Posts

Showing posts from December, 2024

महान व्यक्तिमत्त्वाची ओळख | Recognition of great personality

Image
          जीवन प्रगल्भ बनले पाहिजे.तर आनंद - म्हणजे काय हे लक्षात येईल. ही जीवणाची साधना आहे. साधना करता करता जीवन बदलून जाते. सुरुवातीला माणसाचे जीवन शुद्ध बनले तरी लोकांना तो मोठा भगत बुवा वाटतो. त्याला अजून तर आणखी चार पायऱ्या चढायचे आहेत. हे चारचे चार गुण ज्यांच्या जीवनात येतात ते वाल्मिकी, याज्ञवल्क्य सारखे महापुरुष गणले जातात. लहान सहान भगत तर पुष्कळ सापडतात. त्यांच्या जीवनात काही गुण आलेले सुद्धा दिसतात. ते लोकांचे मार्गदर्शक सुद्धा बनतात. त्यांच्या योगे लोकांची जीवने चांगली बनतातही. पण तरीही ते पैल तीरावर पोहोचलेले भक्त गणले जाऊ शकत नाहीत. मी त्यांना कमी लेखत नाही, पण हकीकत आहे ती सांगावीच लागते. मला अशांची नावे घेण्याची इच्छा देखील होते पण मी ती इच्छा रोखून धरत असतो. कारण समज कमी असलेल्या लोकांचा त्यांच्याबद्दल गैरसमज होईल. याज्ञवल्क्य, वाल्मिकी यांची जीवने शुद्ध, दैवी, तेजस्वी, प्रगल्भ आहे. म्हणून ते पूर्णोऽहम् आणि धन्योऽहम चा आनंद अनुभवत आहेत. सैषा वारुणी विद्या - तिलाच वारुणी विद्या म्हणतात. तिलाच भार्गवी विद्या म्हणतात. जीवनात ही विद्या ...

विप्र कोण?

Image
     विप्र कोण? ज्याला विशेष प्रकारचा outlook  - दृष्टिकोन लाभलेला आहे तो विप्र. असे वीप्र ज्या घरी येत नाहीत, वैदिक वाङ्मयाच्या भंडाराची गर्जना ज्या ठिकाणी नाही ते स्मशानच आहे. वेद म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे. त्यात ऋग्वेद, शुक्ल यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद आहे. त्यात ब्राह्मण ग्रंथ आहेत, आरण्यक ग्रंथ आहेत. वेद हे फार मोठे वाङमय आहे. कदाचित ते भगवंतांनी निर्माण केले नसेलही; तरी पण इतके सुंदर विचार ज्यांनी लिहिले आहेत त्यांनी स्वतःची नावे सुद्धा लिहिलेली नाहीत. तर त्यांना Divine touch दैवी स्पर्श असेल की नसेल? आपण एक ओळ लिहिली तरी त्यावर स्वतःचे नाव लिहितो आणि हे माझे original thinking मौलीक विचार आहेत असे सांगतो. जगात Original मूळ फक्त भगवान आहे. त्यामुळे Original thinking तोच केवळ करू शकतो. तुम्ही आम्ही फक्त त्याचे interpreter भाषाकार! जगातले शंकरराव, गणपतराव मर्यादित दृष्टीचे असल्याने म्हणतात, 'वा! वा! शास्त्रीजी तुमचे हे Original thinking आहे. आणि मलाही वाटते की मी काहीतरी Original thinking मांडतो आहे. जगात जे काही ज्ञान आहे ते interpretation आहे. फक्त भ...

भगवद् द्रोह आणि तत्वज्ञानाचा अधिकारी

Image
    जीवनात विज्ञान उतरत नाही त्याचे अमुकेक कारणे आहेत. तो कारणे दूर करा आणि मग पहा की ज्ञानाची उत्पत्ती होते की नाही!      सर्वात पहिले कारण सांगितले आहे की, 'भगवंताशी द्रोह करेल त्याला ज्ञान होत नाही.' एखादा म्हणेल आम्ही भगवंताला मानतो. तर मग आम्ही द्रोह करतो असे कसे म्हणता? तुम्ही भगवंताला मानत असाल पण भगवंताचे मानायला तयार नाही, हाच द्रोह आहे‌ भगवत द्रोह करणाऱ्याला तत्त्वज्ञान नाही मिळत. जो भगवंताचा द्रोह करतो त्याचे चित्त एकाग्र होत नाही. परिणामी चित्तशुद्धी होत नाही. आणि त्यामुळे आतले विकार कमी होत नाहीत, हलके होत नाहीत‌. परिणामी ते बाहेर जात नाहीत. असा माणूस नर्मदेतला गोटाच राहणार.      भगवंताशी द्रोह करणे हे जसे पहिले कारण आहे असे दुसरे कारण म्हणजे 'जो भगवंताचा झाला आहे, प्रभू कार्य करतो आहे त्याचा व्देष सुद्धा करता नये. म्हणजेच ब्राह्मणाचा द्वेष करता कामा नये.      तिसरी गोष्ट भगवंताचा भाग असेल त्याच्यावर जे लोक कोणत्याही स्वरूपात आपला हक्क सांगतात त्यांना ब्रह्मज्ञान होत नाही. माणूस जी काही कमाई करतो त्यात भगवत्...

चारित्र्य आणि निर्भयता

Image
          चारित्र्य म्हणजे समग्र जीवन समजून घेणे, जो स्वतःला चारित्र्यवान मानत असेल त्याने चारित्र्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. चारित्र्याच्या वृक्षाने जीवनाला शोभा प्राप्त होते. या चारित्र्यवृक्षाची फुले कोणती? ज्या फुलांनी चारित्र्य शोभते ती फुले म्हणजे विश्वास. आपल्यावर लोकांचा विश्वास असला पाहिजे ही सर्वात पहिली गोष्ट आणि लोकांवर आपला विश्वास असला पाहिजे ही दुसरी गोष्ट. आणि त्याचप्रमाणे देवाचा आपल्यावर विश्वास असला पाहिजे ही तिसरी गोष्ट तर प्रभूवर आपला विश्वास असला पाहिजे ही चौथी गोष्ट. ही सगळी फुले असतील तर चारित्र्य वृक्ष फुलला आहे असे म्हणता येईल.       चारित्र्याद्वारे निर्भयता आली पाहिजे. जीवनात चारित्र्य आले की निर्भयता येते.      हरिश्चंद्रने सत्यासाठी सत्तेचा त्याग केला. शिबीराजाने कबुतराच्या बदल्यात आपल्या शरीरातले मांस काढून दिले. दधिची ऋषींनी आपली हाडे दिली. हे सगळे काय समजावतात! माझे जीवन हे असे असे आहे. याला म्हणतात चारित्र्य. रामाचे सत्यपालन, कृष्णाचा कर्मयोग या गोष्टीतून जीवनात काही निष्ठा उभी राह...

मन बदलले तर जीवन बदलते.

Image
        शिक्षण कशासाठी? मनाला भव्य आणि दिव्य बनवण्यासाठी शिक्षण आहे. अमुकेक विचार जर सतत मनाला मिळाला तर मन भव्य आणि दिव्य बनते. मनाला क्षुद्र, स्वार्थी, भोगलंपट बनू न देणे, मनाला दिव्य, भव्य आणि कणखर बनवणे हीच मनाची उपासना आहे. ज्यांनी मनाची उपासना केलेली नाही ते मनाचे गुलाम आहेत, मनाचे भक्त नाहीत. मनाचे भक्त निराळे, मनाचे गुलाम निराळे आणि मनाचे मालक निराळे‌. मनाच्या गुलामीतून मनाच्या मालकीपर्यंत मजल गाठायची असेल तर मनाचे भक्त होणे ही त्याची मधली पायरी आहे.        मनाचा रंग बदलण्याची मोठ्यातली मोठी शक्ती कोणात असेल तर ती भक्तीत आहे‌. दुसरी गोष्ट आहे पूर्वजांचे स्मरण. मनात पूर्वजांची स्मृती असली पाहिजे की हे लोक असे काहीतरी निराळे जीवन जगून गेले. असेतर पुष्कळ वित्तवान, सत्तावान, राजे महाराजे आले आणि गेले. आपल्याला त्यांचे स्मरण तरी आहे का? मात्र महापुरुषांचे स्मरण ठेवले पाहिजे. अशा पूर्वजांच्या स्मरणाने मनाचा रंग बदलतो. भव्य, दिव्य, महान ऋषींची जीवने जर सतत डोळ्यासमोर असली तर मनाचा रंग बदलतो‌. माणसाला वाटते की मी भरतध्वजांच्या भूमीतला ...

ध्येयनिष्ठ जीवन

Image
           प्राणब्रह्माची उपासना म्हणजे ध्येयनिष्ठ जीवन. वस्तुतः भगवंतापाशी जाण्याचे ध्येय माणसाला लहानपणापासूनच मिळाले पाहिजे. त्याला जीवनाचा मंत्र दिला पाहिजे. मंत्र म्हणजे काय? ज्याची आज गरज नाही, पण पुढे दीर्घकाळ ज्याची गरज पडते त्याचे नाव मंत्र. भूक लागल्यावर खा, हे बापाने मुलाला शिकवावे लागत नाही. भूक लागल्यावर तो खाणारच. तहान लागल्यावर पाणी पिणारच. थकल्यावर झोप येते म्हणून झोपणारच. मोठा झाल्यावर 'तू लग्न कर' असे मुलाला सांगावे लागत नाही. तो लग्न करणारच. आई - बापाला अमुकेक कुटुंब व्यवस्था टिकवायची असली तर ते मुलाचे लग्न स्वतः करून देतील. ज्याची माणसाला आवश्यकता वाटते ते त्याला शिकवावे लागत नाही. परंतु ज्याची त्याला आज आवश्यकता वाटत नाही ते त्याच्या कानात सांगणे याचे नाव मंत्र. पिता तु एव मंत्रद:| पित्याला म्हणूनच मंत्रद: म्हटलेले आहे. बाप मुलाला मंत्र देतो की बाळ याची तुला आज गरज वाटत नसेल; कदाचित तुला ही गोष्ट आवडतही नसेल. तरीही जीवनात ही गोष्ट फार आवश्यक आहे. म्हणून तू ती तुझ्या जीवनात आण. जीवन अशा प्रकारचे बनव  जीवन श्रेष्ठ बनव. हे...

इष्टान्भोगान्हि वो देवा........|

Image
     अन्न सत् असले पाहिजे. म्हणजे ब्रह्म समजून अन्नाची उपासना करायची. ही उपासना करायची म्हणजे काय? भगवंतापाशी तांदळाचे चार दाणे वाहिले आणि नमस्कार केला म्हणजे काय पूजा झाली? नाही. जे संस्कृती सांगते ते पूर्णपणे करणे हे तिचे पूजन आहे.      आपले अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र असे असले पाहिजे की समाजात प्रत्येकाला अन्न मिळेल. अन्न सत् असले पाहिजे‌. आपले शास्त्रकार अन्न शुद्धी विषयी सांगतात ते सविशेष आहे. जेवताना माणसाने शुद्धता पाळली पाहिजे. हात- पाय धुऊन बसले पाहिजे. जेवताना कपडे देखील स्वच्छ असले पाहिजेत. बूट घालून जेवण ही आपल्याकडे पद्धत नाही. परंतु इथल्या पद्धतीमध्ये काय आहे ते समजून घेतले पाहिजे. अन्न सत् असले पाहिजे म्हणजे काय घरात खांडवा गहू घेतला म्हणजे चांगला गहू? नाही. खांडवा गहू ज्या पैशाने आला तो पैसा चांगला असला पाहिजे. कोणी म्हणतो, 'आमच्या माणसाच्या घरी स्वयंपाक खूप चांगला बनतो.' परंतु आपले जुने लोक विचारतात, 'त्याच्या घरी पंच महायज्ञ होतो का?' नसेल होत तर त्या घरचे अन्न खाऊ नका. त्याचे अन्न चांगले नाही. नाहीतर वृत्ती बिघडेल. ...

अन्नाची विपुलता हीच खरी समृध्दी!

Image
            आज युग बदलायला लागले आहे. अन्नाला प्रतिष्ठा हे कळून चुकले आहे. ज्या देशात आन्नासाठी भिकारी व्हावे लागते त्याची जगात काही किंमत नाही. जगात आज तीन देश प्रभावीपणे उभे आहेत. अमेरिका, रशिया आणि चीन त्यांच्यापाशी अन्नाची विपुलता आहे; म्हणून ते देश मोठे आहेत. शस्त्रसामुग्री, यंत्रसामुग्री, औद्योगिक सामग्री कमी असली तरी चालेल, परंतु अन्नसामुग्री भरपूर असली तरच देश उभा राहू शकतो.       इंग्लंड हे पहिल्या क्रमांकावर राहिलेले राष्ट्र आहे. त्याच्यापाशी शस्त्रसामुग्री आणि यंत्रसामग्री मोठी होती. दोन महायुद्धानंतर मात्र इंग्लंडला कळून चुकले की ज्याच्यापाशी अन्नसामग्री नसेल त्या देशाला जगात प्रतिष्ठा मिळत नाही. सर्वापेक्षा अन्नसामग्री श्रेष्ठ आहे. इंग्लंडने अन्नाला महत्त्व देऊन शेती उद्योगाला प्राधान्य दिले आणि शेतकऱ्याचे महत्त्व वाढवले.       अन्नब्रह्म आहे ही गोष्ट इंग्लंडला समजून चुकली. इंग्लंड पाशी भरपूर कापूस आहे. कापूस ही शेतातच उगवतो. इंग्लंडपाशी कापड बनवण्याची यंत्रसामुग्री होती, शस्त्रसामुग्री होती पण अन्न नसल...

संतप्त

Image
           सामान्य रित्या माणसाला वाटते की त्याने या जगात मी काही चांगलं केले नाही आणि पाप केले? माझी सत्कृत्ये  झाली नाहीत आणि कित्येक पापे झाली आहेत, हा विचार माणसाला संतप्त करतो. शक्ती असूनही मी सत्कर्म केली नाहीत आणि केली असतील तर ते किती केली असतील? असा विचार केव्हा संतप्त करतो? मृत्यूसमयी म्हणजे अगदी शेवटचा श्वास घ्यायचा राहिलेला असेल तेव्हा का? नाही. सर्वसामान्य रित्या, जेव्हा माणसाला वाटू लागते की या जगातून मला एक दिवस जायचं आहे, या जगात मी आलो, मला शक्ती सुद्धा मिळाली आणि या शक्तीचा मला हिशोब द्यायचा आहे. शक्तीचा हिशेब विचारणारी कुणीतरी एक शक्ती आहे आणि ती शक्ती जेव्हा विचारेल तेव्हा माझ्याकडे काही सांगण्यासारखे आहे का? अशी जाणीव जर पस्तिसाव्या वर्षी झाली तर माणूस तेव्हाही संतप्त होतो.       मनात विचार येतो की, मी माधवाची आराधना केली नाही; पुष्पादीकांनी भगवान चंद्रचुडाची अर्थात शंकराची पूजा सुद्धा मी केली नाही. भगवान शिव किंवा भगवान विष्णूचे काम मी कधी केले नाही. स्वतःचे कल्याण व्हावे असेही काही केले नाही. दुसऱ्याचे ...

अवर्णनीय तत्वाला शोधून बघा!

Image
     ही कर्मभूमी आहे. यात माणसाने जर अमुक प्रकारचा विकास केला नाही तर तो मंदभाग्य आहे, श्रुती सांगते, मंदभाग्य हा मूर्ख शब्दाचा प्रतिशब्द आहे. श्रुतीला असे वाटले की 'मूर्ख' म्हटले तर धक्का बसेल म्हणून मंदभाग्य शब्द वापरला आहे, असे वाटते.       एवढा चांगला देह मिळाल्यावर आनंदाकडे माणसाने एक पाऊलही टाकले नाही तर तो कमनशिबी आहे, मंदभाग्य आहे.       मानवी देहाद्वारे हा आनंद मिळवायचा असेल तर त्याची समज प्रथम रूढ झाली पाहिजे. आणि ती म्हणजे ते जे अलौकिक, अद्वितीय, अवर्णनीय तत्व आहे तो परमात्मा, मनुष्याच्या आत जे तत्व आहे ते आणि तेजस्वी आदित्यामध्ये असलेले जे तत्व आहे ते एकच आहे. ही समज दृढ होण्यासाठी मेहनत करायची आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा कठीणातला कठीण भाग कोणता असेल तर तो हा भाग आहे.       बुद्धिमान माणूस सुरुवातीला विचार करतो की मी कुठून आलो! हे जगत कोणी निर्माण केले? या जगताशी माझा संबंध काय? ज्याने जगत निर्माण केले त्याने मला कशासाठी निर्माण केले? त्या निर्मात्याचा आणि माझा संबंध काय? हे प्रश्न माणसाच्या बुद्धीमध्ये ग...

आशावादी व्यक्तिमत्त्व

Image
      दैवी संपत्तीवान माणसाने आशावादी असले पाहिजे. भक्कम असले पाहिजे. निराश होता कामा नये. कंटाळता कामा नये. जो माणूस जीवनाला कंटाळलेला असतो, निराश बनलेला असतो तो माणूस जीवनात आनंद उपभोगू शकत नाही. तरुण माणूस आशावादी असला पाहिजे. अशिष्ठ: शब्दाचा अर्थ 'जो कंटाळलेला नाही, निराश नाही, दुबळा नाही' अशा नकारात्मकतेत पूर्ण होत नाही. जसे 'मी क्षुद्र नाही' असे बोलून जीवननिष्ठेचा अर्थ पूर्ण होत नाही, तर 'मी महान आहे' असे बोलून जीवननिष्ठा पूर्ण होते, तसा आशिष्ठ: चा विधायक अर्थ आहे. ' आस्तिक'. मी विधाता आहे, संपूर्ण जगाचा चेहरा - मोहरा पालटायचा असेल तर तो मीच पालटेन. या जगाची अशी अवस्था कोणी केली? माणसाने. तर माणूसच ती सुधारू शकतो. अशी दुर्दम्य अशा ज्याच्यात आहे तो आस्तिक. अशिष्ठ: शब्दात अस्तिक असाही एक अभिप्रेत अर्थ आहे. अशिष्ठ: म्हणजे ज्याची मांगल्यावर श्रद्धा आहे आणि भगवंतावर विश्वास आहे तो. जो केवळ आशावादी आहे आणि जो निराश होत नाही असा तर रावणी वृत्तीचा माणूसही असू शकतो. दुर्योधन कधी निराश झाला होता? महाभारताच्या युद्धात सगळे धारातीर्थी पडले, भीष्म ग...

जिवन आणि मरण

Image
श्रुती सांगते अशिष्ठ: - जो माणूस आशावान आहे तोच माणूस या जगात आनंद उपभोगू शकतो‌. स्वतःबद्दल, लोकांबद्दल आणि प्रभु बद्दल निराश झालेल्या माणसांकडून जीवनाचा आनंद उपभोगला जाणारच नाही. जो कधी निराश होत नाही, जीवनाला कंटाळलेला नाही, ज्याला मृत्यूतही जीवनाचे बीज दिसते तो 'युवक' होय. ज्याची जीवननिष्ठा दुर्दम्य आहे तो माणूस अशिष्ठ: - आशावान होय. असेच लोक एको मानुष: आनंद्: च्या कक्षेत येतात या आनंदासाठी देदीप्यमान जीवन निष्ठा असली पाहिजे. अशिष्ठ: म्हणजे जीवनात कंटाळलेला नाही तो. जीवन कधीही मृत्यूमध्ये समाप्त होत नाही. लहान मुलांना व युवकांना दुर्दम्य जीवन निष्ठा असते. म्हातारा काय किंवा तरुण काय सर्वांना मरण हे अटळ आहे, पण एक मरणाच्या भीतीने जीवनाला आलिंगन देतो आणि दुसरा मरणाची तमा न बाळगता जीवनाला आलिंगन देतोच पण मरणालाही आलींगन देतो. दोघांमध्ये एवढा फरक आहे.   जीवनाची गोष्ट मरणात पूर्ण होते हे भगवान श्रीकृष्णाला मान्यच नाही; मरणात जीवणाचे बीज आहे.       संपूर्ण दुनिया तुम्हाला दूर लोटेल पण भगवान दूर लोटणार नाही. जो स्वतःबद्दल, जीवनाबद्दल कंटाळलेला नाही, निराश ना...

अध्यायक - उत्पत्ती करणारा

Image
संपूर्ण सृष्टी निसर्ग आपला मोठ्यातला मोठा शिक्षक आहे. पर्वताचे स्थैर्य पाहून स्थित प्रज्ञाचे दर्शन होते. चंद्राची शितलता पाहून मनुष्य जीवनात शितलतेचा गुण ध्यानी येतो. या दृष्टीने, दिव्य श्रद्धेने माणूस निसर्गापाशी गेला तर दगड, वृक्ष, पाने सुद्धा त्याच्याशी बोलतील. आपल्या ऋषीमुनींनी एवढे प्रचंड वाॾमय लिहीलेले आहे पण त्यासाठी ते काय शाळेत शिकायला गेले होते? कधीच नाही. त्यांनी झाडाकडे, पानाकडे पाहिलं आणि पाने त्यांच्याशी बोलली.        जिज्ञासा, बुद्धी आणि दिव्य श्रद्धा या तीन गोष्टी ज्याच्यात असतील त्याला अध्यायक: म्हणतात. जो माणूस अध्यायनशील आहे तो माणूस या जगात आनंद मिळू शकतो.         अध्यायक चा दुसरा अर्थ आहे उत्पत्ती करणारा. जो सृजन करतो तो तरुण. ज्याच्यापाशी सृजनात्मक शक्ती आहे, ज्याला 'काही उभे करायचा आहे' अशी इच्छा आहे, तो अध्यायक: आहे. 'या जगामध्ये भावाची, तेजस्वीतेची उत्पत्ती करीन, रसोत्पत्ती करीन, माझ्यापाशी असलेली बुद्धीशक्ती एवढ्यासाठीच वापरेन.' अवघाची संसार सुखाचा करीन असे सांगणारे ज्ञानेश्वर तरुण आहेत याचे कारण त्यांनी ...

युवकाची साधू अध्यायनशील ज्ञानग्रहणशीलता वृत्ती|

Image
जसा युवक साधू म्हणजे सरळ वृत्तीचा असला पाहिजे, सामर्थ्य संपन्न असला पाहिजे आणि निष्ठावान असला पाहिजे तसाच तो युवाध्यायक देखील असला पाहिजे. म्हणजे तरुण अध्यायनशील असला पाहिजे. माणसाची ज्ञानग्रहणशीलता सतत चालू राहिली पाहिजे. एखादा नवा विचार ऐकला की आनंद होतो; मन, बुद्धी तंदुरुस्त होऊ लागते.        वाचणे वेगळे आणि अभ्यास करणे वेगळे. आज काही माणसाचं वाचनाचा शोक खूप वाढला आहे. लोक पुष्कळ पुस्तके वाचतात, पण हे बहुधा हेरकथा किंवा कादंबऱ्याच वाचतात.       अध्ययनशील म्हणजे कोणत्याही क्षेत्रात, सांगाल त्या क्षेत्रात बुद्धीपूर्वक अभ्यास करणे, ज्ञानग्रहण करणे. भगवान दत्तात्रयांनी सर्वापासून गुणग्रहण करताना चोवीस गुरू केले. भागवतात त्याचे वर्णन आहे. ज्ञानग्रहण वृत्ती सतत चालू राहिली पाहिजे‌. त्याने मन आणि बुद्धी सतत तंदुरुस्त राहील. सोबतच जिज्ञासा देखील हवी. अध्ययनाने बुद्धी तरल बनली पाहिजे. सोबत जिज्ञासा सुद्धा हवी. अध्ययनाची ही साधने आहेत. मेकॅनिकल इंजिनिअर होण्यासाठी अध्ययनात श्रद्धा पाहिजे, पण जीवनस्पर्शी अध्ययनात दिव्य श्रद्धा पाहिजे.    ...

साधू युवा स्यात् |

Image
  ज्याच्या जीवनात उत्कटता, तेजस्विता,तपस्विता आणि तत्परता असेल तो माणूस सत्तर वर्षाचा असला तरीही तरुण आहे आणि या चार गोष्टी ज्याच्यापाशी नसतील तर एकोणीस वर्षाचा असला तरीही म्हाताराच आहे. ही श्रुतीची व्याख्या आहे. पितामह भीष्म तरुण होते. माणसाला तारुण्य टिकवता आले पाहिजे. ते बदाम, पिस्ते खाऊन टिकत नाही; तर विशिष्ट विचार जीवनात आले तर यौवन टिकते. यौवन टिकवण्याचा एकमेव उपाय म्हणजे श्रुतीच्या, उपनिषदांच्या मार्गाने चालणे.       जीवनाचा परमोच्य आनंद केवळ 'तरुण राहणे' एवढाच नाही. याशिवाय काही विशेष म्हणजे साधू युवा स्यात् - तरुण 'साधू' असला पाहिजे. आजच्या काळात 'साधू' शब्द उच्चारताच विभूती फासलेला किंवा जटा - दाढी वाढवलेला, कुरूप - दिसणारा, काही न करणारा माणूस ध्यानात येतो. वास्तविक 'साधू' शब्दाचा अर्थ सरळ वृत्तीचा असा आहे. त्याच्या वृत्तीमध्ये 'मांगल्य' व्यक्त झालेले असले पाहिजे. पुस्तक वाचून 'मांगल्य' कळत नाही. धर्मराजाच्या जीवनात वृत्तीचे मांगल्ये दिसते. ज्याच्या बोलण्यात, चालण्यात, आणि विचार करण्यात मांगल्याची प्रचिती येते तो सा...

जगत् 'माझे आहे' याची समज आणि जीवनात निर्भयता, प्रेमात उत्कटता व तारूण्याला ध्येय मिळाले तर!

Image
        'मी दोन दिवसाचा पाहूणा आहे असे समजणे ही पहिली पायरी आहे. अहं ब्रह्मास्मी असे विपरीत अर्थाने कोणी समजला तर अनर्थ होईल. वसिष्ठ अहं ब्रह्मास्मिची अनुभूती पावलेले होते. तसा दुर्योधनही स्वतःला अहं ब्रह्मास्मि समजत होता. एकाच विचारधारेची ही दोन अंतिम टोके आहेत. गीताकार अशांचे वर्णन करतात. ईश्वरोऽहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी| काही माणसे सुरुवातीला असे समजतात की घर माझेच आहे. मला येथून जायचेच नाही. अशा लोकांसाठी शास्त्रकारानां समजावावे लागते, 'अरे बाबा! हे जगत तुझे नाहीच, प्रभूचे आहे आणि तू इथे दोन दिवसाचा पाहूणा आहेस.' ही गोष्ट समजून, जीवनात उतरावयाची आहे. त्यामुळे जीवन परिवर्तन होते, दृष्टिकोन बदलतो. त्यानंतर त्याला दुसरी पायरी समजावी लागते की ही सृष्टी भगवंताची आहे हे खरे, पण याचा अर्थ ती तुझी नाही असे नाही. तू जर भगवंताचा मुलगा झालास तर ती तुझीही आहे. या जाणिवेने भय कमी होते. नंतर अत्युच्च दृष्टी येते ती ही कि मी नाहीच, भगवंताची ही लीला आहे आणि त्यात 'मला' पाठवून दिलेले आहे. बाकी तर तोच वेगवेगळी रुपे घेऊन खेळत राहिला आहे. हे जगत् जोपर्यंत तुम्हाला तु...

प्रभूला व्यक्त करण्याची कला उपनिषद सांगते आहे.

Image
      ब्रह्म तत्वाचे वर्णन सुरू आहे. ब्रह्म तत्व व्यापक आहे तर ते व्यक्त केव्हा होते. माणसाचा शब्द आणि आवाज व्यापक आहे. तुम्ही जर जोरात आवाज काढला तर तो सर्वत्र जाईल‌. आणि एक प्रकारे दाब देण्यात आला तर तो आवाज आलम  दुनियेत पोहोचवतो. कारण शब्दाचा आधार आकाश आहे जे व्यापक आहे; उदाहरणार्थ, आत्ता एखाद्या ठिकाणी रेडिओवर काही गीताचे सूर चालू असतील पण इथे ते ऐकू येत नाहीत, म्हणून ते इथे नाहीत असे नाही. इथे रेडिओचा सुर झेलू शकेल असे यंत्र बसून दिले तर रेडिओचे सुर लक्ष वेधून घेतील. त्यासाठी बाहेरून आवाज (ध्वनी) आणावा लागत नाही. ध्वनी इथे आहेच. फक्त त्याचे अभिव्यक्तीकरण करावे लागते. अशाप्रकारे, ब्रह्म सर्व व्यापक आहे तरी त्याला व्यक्त करण्यासाठी कोणीतरी लागतो, तेव्हाच कोणी त्याला बघू शकतो आणि कोणाला त्याचा प्रत्यय येऊ शकतो.      आता ही जी प्रभूला व्यक्त करण्याची कला आहे, ती उपनिषद सांगते आहे आणि ती जीवनाची सर्वोच्च कला म्हटले आहे. ही कला ज्यांना साध्य आहे ते श्रेष्ठ पुरुष, मुक्त पुरुष म्हटले जातात. म्हणजे व्यापक,अशरीरी, अवर्णनीय. अवर्णनीय म्हणजे ...

दत्त जयंती - दत्ताचे स्वरूप संस्कृतीच्या महानकार्याचे प्रतीक आहे.

Image
          उपनिषदात म्हटले आहे, 'मातृवान, पितृवान, आचार्यवान् पुरुष वेद|' ज्याला योग्य आई बाप आणि गुरु मिळतात त्याला श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते. हे सद्भाग्य फारच थोड्या लोकांना लाभते. अशापैकी एक म्हणजे भगवान दत्तात्रेय. अत्रि ऋषी व महासती अनुसया यांचे ते सुपुत्र. 'अत्रि' म्हणजे त्रिगुणातीत आणि 'अनुसया' म्हणजे असुया रहित. सत्व, रज, व तम या तीन गुणात रममान न होता तिने गुणांना जो स्वेच्छेने खेळू शकतो तो अत्री आणि स्री सुलभ असलेला जिने स्वतःच्या जीवनात प्रवेशच दिलेला नाही अशा प्रकारचा जिवंत मन मोकळेपणा म्हणजे अनुसया. अशा आई - बापाच्या कुशीत दत्तासारखा तेजस्वी पुत्र अवतारतो.       पुराणात कथा आहे, ब्रह्म - विष्णू - महेश हे महासती अनुसयाच्या सतीत्वाची कसोटी पाहायला अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यांनी अनुसयाला विवस्त्र होऊन भिक्षा वाढायला सांगितले .पतीव्रता स्रीला हे फार कठीण होते आणि भिक्षा दिली नाही तर अतिथी सत्कारात उणेपणा राहिला असता. महासती अनुसयाने स्वतःचे तप व सतीत्वाचा प्रभाव यांच्या बळावर तीनही देवांना लहान बालके बनवली आणि त्या अडचणीत...

सुकृतची = पुण्य, चांगल्याने बनवले, चांगल्यासाठी बनवले.

Image
       काही लोक दोष काढतात. एका पंडिताने गमंतीने असे चार दोष दाखवले आहेत..       त्याला सांगायचे आहे की ब्रह्मदेवाला बुद्धी देणारा माझ्यासारखा कोणी नव्हता. त्यामुळे या जगात काही दोष राहिले आहेत. कोणते दोष?- सोने एवढे महाग आहे आणि सोन्याचा भाव रोज वाढतोय. आबालवृद्ध सर्वांना सोने आवडते. पण सोन्यामध्ये थोडा सुगंध ठेवला असता तर? त्याची किंमत केवढी वाढली असती? त्याला जर हीना किंवा केवड्यासारखा सुवास दिला असता तर? ऊस किती गोड आहे पण त्याला फळ दिले असते तर? किती गोड असते! पण त्याला फळ येत नाही. चंदनाला केवढा सुगंध! चंदनाचे लाकूड घासले तर सुगंध येतो आणि त्यावर फुल आले तर? पण त्याला फुल नाही. वित्तवान माणूस विद्वान नसतो. विद्वान असेल तर त्याच्यापाशी पैसा नसतो आणि विद्वत्ता आणि पैसा दोन्ही असले तर तो दीर्घजीवी नसतो. ब्रह्मदेवाला कोणी अक्कल देणारा नव्हता म्हणून हे दोष राहिले.      या महाभागाने संपूर्ण सृष्टीत शोधून शोधून दोष पाहिले, आणि तेही कसे! त्यातली गंमत जाऊ द्या‌. मूळ मुद्दा हा आहे की जगत सुकृत आहे. जगत सुकृत - चांगल्या रीतीने बनव...

चांगल्याने चांगल्यासाठी चांगल्या पद्धतीने केलेली कृतीला सुकृत म्हणतात.

Image
   सुकृत शब्दाचे तीन अर्थ आहेत.  1)चांगल्या पद्धतीने केलेली कृती.    २) चांगल्याने केलेली कृती. आणि ३) चांगल्यासाठी केलेली कृती.   ही सृष्टी सुकृत आहे म्हणजेच चांगल्या रीतीने, दोष रहित केलेली अशी कृती आहे. जगतात कोणत्याच ठिकाणी दोष नाही.      हे जगत् सत् आहे. म्हणूनच त्याला सुकृत म्हटले आहे. जगत पुण्य आहे, लोक म्हणतात, 'जगत हे पाप आहे, आम्हाला मायेच्या चिखलात फेकून दिले आहे.' फेकून कशाला देईल तो? तुम्ही तुमच्या मुलाला फेकून देता? नाही ना! तसाच भगवंत देखील फेकून देत नाही आणि कदाचित फेकले तर स्वतः देखील उडी घेईल याची खात्री बाळगा.       मुलाच्या पुस्तकात एक गोष्ट असते. त्यात सर्वांच्या मनात वेगवेगळे विचार येतात. एकाला आंबा फार आवडत असे. त्याने मोठा कोहळा पाहिला आणि त्याला वाटले आंबा एवढा मोठा असता तर? दुसऱ्या दिवशी तो एका आंब्याच्या झाडाखाली बसला होता, सावली होती आणि अचानक वरून त्याच्या डोक्यावर एक आंबा पडला  त्याला वाटले जर आंबा कोहळ्या एवढा मोठा असता तर माझे काय झाले असते? म्हणजे छोटे फळच योग्य आहे  अशा प्...

गीतेने कुणाला काय दिले ?

Image
वांग्ङमय - रसिकांना गीतेमध्ये वांग्ङमयीन सौंदर्य दिसते, साहित्य - शौकिनांची लालसा गीता पूर्ण करते, कर्मवीरांना गीता उत्साह देते, ज्ञानियांना ज्ञानगंगेत बुडी मारण्याची गीता संधी देते. भक्तांना गीतेत भक्तीचे रहस्य आढळते. व्याकरणकारांचे हृदय गीतेतील शब्दांचे लालित्य पाहून बोलू लागते. हे सर्व तर गीतेत आहे परंतु काय एवढ्याच कारणामुळे गीतेची लोकप्रियता आहे?       पाप्यातला पापी मनुष्य जरी गीते जवळ आला तरी गीता - माता त्याचा तिरस्कार केव्हा उपेक्षा न करता त्याला स्वतः जवळ घेऊन प्रेमाची ऊब देते. एखाद्या दुष्ट मानवाला कुटुंबातील लोक घराबाहेर काढू शकतात, समाजातील लोक त्याला बहिष्कृत करू शकतात किंवा एखादा राजा त्याला देशातून हद्दपार करण्याचे शिक्षा फर्मावू शकतो पण आई जगदंबा त्याला जगातून बाहेर कशी काढू शकेल. गीता कोणत्याही मानवाची त्याची स्वतःवरील श्रद्धा नष्ट होऊ देत नाही.       निराशेच्या अंधकारात भटकणाऱ्या मानवाच्या जीवनात 'गीता आई' आशेचा प्रकाश पाडते. मनुष्याला गीता नवा उत्साह देते. निराशा ही तर नास्तिकता आहे. 'भगवान माझ्यासोबत आहे' असे मानणारा मानव कध...