भगवद् द्रोह आणि तत्वज्ञानाचा अधिकारी


   

जीवनात विज्ञान उतरत नाही त्याचे अमुकेक कारणे आहेत. तो कारणे दूर करा आणि मग पहा की ज्ञानाची उत्पत्ती होते की नाही!
    
सर्वात पहिले कारण सांगितले आहे की, 'भगवंताशी द्रोह करेल त्याला ज्ञान होत नाही.' एखादा म्हणेल आम्ही भगवंताला मानतो. तर मग आम्ही द्रोह करतो असे कसे म्हणता? तुम्ही भगवंताला मानत असाल पण भगवंताचे मानायला तयार नाही, हाच द्रोह आहे‌ भगवत द्रोह करणाऱ्याला तत्त्वज्ञान नाही मिळत. जो भगवंताचा द्रोह करतो त्याचे चित्त एकाग्र होत नाही. परिणामी चित्तशुद्धी होत नाही. आणि त्यामुळे आतले विकार कमी होत नाहीत, हलके होत नाहीत‌. परिणामी ते बाहेर जात नाहीत. असा माणूस नर्मदेतला गोटाच राहणार.
    
भगवंताशी द्रोह करणे हे जसे पहिले कारण आहे असे दुसरे कारण म्हणजे 'जो भगवंताचा झाला आहे, प्रभू कार्य करतो आहे त्याचा व्देष सुद्धा करता नये. म्हणजेच ब्राह्मणाचा द्वेष करता कामा नये.
    
तिसरी गोष्ट भगवंताचा भाग असेल त्याच्यावर जे लोक कोणत्याही स्वरूपात आपला हक्क सांगतात त्यांना ब्रह्मज्ञान होत नाही. माणूस जी काही कमाई करतो त्यात भगवत् शक्ती भागीदार आहे, तिचा त्यात हिस्सा आहे. प्रभूच्या त्या भागाचा योग्य उपयोग प्रभू कार्यात झाला पाहिजे. ते जो करत नसेल त्याला ब्रह्मज्ञान होत नाही. 

जीवणात काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ इत्यादी असतील तर जीवनात तत्वज्ञान उतरत नाही. कामी माणूस कामाचाच विचार करत असतो‌. तर तत्त्वज्ञानाचा विचार कशाला करेल? त्याने यदा कदाचित ऐकले तरीही फलश्रृती काय? याचा प्रथम विचार करतो.
    
क्रोधी माणसाच्या डोक्यातही तत्त्वज्ञान उतरत नाही. दंभ, आळस, मत्सर, लोभ, काम, क्रोध आणि मोह हे सात दोष असतील तर तत्वज्ञान डोक्यात उतरत नाही.
     
मग सांगतात, 'ज्या आईने तुम्हाला संस्कृतीकडे वळवले, अध्यात्माबद्दल प्रेम वगैरे केले त्या आईचे, त्या संस्कृतीचे, मानाव्याचे संरक्षण जो करत नाही त्याच्यावर तत्वज्ञानाचा परिणाम होत नाही. संस्कृतिमातेचे संरक्षण घडत नसेल तर जीवनात तत्त्वज्ञान उतरणार नाही. तत्त्वज्ञानाला शोधायला जाऊ नका. संस्कृतीचे रक्षण करायला लागा, तत्त्वज्ञान आपोआप चालत येईल. जे लोक संस्कृतीशी द्रोह करतात त्यांना तत्वज्ञान गवसत नाही. काही लोक पावलेच असे टाकतात की संस्कृतीचा सत्यानाश होतो.

वरील लेखनामध्ये तत्त्वज्ञानाच्या प्राप्तीसाठी आवश्यक अशा अनेक गोष्टींचा विचार केला आहे. यामध्ये भगवंताशी एकरूपता, संस्कृतीचे संरक्षण, आणि अंतर्मनाची शुद्धी यांना महत्त्व देण्यात आले आहे. लेखाचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

1. भगवंताशी द्रोह करणे:
भगवंताशी द्रोह म्हणजे केवळ त्याला न मानणे नव्हे, तर त्याच्या तत्त्वांना, विचारांना, आणि आदर्शांना स्वीकारण्यास नकार देणे होय. जो भगवंताशी द्रोह करतो, त्याचे चित्त अस्थिर राहते, आणि चित्तशुद्धी न झाल्यामुळे ज्ञान प्राप्त होत नाही.

2. भगवंताच्या कार्याचा व्देष न करणे:
भगवंताचे कार्य करणाऱ्याचा, विशेषतः समाजासाठी कार्यरत असणाऱ्या ब्राह्मणांचा, द्वेष करू नये. द्वेष हा ज्ञान प्राप्तीमध्ये अडथळा ठरतो.

3. भगवंताच्या भागाचा योग्य उपयोग:
आपण जे काही कमावतो त्यात भगवंताची शक्ती भागीदार आहे. त्याचा योग्य उपयोग न केल्यास तत्त्वज्ञान प्राप्त होत नाही. भगवंताचा भाग प्रभू कार्यासाठी वापरणे महत्त्वाचे आहे.

4. आंतरिक दोषांचा नाश:
काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, मत्सर, आळस यांसारखे दोष असतील तर तत्त्वज्ञान डोक्यात उतरत नाही. आत्मपरीक्षण आणि आत्मशुद्धी यासाठी हे दोष दूर करणे आवश्यक आहे.

5. संस्कृतीचे संरक्षण:
ज्या आईने, समाजाने, आणि संस्कृतीने आपल्याला घडवले त्यांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. संस्कृतीशी द्रोह करणाऱ्यांना तत्त्वज्ञान कधीच गवसत नाही. संस्कृतीचे रक्षण केल्यास ज्ञान आणि तत्त्वज्ञान आपोआप प्राप्त होते.

विचार:

हे विचार आत्मपरीक्षणासाठी प्रेरणादायी आहेत. आधुनिक काळातही, मानवी मूल्ये, आध्यात्मिकता, आणि संस्कृतीचे संरक्षण हे जीवन समृद्ध करणारे ठरतात. तत्त्वज्ञान हे आत्मशुद्धीचा परिणाम आहे, आणि ते आत्मानुभूतीने समजते. त्यामुळे अशा लेखनाचा हेतू व्यक्तीला अंतर्मुख करणे हा असतो.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन