Air is pleasant | वायू रमणीय आहे
भगवंताचा स्पर्श प्रेमाचा आहे, आत्मियतेचा आहे. 'बाळ मी तुझा झालो आहे' असा भगवंताचा संदेश घेऊन रोज वायू निघतो. म्हणून खरा रमणीय जर कोणी असेल तर तो वायू होय. तदेव रूपं रमणीयम् असं आमचे पंडितही सांगतात. तो क्षणोक्षणी नवा वाटतो, रोजच्या रोज नवा वाटतो. रमनियता म्हणजे काय? जो क्षणोक्षणी नवनवीन वाटतो तदेव रूपं रमणीय असा रमणीय वायू आत्मियतेचा स्पर्श, अज्ञातेचा संदेश घेऊन येतो की ज्यात भगवंत म्हणत असतो, 'मी तुझा आहे!'
भगवंता! तू फक्त माझा कसा असेल? शेकडो लोकांना तू सांभाळतोस. मला एकट्यालाच थोडा सांभाळतोस. पण भगवंत म्हणत असेल, 'अरे तुला काय माहिती!' एखादा शेठजी आपल्या घरवालीला जेव्हा सांगतो की, मी दहा माणसं पोहोचतोय.' यावर जर ती म्हणाली, 'अहो कशासाठी पण?' तर हा सांगतो आग, वेडे, तुझ्यासाठी! तुझ्यासाठी त्यांना पोहोचतोय. तुला उपयोगाला यावेत यासाठी. आज उपयोगी नाही आले तर उद्या कधीतरी उपयोगी पडतील यासाठी. काही शेठजी आज उपयोगी पडावेत म्हणून माणसं पोहोचतात. तर काहीजण उद्या उपयोगी पडतील म्हणून माणसं पोहोचतात. अशा प्रकारेच भगवंत सांगतो की, मी संपूर्ण विश्व पोचतोय सांभाळतो ही गोष्ट खरी आहे पण बाळ त्यांचं कारण ठाऊक आहे का? तुझ्यासाठी. तुला सहाय्य होईल यासाठी तुला उपयोग होईल यासाठी. खरोखर ही गोष्ट निराळीच आहे.
तेव्हा हा आत्मियतेचा स्पर्श आहे की, 'बाळ मी तुझा.' आता एखादा म्हणेल, देव काय खरंच असं बोलत बसला असेल की, 'बाळ मी तुझा, मी तुझाच आहे.' अशी शंका येणार रास्त आहे. भटजीबुवा प्रत्येक यजमानाला म्हणतात, 'तुमच्यासारखा दाता दुसरा कोणीही नाही. तुम्ही जितकं देता ना, दुसरा कोणीही देत नाही.' जवळजवळ प्रत्येक यजमानाकडे हे भटजीबुवा ही एकच भाषा बोलत असतात, 'तुमच्यासारखे तुम्हीच! तुमच्यासारखा जगात दुसरा आढळणार नाही.' अरे कपाळ! अशा तऱ्हेने भगवंत सुद्धा 'मी तुझा आहे.' असं सगळ्यांना सांगत फिरतो असं वाटेल एखाद्याला. माणूस म्हणूनच म्हणतो, 'देवा, सगळ्यांना तू पोसतोस, मग मला का नाही?' भगवंत यावर म्हणतो, 'अरे बाळा! तुला खरी मेक ठाऊक नाही.' शेठजी कुटुंबात पाच पाच नोकरांना पोहचत असतो. त्यांना कपडे - लते देतो. खाऊ पिऊ घालण्याची सगळी सोय - सुविधा करतो. आता हे कशासाठी? त्याच्या वेळेला उपयोगी पडावेत तेवढ्यासाठी. या जगात पुष्कळदा बादलीभर पाहण्यासाठी ही माणसं असतात, ज्यांना भगवंत प्रेमाने पोसत असतो.
हे जे काही चाललेलं आहे ते, भगवंत सांगतो, 'काय सांगू बाळ! हे सगळं तुझ्यासाठी आहे. तुला नवनवी रूप बघायला मिळावं, तुला विविध अंगी सौंदर्य बघायला मिळावं, तुझ्या उपयोगी पडाव एवढ्यासाठी.' भगवंताचा हा संदेश प्राणवायू येऊन सांगतो. ही जी भाषा आहे ती आगळीवेगळी आहे. आणि ही या वायूची भाषा आहे, जी वायू सोबत आत्मिय संबंध बांधलात तरच समजते. हे मोठ्या माणसाचं लग्न आहे. मोठ्या माणसांच्या लग्नाची गोष्ट आहे. भगवंत आणि भक्तांनी परस्परांना पाठवलेल्या प्रेम पत्रांची ने - आन करणारा असा हा वायू आहे.
सगळ्यांपेक्षा सीता मातेला प्रिय कोण असेल? सगळ्यांच्या पेक्षा हनुमान. का? तर त्याने लंका जाळली म्हणून? चे! तर? पतीचा संदेश घेऊन पहिला पहिला आला तो हनुमानच म्हणून. त्याने सीतेला येऊन रामाचा संदेश दिला की, 'घाबरू नकोस, आता मी आलो आहे.' म्हणून तर सीतेच्या काळजाचा तुकडा होता. हनुमान अशाच प्रकारे वायू सुद्धा भगवंताचा संदेश घेऊन येतो. अशा वायूची शक्ती किती याच्यावर बोलण्याची, त्याचं अध्ययन करण्याची त्याच्यावर टीका करण्याची, तुमची आमची लायकी नाही. आपण फक्त वायूला नमस्कार करण्याचे अधिकारी! तेव्हा हा जो प्रतिरूपो बहीश्च असा जो अलौकिक निरामय परमेश्वर आहे त्याला समजून घेण्यासाठी वायूच आपल्याला सहाय्यकारी होवो अशा अपेक्षेसह वायूला नमस्कार करूया
ही लेखमाला वायूची महती आणि त्यामागील तात्त्विक अर्थ प्रभावीपणे मांडणारी आहे. वायू हा नुसताच नैसर्गिक घटक नाही, तर भगवंताचा संदेशवाहक आहे, आत्मीयतेचा स्पर्श आहे, असा या लेखाचा मूळ विचार आहे. वायूच्या क्षणोक्षणी नव्याने जाणवणाऱ्या स्वरूपातून भगवंताची नित्य नवीनता आणि प्रेमाचा स्पर्श प्रत्ययाला येतो.
मुख्य विचारांचे सार:
1. वायूचे रमणीय स्वरूप
वायू क्षणोक्षणी नवा वाटतो; त्याचे रमणीय रूप भगवंताच्या सतत नव्या प्रेमाचा अनुभव देते.
2. भगवंताचा आत्मीय स्पर्श
भगवंत प्रत्येकाला सांगतो की, "मी तुझा आहे." हा प्रेमाचा संवाद वायूच्या माध्यमातून पोहोचतो.
3. संदेशवाहक वायू
वायू हा फक्त हवेचा प्रवाह नाही; तो भक्त आणि भगवंत यांच्यातील प्रेमाची देवाणघेवाण करणारा संदेशवाहक आहे.
4. सीता-हनुमान उदाहरण
जसे हनुमान रामाचा संदेश घेऊन सीतेकडे गेला, तशीच भूमिका वायूही भक्त आणि भगवंत यांच्यातील संवाद घडवण्यात बजावतो.
कृपादृष्टीचा अनुभव देतो.
शिकवण:
वायूला फक्त नैसर्गिक शक्ती म्हणून पाहण्याऐवजी भगवंताशी जोडणारा माध्यम म्हणून पाहणे, हे आपल्याला त्याचा खरा गूढ अर्थ समजून घेण्यास मदत करते. वायूची स्तुती म्हणजे भगवंताच्या सगुण-निर्गुण रूपाची अनुभूती आहे.
वायूला नमस्कार करणे म्हणजे भगवंताच्या प्रेमाच्या आणि दयाळूपणाच्या संदेशाला स्वीकारणे.
Comments
Post a Comment