Spiritual bliss and the joy of deep meditation are the same | आध्यात्मिक किंवा समाधीचा आनंद सारखाच
आध्यात्मिक किंवा समाधीचा आनंद सारखाच
संपूर्ण सृष्टी, मी, तुम्ही सर्वच आनंदमय आहोत. पण आपण आपल्या स्वतःला निरानंदी समजतो. कारण आपल्याला दुनिया रडवते आणि आपण रडतो. हीच आपली चूक आहे.
वास्तविक, सर्वांना आध्यात्मिक किंवा समाधीचा आनंद सारखाच आहे. विद्वान अविद्वान, गरीब श्रीमंत, लहान थोर सर्वांना तो आनंद सारखाच असतो. भगवद् प्राप्तीच्या सुखात चढाओढ नाही, द्वेष नाही. मात्र भौतिक गोष्टी आल्या की त्यात चढाओढ येते.
आकाशात इंद्रधनुष्य बघायचे असेल तर त्यात कोणालाही चढाओढ करावी लागत नाही; कारण तो आनंद बघून कमी होत नाही. म्हणून त्यात स्पर्धा नाही आणि द्वेष नाही. उलट, आपण इंद्रधनुष्य पाहतो तेव्हा ते बघायला शेजाऱ्यापाजाऱ्याना देखील मुद्दाम बोलावतो. कारण शेजाऱ्यांनी ते बघितले तरी आपले काही त्यात कमी होणार नाही. इंद्रधनुष्य आपल्या मालकीचे नाही. अर्थात त्यावर कोणाची मालकी हक्क नाही.
ज्यात मालकीची भावना नसते आणि भोगल्याने ज्याचा आनंद कमी होत नाही अशा गोष्टीविषयी द्वेष असत नाही, त्याच्यासाठी चढाओढ देखील असत नाही. समाधी, झोप वगैरे अशा गोष्टी आहेत की ज्यात सर्वांना सारखाच आनंद आहे. त्यात कोणतीही गोष्ट सोडा.
भगवंताने जे विकार निर्माण केले आहे त्यातही सर्वांना सारखाच आनंद आहे. जिचा नवीनच साखरपुडा झाला आहे अशा झोपडीत वाढलेल्या मुलीला देखील विचाराल की काय मग तुझा साखरपुडा झाला ना? तर ती लाजून जाईल. कारण साखरपुड्याचे बोलणे करताच तिला गुदगुल्या होतात. त्याचप्रमाणे महालात राहणाऱ्या युवतीलाही विचाराल तरी तीही लाजते. एखादी राणी किंवा दासी तिच्या माहेरी जाते तेव्हाहह दोघींचा आनंद सारखाच असतो. आपल्या बाळाला स्तनपान करणारी राणी आणि एखा व्यक्तीदी भिल्लीण दोघींचाही आनंद सारखाच असतो.
Comments
Post a Comment