कमवा आणि खर्च करा | Earn and spend
अशा प्रकारे ज्याने स्वतःचा आनंद मिळवला, हा जो आनंदमय आत्मा आहे त्याच्याशी तादात्म्य पावून, म्हणजेच ज्याने शरीर भगवंताचे समजून दैवी बनवले, प्राण दैवी बनवला, प्राणाकडे बघण्याचा दृष्टिकोन दैवी बनवला, मन भव्य आणि दिव्य बनवले, भौतिक विद्यांकडे देखील ईश्वरी दृष्टीने आणि ईश्वराच्या कामी उपयोगी या दृष्टीने पाहू लागला. त्याचप्रमाणे ईश्वर भक्तीचा आनंद आणि स्वतःचा आनंद इथपर्यंत याची आनंदाची व्याख्या आली, असा माणूस या लोकी, म्हणजे केवळ पृथ्वीवरच नाही, भू: लोकी किंवा भुव: लोकी गेला तरीही सत्कार आणि स्व: लोकी गेला तरी सत्कारच प्राप्त करतो, तसेच चतुर्दशभुवनामध्ये इमाल्लोकान् अनुसंचारन् अस्ते|
एक वेळ अशा प्रकारची मेहनत करा आणि नंतर सृष्टीमध्ये फिरत रहा. मग सृष्टीत शोभा बघत फिरा. खूप पैसा कमावलेला माणूस असतो त्याला फक्त विचार करण्याची खोटी की आता कुठे जायचे? यावर्षी महाबळेश्वर, नाहीतर उटीला जाऊ. दुसरा त्याला धंदाच नाही. उटीमध्ये बसल्या बसल्या विचार करतो की पुढच्या वर्षी कुठे जायचे? सिमला! कारण काही कमवायचेच राहिलेले नाही. धंदा करायची कटकट नाही, मेहनत करायची कटकट नाही. कमावलेले वापरायचे आहे. दुसरे आहे काय? दुसरे काही कामच नाही. विचार सगळे हेच की, 'कुठे जायचे?' इकडे सगळीकडे फिरून झाले तर 'चला उद्या स्विझर्लंडला!' अशाप्रकारे उद्या, परवा काही ना काही ठरवायचे आणि फिरत राहायचे. हा माणूस भगवंताच्या दरबारातला पहिल्या पंक्तिचा अधिकारी आहे. हवे तिथे तो फिरत असतो.
नारदमुनी सर्वत्र फिरत असायचे. नारदांसारखे जे देवर्षी आहेत ते असे फिरत असतात. देवर्षी म्हणजे लोकांना देव बनवायला निघालेले. ते फिरतात याचसाठी की ते प्रत्येकाला समजावत असतात की, 'अरे वेड्या तू देव आहेस. तू क्षुद्र नाहीस, तू देवाचा आहेस.' ते सांगणारे ते देवर्षी. ते कोणत्याही ठिकाणी फिरू शकतात. झोपड्यांमध्ये फिरतात तसे महालामध्ये फिरतात. जसे पृथ्वीवर फिरतात तसे स्वर्गात फिरतात. कोणत्याही ठिकाणी अनुसंचारन् अस्ते| संचार कशाला म्हणायचे? कुठे आडकाठी नसतेस त्याला. तुम्ही इथे कसे आलात? असे त्यांना कोणी विचारू शकत नाहीत. आणि 'तुम्ही केव्हा जाणार?' हेही विचारू शकत नाहीत. त्याला संचार म्हणतात. हा मोठ्या लोकांचा संचार आहे.
या सृष्टीत किती दिवसासाठी आलो आहोत ते कोणी सांगू शकत नाही. लोक म्हणतात, श्रीमद् आद्य शंकराचार्य लवकर गेले' कुणी सांगितले तुम्हाला? नाही पण आणखी पाहिजे होते.' तुम्हाला पाहिजे होते. त्यांची किती इच्छा असेल, माहित नाही. त्यालाच अतिथी म्हणतात की जो आपल्या घरातून गेल्यावर आपल्याला घर सुनेसुने वाटते. रिकामे वाटते. त्याला ज्यावेळी जायचे तो त्यावेळी जातो. यात काही चुकीचे नाही. श्रीमद् आद्य शंकराचार्य लवकर गेले! बिलकुल नाही. ते त्यांच्या वेळेवरच गेले. फक्त आम्हाला त्यात गैर वाटते, हे त्यांचे कर्तृत्व आहे. काही पाहूणे आपल्या घरी येतात आणि ते गेल्यावर त्या दिवशी आपल्याला म्लानता येते. आज आपल्या घरातून ते गेले हे चांगले झाले नाही असे वाटते.
वरील मजकूर आत्मशुद्धी, ईश्वरप्राप्ती, आणि जीवनातील सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत व्यावहारिक जीवन जगण्याचा संदेश देतो. त्यात अध्यात्मिक दृष्टीकोनातून जीवनाचा अर्थ सांगितला आहे, जिथे कष्टाने मिळवलेले धन व साधने उपभोगत स्वतःचा आणि इतरांचा आनंद साधायचा आहे.
यामध्ये एका समतोल जीवनशैलीची कल्पना मांडली आहे, जिथे आपण भौतिक व आध्यात्मिक जीवनाचा योग्य प्रकारे संगम साधतो. उदाहरणार्थ, नारदमुनींचा उल्लेख करताना ते फक्त फिरत नव्हते, तर लोकांना देवत्वाची जाणीव करून देण्यासाठी फिरत होते, हे सांगण्यात आले आहे. हा संदेश सांगतो की, आपण आपले जीवन कसे अधिक अर्थपूर्ण आणि आनंददायी बनवू शकतो.
प्रमुख मुद्दे:
1. कमवा आणि खर्च करा: कष्ट करून मिळवलेले धन उपभोगा, पण तो उपभोग केवळ स्वार्थी न राहता दिव्य दृष्टिकोनातून असावा.
2. सृष्टीतील सौंदर्याचा आनंद: सृष्टीचा आस्वाद घेण्यासाठी कधी-कधी विश्रांती घेणे आणि स्वतःचा आनंद शोधणे गरजेचे आहे.
3. नारदमुनींचे उदाहरण: स्वतःचे कार्य आणि ध्येय उन्नत ठेवून सर्वत्र फिरत, लोकांना योग्य मार्गदर्शन करण्याची वृत्ती अंगी बाणवावी.
4. संचाराची स्वातंत्र्य: जिथे कोणत्याही प्रकारची अडचण नसते, अशा उन्नत अवस्थेला पोहोचण्याचा प्रयत्न करावा.
या जीवनदृष्टीने आपण भौतिक आनंद व आध्यात्मिक समाधान यांचा समतोल साधून परिपूर्ण जीवन जगू शकतो.
Comments
Post a Comment