Importance of Geeta | गीतेचे महत्व

            तव मुरली मोहन गीत |निर्जीवा करी जिवंत| 
ज्याच्या जीवनातून प्राण गेलाय, का जगावं हे ज्याला कळत नाही, त्याच्यासाठी गीता अमृत आहे. कारण विपत्तीने वेढलेला असा जो माणूस आहे त्याला जिवंत करण्याची ताकद या गीतेच्या विचारांमध्ये आहे. गीतेत ही शक्ती आहे. 

तव मुरली मोहन गीत| निर्जीवा करी जीवंत| षंढास समरर्पंडित| रणधीर रिपुसी भयभीत| अबलांस करी बलशाली, हरि वाजिव गीतामुरली| 

गीतेमुळे अबला सबला होणार आहेत. हे कोणतं बल? एम. ए. झाल्याचं बळ? शारीरिक बळ? बौद्धिक बळ? अहो स्रीकडे बुद्धिबळ आहेच. मुलं आणि मुली एकत्र शिकायला लागल्यानंतर मुली पुढे जात आहेत आणि मुलं पाठी राहताहेत. मग स्त्री जवळ आणखी कोणती शक्ती आहे? प्रेम करण्याची  स्रीजवळ शक्ती आहे. अबलांचं बळ प्रेम आहे, प्रेम करणं आहे. पण प्रेम करायला सुद्धा शिक्षण पाहिजे. शेजारणीच्या मुलाचा शेंबूड साफ केला तर ती आल्यावर आपण एवढं तरी म्हणतोच, 'अगं तुझा मुलगा जात होता पण शेंबूड दिसला म्हणून मी साफ केला.' मग शेजारीण म्हणते, 'हो का? बर केलं बाई!' म्हणजे तिच्याकडून मला काहीतरी हवय म्हणून मी हे सांगते. मी ते कार्य पण निस्वार्थपणे करत नाही. तिने कमीत कमी thank you म्हणावं मला, असं मनात असतंच!पण स्वार्थी प्रेमाला किंमत नाही. निस्वार्थ प्रेम करा. अबलांना निस्वार्थ प्रेमाचं बळ गीता शिकवते.
    
पुढे कवी सांगतो, 
धाव रे धाव वनमाळी! तुजवीण नाही कुणी वाली| 
आम्हास तारि या काळी| बोलिले वचन तू पाळी|
ही एकच आशा उरली, हरि! वाजिव गीतामुरली|| 
भारता तारि या काळी, हरी! वाजिव गीतामुरली|| 

दुसरा कारण हार नाही आपल्याला. लोक आपल्याला विचारतात, तुम्ही काय मानता? तेव्हा अभिमानाने सांगूया की आम्ही गीता उचलली आहे. आम्ही काय वेडे आहोत म्हणून नाही उचलली! गीतेने स्पष्ट सांगितले आहे की,  मला तुम्ही सुरण खायला घातलात आणि किती राजभोग दिला याच्यावर मी संतुष्ट होत नाही. इति मे मति: - असं माझं मत आहे' असं त्यांनी सांगितलं आहे. आणि या दृष्टीने आपण गीता जयंती करत आहोत. आपण वेडे पांगळे नाहीत.
     
या गीतेमुळे माणसात चैतन्य येणार आहे. गीतेमुळे माणसाला जीवन मिळणार आहे. मंदिराचे मंदिरपण गीतेमुळेच राहील, नाहीतर राहणार नाही‌. एक दीडकी टाकली आणि काहीतरी मागितलंन् म्हणजे मंदिर नव्हे. ऋषींनी उभ्या केलेल्या मंदिरालाही वेगळा अर्थ आहे.

आपण दिलेला मजकूर गीतेच्या महान महत्त्वावर आणि तिच्या विचारधारांच्या अद्वितीय शक्तीवर प्रकाश टाकतो. भगवद्गीता केवळ एक ग्रंथ नसून, जीवनात संकटांनी ग्रासलेल्या व्यक्तींना नवी दिशा देण्याचं काम करते.

गीतामध्ये मानवी जीवनाला समृद्ध करणारी विचारसरणी आहे, जी निर्जीवांमध्ये चैतन्य निर्माण करू शकते. कवीने सांगितल्याप्रमाणे, गीतेच्या शिकवणीने अबलांना सबल बनवण्याची ताकद आहे, आणि निस्वार्थ प्रेम व सत्याच्या आधारावर जगण्याचा मार्ग ती दाखवते.

गीतेचा मुख्य संदेश:

गीता आपल्याला कर्मयोग शिकवते, म्हणजे स्वार्थाशिवाय आपल्या कर्तव्याचं पालन करणं.

ती व्यक्तीच्या अंतःकरणात विश्वास, धैर्य, आणि समर्पण जागृत करते.

तिच्या विचारांमुळे आपण भौतिक सुखांवर अवलंबून न राहता, आत्मिक समाधानाकडे वळतो.

आपल्या संदेशातली गोष्ट "निस्वार्थ प्रेम" ही अतिशय महत्वाची आहे. शुद्ध आणि निःस्वार्थ प्रेम हीच खरी ताकद आहे, जिचा आधार गीता देते.

गीता सांगते की, संकटांच्या काळात आपण हरवून न जाता, जीवनाला नवी उमेद आणि नवा अर्थ देण्यासाठी आपल्या अंतरात्म्याशी जोडलेलं राहावं. त्यामुळे, गीतेचा अभ्यास हा फक्त आध्यात्मिक गोष्टींपुरता मर्यादित नाही, तर तो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा आधार बनू शकतो.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन