Bharata tari ya kaali, kaali hari vajiva Geetamurali | भारता तारि या काळी, काळी हरि वाजिव गीतामुरली



शोध लागल्यानंतर माणसाने त्यावर अधिक काम केलं. त्या लोकांच्या कामाला मी कमी लेखत नाही. पण हे 'देवदत्त' आहे. देवानी दिलेलं आहे. आता ही इलेक्ट्रिसिटी देवांनी दिली आहे ती माणसाचं जीवन सुखी व्हावे म्हणून दिली आहे. मात्र यात तुम्ही मात्र भौतिक जीवन बघायला लागलेत. आता या इलेक्ट्रिसिटीत, या पंख्यात ही ताकद आहे का, की तो 'आईवर प्रेम करावं' असं सांगेल? दुसऱ्यावर प्रेम करावं असं तो सांगेल? ती ताकद त्याच्यात नाही. पण प्रेमाशिवाय जीवन व्यर्थ आहे. म्हणून आपल्यातल्या ज्ञानसंपन्न लोकांनी असं सांगितलं आहे : हरि वाजिव गीतामुरली|
      
केवळ भौतिकवादी विचारसरणीचा पुरस्कार करणारी अशी ज्या वेळेला स्थिती येते तेव्हा मग काय कराल? हरि वाजिव गीतामुरली| तेच गीतेना संस्कृतात म्हटलंय अध्येष्यते च य इमं धर्मं संवादमावयो:| देवाच्या हातात मुरली तर आहेच. पावा आपण पण वाजवतो आणि लोकांचं मनोरंजन करतो तेव्हा दिङमूढ होतात लोक. पण आम्हाला जो पावा पाहिजे, आम्हाला जी मुरली पाहिजे, आम्हाला जी मुरली पाहिजे ती ज्ञानाची मुरली पाहिजे. हरि वाजिव गीतामुरली| देवा! परत एकदा वाजवशील का रे ती गीतामुरली!
 
 भारता तारि या काळी, काळी हरि वाजिव गीतामुरली|
 कलहाचे नाचे भूत| समतेचा झाला अंत|
 पडलेच ज्ञान बंदीत| हे सत्य करी आकांत|
 न्यायश्री अश्रू ढाळी, ढाळी हरि! वाजिव गीतामुरली||
 लोकांस कळेना वर्म| मानिती अधर्मा धर्म|
 तत्त्वाचे सरले प्रेम| प्रेमाचे नुरले नाम|
 अज्ञाने जनता भरली, भरली हरि| वाजिव गीतामुरली||
 तव मुरली मोहन गीत| निर्जीवा करी जिवंत|
 षंढास समरपंडित| रणधीर रिपुसी 
 भयभीत |
 अबलास करी बलशाली, शाली हरि|वाजीव| गीतामुरली||
 करी स्वजना विक्रमशाली| धैर्याची झडूं दे भेरी|
 नाचू दे धर्मबल समरीं| ताडुनी अधर्मा वारी|
 होऊ दे सत्य जयशाली, शाली हरि| वाजिव गीतामुरली||
 धाव रे धाव वनमाळी| तुजवीण नाही कुणी वाली|
 आम्हांस तारि या काळी| बोलिले वचन तू पाळी|
 ही एकच आशा उरली| उरली हरि| वाजिव गीतामुरली||
  असा समाज झाला आहे, की गीतामुरली हवीय आम्हाला! कवीने सांगितले आहे, देवा! ही गीतेची मुरली आम्हाला का हवी आहे?

 कवीने "गीतामुरली" या प्रतीकाच्या माध्यमातून समाजातील मूल्यांची, प्रेमाची, आणि सत्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक अधःपतनावर प्रकाश टाकताना कवी म्हणतो, की आधुनिक जगातील भौतिक प्रगती असूनही आपण प्रेम, तत्त्वज्ञान, आणि समतेसारख्या मूल्यांपासून दूर जात आहोत.

"गीतामुरली" ही एक प्रतिमा आहे - ज्ञान, सत्य, आणि प्रेमाची. कवीने देवाकडे आर्जव केले आहे की, तो पुन्हा एकदा आपली "मुरली" वाजवावी, म्हणजे समाज पुन्हा प्रेम, सत्य, आणि नीतिमूल्यांकडे वळेल. ही मुरली म्हणजे केवळ भौतिक सुखासाठी नसून, जीवनाचे खरे सार शिकवणारी आहे.

कवीच्या आर्जवामागील कारणे:

1. कलहाचा उदय: समाजात मतभेद, कलह, आणि अधर्म वाढत चालला आहे. त्यामुळे समता आणि प्रेम हरवत आहे.

2. ज्ञानाची उपेक्षा: माणसाने भौतिक प्रगती केली असली तरी ज्ञानाचा योग्य उपयोग केला जात नाही.

3. न्यायाचा अंत: अन्याय वाढत आहे आणि समाजात न्याय आणि सत्य यांची किंमत उरलेली नाही.

4. प्रेमाचा अभाव: प्रेमाशिवाय जीवन निरर्थक आहे, आणि त्याचा सन्मान करण्याची गरज आहे.

5. आध्यात्मिक गोंधळ: लोकांमध्ये अध्यात्मिक शांती हरवली आहे, आणि त्यामुळे समाज अज्ञानाच्या अंधःकारात बुडत आहे.

गीतामुरलीचे महत्त्व:

गीतामुरली हे सत्य आणि ज्ञान यांचे प्रतीक आहे. ती माणसाला प्रेम, समता, आणि नैतिकता यांच्याकडे वळण्याची प्रेरणा देते. "हरि वाजिव गीतामुरली" हा घोष हीच मागणी आहे की, देवाने पुन्हा ज्ञान आणि सत्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा.

निष्कर्ष:

कवीने सांगितले आहे की, समाजाला आज "ज्ञानाची मुरली" हवी आहे जी अज्ञान, अन्याय, आणि अधर्म दूर करेल. त्यासाठी कवी देवाला विनंती करतो, की तो आपले दिव्य संगीत पुन्हा वाजवून मानवतेला मार्गदर्शन करावा.



 393         कलहाचे नाचे भूत
कलहाचे नाचे भूत| घराघरात कलह चालू आहेत. वैयक्तिक जीवनात सुद्धा झगडा आहे. आज गीता जयंती आहे म्हणून, मग पाठशाळेत गीतेच्या प्रवचनाला जाऊ की सिनेमाला जाऊ? हा झगडा आहे. सरतेशेवटी गीतेवर आपलं प्रेम असलं तरी कॉम्प्लिमेंटरी पास मिळाला आहे तर सिनेमालाच जाऊ, गीता जयंती काय पुढल्या वर्षीही येईल! हा सिनेमा परत मिळणार आहे थोडाच! हा कलह आहे आतल्या आत माणसाच्या मनात  कलहाचे नाचे भूत| हे भूत नाचते आहे सगळीकडे. कलह - कलह घराघरात कलह. वैयक्तिक जीवनात कलह आहे तसाच सामाजिक जीवनातही कलह आहे‌‌. मी ब्राह्मण, तू हलका, तो आमका अशा सगळ्या भेदांनी आम्ही भरलेले आहोत. असे निरनिराळ्या भेदांनी भरलेले आपण या भेदांमधून निघणार कसे? सरतेशेवटी जातीयवाद काढा म्हणून प्लॅटफॉर्मवरून सांगणारे आहेत ना तेही जातीवादानेच माणसाला उभे करतात ही शोकांतिका आहे. तेव्हा कलहाचे नाचे भूत| सगळीकडे कलह दिसतो. अगदी कौटुंबिक जीवनातही कलह. पती-पत्नीत झगडेच दिसतात. Adjustment करून राहतात एवढंच! प्रेम असेल कितपत कुणास ठाऊक! Adjust होतो तो महिलावर्ग, पुरुष होत नाही असं मी म्हणणार नाही, पण कमी होतो. Marriage is an adjustment. आपण सगळेच adjustment करतो. कलहाचे नाचे भूत. आणि राजकारणात सुद्धा कलह शिवाय दुसरं काही नाही. नाहीतर एवढ्या पार्ट्या हव्यात कशाला. सगळ्यांना दारिद्र्य दूर करायचं आहे. सगळ्यांना अमक आणायचं आहे. सगळ्या राजकीय पक्षांची घोषवाक्य बघा, सगळी एकच! मग तुम्ही वेगळे का? हा प्रश्न कुणीतरी त्यांना विचारला पाहिजे. राजकारणात तर पराकोटीचा कलह आहे. मात्र त्यांच्या हातात आमची शेंडी आहे. मग देवा! आम्ही यातून कसे सुटणार? कलहाचे नाचे भूत| अशी स्थिती आहे की ही स्थिती इलेक्ट्रिसिटी सुधारेल काय? हे विज्ञान त्यात काही करेल का? म्हणून हरि! वाजिव गीतामुरली

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन