समतेचा झाला अंत | Equality has come to an end.


  

कलहाचे नाचे भूत| समतेचा झाला अंत| समता दिसतच नाही. अशी कशी येईल समता? अशी कधीच समता असणार नाही, खरं पाहिलं तर बुद्धीची समता असू शकत नाही. कर्तुत्वाची समता असू शकत नाही. पैशाची सुद्धा समता राहू शकत नाही. एखादा म्हणेल, 'तुम्ही सगळ्यांना सारखे पैसे देऊ.' वाटून बघा. चार लोकांना जर तुम्ही शंभर - शंभर रुपये दिलेत तर एक माणूस शंभर रुपये गुंतून त्याचे सव्वाशे करतो. हे सहास आहे. माझे पैसे दुसऱ्याच्या जवळ देणे हे सहासच आहे मोठे. दुसरा म्हणतो, आपले पैसे कोणाला द्यायचे नाहीत. आपल्या जवळच ठेवायचे. परहस्तगतं धनम् - दुसऱ्याच्या हातात पैसा गेला की खलास! म्हणून तो शंभर रुपये तसेच ठेवतो. पहिल्याचे सव्वाशे झाले तर याचे शंभरच राहिले. तिसरा माणूस म्हणतो, शंभर मिळाले आहेत ना! दारू प्या! आजचा दिवस मज्याकरुन घ्या! दूर्गुणांनी गुणांनी त्याचे पन्नास होतात. तर काही लोक आपल्याला शांती पाहिजे म्हणून त्या पैशाने ज्ञानेश्वरी विकत घेतात. ज्ञानेश्वरी सुद्धा dead investment आहे पैशाच्या दृष्टीने. तोही पन्नासावर आला! दारुड्याही पन्नासावर आला‌. आणि ज्ञानेश्वरी घेणाराही पन्नासावर आला. मात्र ज्याच्याजवळ सहास नाही तो शंभरावर राहिला. आणि एक मात्र सव्वाशेवर जातो. चारही जणांना सारखे पैसे देऊन, ते पैसे कसे वापरतात, त्याचा स्वभाव कसा आहे याच्यावर सगळा आधार आहे. तर अशी समता येईल का हो आर्थिक समता येईल का हो? शक्य नाही. रशियात सुद्धा आलेली नाही. मग कसली समता हवी आपल्याला?
    
एकेकाळी मंदिरात समता होती. जुन्या काळी आमची मंदिर होती तिथे श्रीमंत असो गरीब असो सगळे सारखे बसत होते. आता मिनिस्टर आला तर त्याला पहिल दर्शन. समता गेली आहे. म्हणून नात्याचा संबंध उभा करायला हवा. तर सांगता येते. तुमच्या घरी लहान मुल असेल ना! तुमची आणि त्याची बुद्धीसारखी नाही, पण तुम्ही एक आहात, कारण तिथे नातेसंबंध आहे. नवरा पी.एच.डी आहे, बायको नाॅनमॅटरीक आहे. आता उलट बायको पी.एच.डी आहे आणि नवरा नॉनमॅट्रिक आहे असंही शक्य आहे. आता सांगा, इथे कुठे आली बौद्धिक समता. तरी आपण एक राहतो कारण नातेसंबंध आहे.
      
गीता ही भगवंताचे नातं समजावते. विश्वाशी पण नातं समजावते. म्हणून गीता आपल्याला हवीये. आम्ही कोणीही असू, कसेही असू, श्रीमंत असू, गरीब असू, पण एका भगवंताची लेकरे आहोत. याचंच नाव स्वाध्याय. या समते करिताच आपण स्वाध्याय करायचा आहे.

वरिल लेखात समतेच्या संकल्पनेवर अत्यंत विचारशील आणि वास्तववादी दृष्टिकोनातून चर्चा केली आहे. लेखकाने स्पष्ट केले आहे की, परम समता बुद्धी, कर्तृत्व, संपत्ती, किंवा स्वभावात साध्य होणे अशक्य आहे, कारण व्यक्तींच्या गुणधर्मांवर आणि त्यांच्या कृतींवर सर्व काही अवलंबून असते.

मुख्य मुद्दे:

1. आर्थिक समतेचा अभाव:

समान पैसा दिल्यास प्रत्येक व्यक्ती त्याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करते, ज्यामुळे कधीच आर्थिक समानता साध्य होऊ शकत नाही.

काही लोक पैशाचा सदुपयोग करतात, तर काही त्याचा वायफळ खर्च करतात. त्यामुळे शेवटी आर्थिक अंतर टिकून राहते.

2. बौद्धिक समतेचा अभाव:

व्यक्तींच्या ज्ञान आणि बुद्धीच्या स्तरामध्ये देखील भिन्नता असते. जसे की, एका कुटुंबात पीएच.डी केलेला नवरा असेल आणि पत्नी नॉन-मॅट्रिक असेल, तरीही ते एकत्र राहतात कारण ते नात्याने जोडलेले असतात.

3. प्राचीन समाजातील समता:

पूर्वी मंदिरांमध्ये सामाजिक समता होती. गरीब-श्रीमंत भेदभाव न करता लोक एकत्र येत. पण आता समाजातील भेदभाव मंदिरांमध्येही पोहोचला आहे.

4. गीतेचे तत्त्वज्ञान:

गीता आपल्या सर्वांना एकत्र बांधणाऱ्या नात्याची जाणीव करून देते. आपण भिन्न असलो तरी, भगवंताची लेकरे म्हणून एकमेकांशी जोडलेले आहोत.

हा दृष्टिकोन स्वाध्यायातून (आत्मपरीक्षणातून) विकसित होतो.

शेवटी संदेश:

समतेचा आधार आर्थिक, बौद्धिक, किंवा कर्तृत्वामध्ये शोधण्याऐवजी, आपल्यातील नात्यांमध्ये समता निर्माण केली पाहिजे. हीच खरी समता आहे, जी आपल्याला जोडून ठेवते आणि समाजात शांती निर्माण करते.

समता ही निसर्गाच्या आणि व्यक्तीच्या स्वभावाच्या मर्यादेपर्यंतच शक्य आहे. पण नातेसंबंध आणि आध्यात्मिक दृष्टिकोन यांतून ती अधिक जवळ येऊ शकते.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन