मन बदलले तर जीवन बदलते.
शिक्षण कशासाठी? मनाला भव्य आणि दिव्य बनवण्यासाठी शिक्षण आहे. अमुकेक विचार जर सतत मनाला मिळाला तर मन भव्य आणि दिव्य बनते. मनाला क्षुद्र, स्वार्थी, भोगलंपट बनू न देणे, मनाला दिव्य, भव्य आणि कणखर बनवणे हीच मनाची उपासना आहे. ज्यांनी मनाची उपासना केलेली नाही ते मनाचे गुलाम आहेत, मनाचे भक्त नाहीत. मनाचे भक्त निराळे, मनाचे गुलाम निराळे आणि मनाचे मालक निराळे. मनाच्या गुलामीतून मनाच्या मालकीपर्यंत मजल गाठायची असेल तर मनाचे भक्त होणे ही त्याची मधली पायरी आहे.
मनाचा रंग बदलण्याची मोठ्यातली मोठी शक्ती कोणात असेल तर ती भक्तीत आहे. दुसरी गोष्ट आहे पूर्वजांचे स्मरण. मनात पूर्वजांची स्मृती असली पाहिजे की हे लोक असे काहीतरी निराळे जीवन जगून गेले. असेतर पुष्कळ वित्तवान, सत्तावान, राजे महाराजे आले आणि गेले. आपल्याला त्यांचे स्मरण तरी आहे का? मात्र महापुरुषांचे स्मरण ठेवले पाहिजे. अशा पूर्वजांच्या स्मरणाने मनाचा रंग बदलतो. भव्य, दिव्य, महान ऋषींची जीवने जर सतत डोळ्यासमोर असली तर मनाचा रंग बदलतो. माणसाला वाटते की मी भरतध्वजांच्या भूमीतला आहे, याज्ञवल्क्यांच्या भूमीतला आहे.
पूर्वजांचे स्मरण असलेच पाहिजे. त्याला पितृ पूजन म्हणतात. एक देवपूजा, दुसरी पित्रृपूजा. पितृपूजन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. श्रद्धाच्या दिवसात पितृपूजन केले पाहिजे.
देवपूजन व पितृपूजनाने मनाचा रंग बदलेल. ब्रह्म दिव्य व भव्य आहे. मन जर ब्रह्म असेल तर त्याला दिव्य व भव्य बनवावे लागेल. त्याच्यासाठी प्रभूभक्ती व पितृभक्ती करावी लागेल. आपल्या जीवनाचा रंग बदलला तर मन भव्य व दिव्य होईल. मनाला भव्य व दिव्य बनवणे ही मनाची उपासना आहे. मन ब्रह्म आहे हे पक्के झाले.
त्याचप्रमाणे ईश्वर पूजनाने जीवनाचा रंग बदलेल. तुमच्या जीवनाचा रंग जसा असेल तसा त्याचा परिणाम मनावर होईल. आज अमुकेक प्रकारचे जीवन म्हणजे चारित्र्य - Character असे लोक समजतात. चारित्र्य शब्दाचा अर्थ आज स्री पुरुष संबंध एवढ्यापुरताच मर्यादित मानला जातो आहे. पण चारित्र्य निर्माण म्हणजे एवढाच मर्यादित अर्थ नव्हे. तो एक जीवन व्यपी शब्द आहे. त्याच्यात कुठेतरी कोपऱ्यात स्त्री पुरुष संबंध देखील आले. चारित्र्य निर्माण म्हणजे तुमच्या शब्दांची किंमत, तुमच्या विचारांची किंमत जे विचार तुमच्या बुद्धीत उत्तरले ते जीवनात आणण्याची हिंमत. हे सगळे चारित्र्य शब्दांमध्ये अभिप्रेत आहे.
चारित्र्य म्हणजे कला, साहित्य, नृत्य, संगीत नव्हे की ज्याचे वर्ग खोलता येतात. चारित्र्य म्हणजे जीवनाची एक विशुद्ध बाजू. मानवाने मनाला उपवन बनवण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे चारित्र्य निर्माण.
चारित्र्याच्या भंडाराची किल्ली आपल्यापाशीच आहे. ती किल्ली अर्थात् आत्मनिरीक्षण. चारित्र्य निर्माण करायचे असेल तर आत्मनिरीक्षण करायला लागा. माणसाला कठोर आत्मनिरीक्षण करायला जमलं पाहिजे. आपली चूक झाली असेल तर ती चूक लक्षात आली पाहिजे. तरच ते खरे आत्मनिरीक्षण.
आत्मनिरीक्षण ही चारित्र्य भांडाराची किल्ली आहे. माणसाने तसे सुरू केले तर स्वतःच्या दोषांकडे पाहून त्याची झोप उडून जाईल. आज माणसाला आत्मनिरीक्षण करायला जरा ही वेळ नाही. परंतु माणसांनी त्यासाठी वेळ काढलाच पाहिजे. आत्मनिरीक्षण करण्यासाठी शांतपणे बसले पाहिजे. मनामधल्या वनामध्ये झाडेझुडपे पाहत राहिले पाहिजे, की मी कुठे होतो? कसा होतो? आज कुठे पोहोचलोय? मी पुढे चाललो आहे की मागे पडलो आहे? आतल्या पडीक जमिनीत काय उगवले आहे? गवत उगवले आहे की धान्य उगवले आहे. कधी कुठे हिरवळ दिसते सुद्धा पण ती जंगली गवताने भरलेली असते. ती काय उपयोगी? ती दोन महिन्यात सुकून जाते आणि त्यातून अन्न मिळत नाही.
मनाची उपासना हा लेख एक प्रेरणादायक संदेश देतो की मनाला दिव्य, भव्य, आणि कणखर बनवणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. या लेखात मांडलेल्या विचारांवर आधारित काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
1. शिक्षणाचे खरे उद्दिष्ट:
शिक्षण हे केवळ ज्ञानार्जनासाठी नसून मनाला भव्य आणि दिव्य बनवण्यासाठी आहे.
मन क्षुद्र, स्वार्थी किंवा भोगलंपट बनण्यापासून रोखून त्याला उदात्त विचारांनी समृद्ध करणे आवश्यक आहे.
2. मनाची तीन अवस्था:
मनाचे गुलाम: ज्यांचे मन स्वतःच्या दुर्बलतेने व स्वार्थाने ग्रासलेले असते.
मनाचे भक्त: जे मनाला शुद्ध करण्यासाठी भक्तीचा मार्ग अवलंबतात.
मनाचे मालक: जे मनावर पूर्ण नियंत्रण ठेवतात आणि त्याला उन्नत करतात.
मनाच्या गुलामगिरीतून मालकीपर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती ही महत्त्वाची पायरी आहे.
3. भक्ती आणि पूर्वजांचे स्मरण:
भक्तीमुळे मनाचा रंग बदलतो, आणि पूर्वजांचे स्मरण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
महापुरुषांचे आदर्श जीवन सतत डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे.
पितृपूजन आणि देवपूजनाच्या माध्यमातून मनाला दिव्यतेकडे नेले जाऊ शकते.
4. चारित्र्यनिर्मितीचे खरे महत्त्व:
आजच्या काळात चारित्र्याचा अर्थ फक्त स्री-पुरुष संबंधांपुरता मर्यादित समजला जातो, परंतु चारित्र्य हा व्यापक अर्थ असलेला जीवनाचा पैलू आहे.
चारित्र्य म्हणजे विचार, शब्द, आणि कृती यामधील सुसंगती.
व्यक्तीच्या आचरणाची गुणवत्ता, त्याच्या विचारांची प्रामाणिकता, आणि विचारांना कृतीत उतरवण्याची हिंमत हे चारित्र्याचे आधारस्तंभ आहेत.
5. आत्मनिरीक्षण:
आत्मनिरीक्षण ही चारित्र्य निर्माण करण्याची गुरुकिल्ली आहे.
आपल्या चुकांची जाणीव होणे, त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, आणि जीवनातील प्रगतीचा आढावा घेणे आत्मनिरीक्षणाने शक्य होते.
मनातील पडीक जमिनीत काय उगवले आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने वेळ काढून स्वतःशी संवाद साधला पाहिजे.
6. जीवनाचा रंग बदलणे:
भक्ती, पितृपूजन, आणि देवपूजनाने जीवनाचा रंग बदलतो.
जसे जीवन असेल तसा त्याचा परिणाम मनावर होतो, म्हणूनच मनाला शुद्ध आणि दिव्य बनवण्यासाठी आचरण शुद्ध असले पाहिजे.
लेखाचा संदेश:
मन ही ब्रह्मतुल्य शक्ती आहे. त्याला दिव्य आणि भव्य बनवण्यासाठी भक्ती, आत्मनिरीक्षण, आणि चारित्र्यनिर्मिती या प्रक्रिया अनिवार्य आहेत. मनाची उपासना म्हणजेच जीवनाला उच्चतम शिखरावर नेण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे.
“मन बदलले, तर जीवन बदलते.”
Comments
Post a Comment