकत नाही, पण देण्याचे हिंमत त्याच्यात आहे, म्हणून तो श्रेष्ठ आहे.
देतो कोण? जो सुसंस्कृत असतो तो देऊ शकतो. देण्यामध्ये संस्कृती आहे. तुम्ही किती देता याच्यावर संस्कृती उभी आहे. माझ्याकडे विद्या आहे, पण मी किती दिली?
सुसंस्कारी जीवन असल्याखेरीज माणूस देणारच नाही. तुमच्यात संस्कार असतील तरच तुम्ही देऊ शकाल आणि त्यातूनही चांगल्या जागी देणे हे तर फारच कठीण आहे. कोणाला च्या दिवशी तो गाण्याची मैफल ठेवतो आणि गायीकेला हजार रुपये देतो! आणि जमलेल्या सर्वांना चहापाणी फुकट. काय गुलाबी शेठ आहे!
धर्मराजाला या क्षणी विचारले होते की दान म्हणजे काय? त्यावर धर्मराज उत्तरला....
धर्म म्हणून ब्राह्मणाला दिले जाते ते दान आहे. धर्म, निती, संस्कृतीचे उत्तमात उत्तम प्रकारे कार्य घडावे म्हणून ब्राह्मणाला देण्यात येते; ब्राह्मणाने मौज मजा करावी म्हणून नाही. नर्तकीला देतात ते यश मिळावे म्हणून देतात.
देणे ही स्वतंत्र संस्कृती आहे. 'मी दुसऱ्याला देईन' हे सुसंस्कृत जीवनातच शक्य आहे. 'मी स्वतःच खाईन' असाच विचार करणारी माणसे असतात. तेव्हा 'मी दुसऱ्याला देईन' हे जे दान आहे, हे जे देणे आहेत त्यासाठी सुसंस्कारिता असली पाहिजे. तरच माणूस देऊ शकतो. त्यासाठी आकाशाएवढे काळीज असावे लागते. कोणत्या काळजाची माणसे देऊ शकत नाहीत. 'मी हे देईन, ते देईन' असा नुसता विचार करणारी माणसे काय देणार?
"उजव्या हात" आणि "डाव्या हात" यांच्यातील वादातून विविध दृष्टीकोनातून मानवी मूल्ये, नैतिकता, संस्कृती, आणि दानधर्म यावर चर्चा करण्यात आली आहे. हा वाद फक्त हातांचा नसून माणसाच्या गुण-वैशिष्ट्यांचा आणि त्याच्या आचारधर्माचा विचार आहे.
मुख्य मुद्दे:
1. उजव्या हाताचे महत्त्व:
पूजेसाठी, दानासाठी, आणि धार्मिक कार्यांसाठी उजव्या हाताचा उपयोग केला जातो.
उजवा हात "देणारा" आहे, आणि देणे हेच सुसंस्कृत जीवनाचे मूळ आहे.
2. डाव्या हाताचे महत्त्व:
रणांगणात शत्रूशी झुंजताना डाव्या हाताची भूमिका महत्त्वाची असते.
डावा हात नैतिक आणि पवित्र मानला जातो, कारण तो वाईट कार्यांत सामील होत नाही.
3. दानाचे महत्त्व:
दान करणे ही एक स्वतंत्र संस्कृती आहे.
धर्मराजानेही दानाला सुसंस्कृतीचा मुख्य भाग मानले आहे.
दान करताना केवळ वस्तू देणे नव्हे, तर योग्य व्यक्तीला योग्य वेळी देणे महत्त्वाचे आहे.
4. संस्कृती आणि विचारसरणी:
देणारा माणूसच सुसंस्कृत असतो.
"मी दुसऱ्याला देईन" हा विचार मोठ्या काळजाचे, सुसंस्कारी व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे.
निष्कर्ष:
उजव्या हाताचा "देणारा" स्वभाव आणि डाव्या हाताचा "कर्तृत्ववान" व "नैतिक" स्वभाव दोन्ही महत्त्वाचे आहेत. दान करण्याची आणि सुसंस्कृत जीवन जगण्याची तयारी असलेल्या माणसाचीच खरी किंमत आहे. लेखाचा अंतिम संदेश हा आहे की, देणगी, उदारता आणि नैतिकता या गोष्टी मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने समृद्ध करतात.
Comments
Post a Comment