It is a journey of spiritual and human consciousness.


त्याचप्रमाणे तीर्थयात्रा म्हणजे काय? याचा विचार कर. पूर्वी येथून कच्छला जायला फार त्रास होत होता. तीन - तीन दिवस लागायचे. मी तसाही प्रवास पाहिला आहे. त्यामुळे प्रत्येकाला जाता येणे शक्य नसायचं. आता तसं काहीच राहिलं नाही. पूर्वी या कच्छी लोकांना मी विचारायचो बाबारे तू आपल्या गावी जातोस तेव्हा तुझ्या गावातल्या शेजाऱ्याला देखील भेटतोच ना; तू इथे मुंबईत गिरगावात राहत असलास आणि त्याचा मुलगा चिंचपोकलीला राहत असला तरी गावी जाताना त्या मुलाला भेटून येतोस आणि गावी गेल्या गेल्या त्याच्या वडिलांना भेटून सांगतोस, 'तुमचा मुलगा बरा आहे, सगळं आनंदात चालल आहे त्याचं! त्याला विचारलं, वडिलांना पत्र - बित्र लिहितोस की नाही? तो म्हणाला, 'नाही' तेव्हा त्याला सांगून आलो, पत्र लिहीत जा रे!' तशीच आहे तीर्थयात्रा! देवाला सांगायचं आपण की, देवा! मी पाचशे लोकांना भेटून आलो आहे. अहो, आपल्या मुलाची ख्यालीखुशाली घेऊन येणाऱ्या माणसाला बाप कमीत कमी चहा शिरा तर देणारच! तसेच तुम्ही जर देवाच्या लेकरांची ख्याली खुशाली विचारून आला तर देव का नाही काही देईल की नाही! अशा तीर्थयात्रेचा जिर्णोद्धार सगळ्यांनी परत करायला हवाय.

तत्वाचे सरले प्रेम| प्रेमाचे नुरले नाम| आज जीवनात तत्व काही नाहीच. तत्व फक्त पैसा - टका. देवाच्या दरबारात जायचं झालं तरी टका. शेजारी म्हणाला की, 'इतके दिवस श्रावण महिन्यात देवाजवळ जात होतास, काही फायदा झाला का? की आम्ही बसलो! कारण आमचं देवावर प्रेमच नाही. प्रेमाचं कुठे नावही नाही दिसत  यावर लोक काय म्हणतील, काय हो लव्ह स्टोरी शिवाय सिनेमा नाही‌. टी‌.व्ही. नाही, लेखन नाही. सगळीकडे ही Love ची लव लव चालली आहे‌. आणि तुम्ही लव नाही म्हणता? ते चालवले काय तुम्ही? अहो! हे love नाही, हे नर - नारीच असलेलं आकर्षण आहे. भले आपण त्याला love असं नाव देतो. पण हे आकर्षण टिकतं तोपर्यंत टिकतं. पुढे नाही टिकत.
     
प्रेम कशाला म्हणतात? येशू ख्रिस्ताने सांगितलं Love is God and God is love. मग तुम्ही सांगा, जे प्रेयसीवर करता चार दिवस आणि नंतर divorce घेता ते प्रेम देवाची विभूती आहे? आमच्या नारदभक्तीसूत्रात नारदमुनीने सांगितले आहे : 

सा त्वस्मिन् परमप्रेमरूपा| अमृतस्वरूपा च| 

हे कुठलं प्रेम? स्वार्थरहित प्रेम. असं स्वार्थरहित प्रेम कुठे दिसत नाही.
    
आम्ही एक दिवस का होईना देवा, निरपेक्ष प्रेम करायला जातो. ज्याच्याकडे जातो त्याच्याकडून काहीही घेत नाही. मला जे विचार ठाऊक आहेत ते ते मी दुसऱ्याला सांगेन. 

जे जे आपणासी ठावे| ते ते दुसऱ्याशी शिकवावे| बस! शहाणे करूनी सोडावे सकळजन| 

पण आपणच शहाणे नाही तर दुसऱ्याला शहाणे काय करणार.

ही गोष्ट माणसाच्या जीवनातील श्रद्धा, प्रेम, आणि त्याचा स्वभाव याबद्दल अतिशय महत्त्वाचा संदेश देते. तीर्थयात्रा म्हणजे फक्त देवाच्या दर्शनासाठी केलेला प्रवास नव्हे, तर ती एक आत्मिक आणि सामाजिक जाणीव आहे. पूर्वी तीर्थयात्रेसाठी लोकांना किती कष्ट सहन करावे लागत, हे लेखकाच्या वर्णनातून स्पष्ट होते. तीर्थयात्रेचा खरा उद्देश फक्त देवाला भेटणं नाही, तर देवाच्या सृष्टीतील इतर लोकांना भेटून त्यांच्या ख्याली-खुशाली विचारून त्याचा अहवाल देवाला सांगणं हा आहे.

लेखकाच्या म्हणण्यानुसार, प्रेम हे स्वार्थरहित असायला हवं. त्याला देवत्व प्राप्त होतं तेव्हा ते निखळ आणि निरपेक्ष असतं. मात्र, आजच्या काळात प्रेम हा फक्त आकर्षणाचा भाग राहिलेला दिसतो, ज्याचा परिणाम अल्पायुषी ठरतो. लेखकाने येशू ख्रिस्ताचं वचन आणि नारदभक्तिसूत्रातील वचनाचा संदर्भ देऊन, प्रेमाचं खऱ्या अर्थाने महत्त्व स्पष्ट केलं आहे.

यातील शेवटचा भाग, "जे जे आपणासी ठावे, ते ते दुसऱ्याशी शिकवावे," हा संदेश जीवनातील खूप मोठं सत्य सांगतो. आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी करणं, त्यांना चांगलं बनवणं, ही खरी तीर्थयात्रा आहे. लेखकाच्या दृष्टिकोनातून, तीर्थयात्रा ही केवळ धार्मिक बाब नसून सामाजिक, आध्यात्मिक आणि मानवी मूल्यांचं प्रतीक आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन