सुकृतची = पुण्य, चांगल्याने बनवले, चांगल्यासाठी बनवले.


      

काही लोक दोष काढतात. एका पंडिताने गमंतीने असे चार दोष दाखवले आहेत..
     
त्याला सांगायचे आहे की ब्रह्मदेवाला बुद्धी देणारा माझ्यासारखा कोणी नव्हता. त्यामुळे या जगात काही दोष राहिले आहेत. कोणते दोष?- सोने एवढे महाग आहे आणि सोन्याचा भाव रोज वाढतोय. आबालवृद्ध सर्वांना सोने आवडते. पण सोन्यामध्ये थोडा सुगंध ठेवला असता तर? त्याची किंमत केवढी वाढली असती? त्याला जर हीना किंवा केवड्यासारखा सुवास दिला असता तर? ऊस किती गोड आहे पण त्याला फळ दिले असते तर? किती गोड असते! पण त्याला फळ येत नाही. चंदनाला केवढा सुगंध! चंदनाचे लाकूड घासले तर सुगंध येतो आणि त्यावर फुल आले तर? पण त्याला फुल नाही. वित्तवान माणूस विद्वान नसतो. विद्वान असेल तर त्याच्यापाशी पैसा नसतो आणि विद्वत्ता आणि पैसा दोन्ही असले तर तो दीर्घजीवी नसतो. ब्रह्मदेवाला कोणी अक्कल देणारा नव्हता म्हणून हे दोष राहिले.
    
या महाभागाने संपूर्ण सृष्टीत शोधून शोधून दोष पाहिले, आणि तेही कसे! त्यातली गंमत जाऊ द्या‌. मूळ मुद्दा हा आहे की जगत सुकृत आहे. जगत सुकृत - चांगल्या रीतीने बनवलेले आहे. त्यामुळे त्यात कोणताही दोष नाही. कावळा पहा, कुत्रा पहा सर्वांना काही ना काही गुण देऊन ठेवले आहेत. भगवंताने ह्या पशुंना जन्मजात ज्ञान दिले आहे. खरोखर भगवंताची कला अद्भुत आहे, अपरंपार आहे. तिथे आपली बुद्धी पोहोचत नाही.
      
सुकृत म्हणजे पुण्य. या जगात येऊनच पुण्य करता येते. या पृथ्वी लोकात येऊन मनुष्य देह मिळाल्यानंतर जो माणूस चांगले काम करत नाही तो मंदभागी आहे. 
 सुकृत चा दुसरा अर्थ 'चांगल्याने बनवलेले' असा आहे. बनवणारा सैतान नाही. ही सृष्टी तुम्हाला शिक्षा करण्यासाठी नाही.  निर्माता तुमचा स्वतःचा आहे. स्वतःचा आहे असे बोलणेही चूक आहे. तुम्ही त्याचे आहात‌. ही सृष्टी अतिशय सुंदर आहे. कारण ते सुंदराने निर्मिली आहे.
      
सुकृत चा तिसरा अर्थ, 'सृष्टी चांगल्यासाठी बनवली आहे'. ही सृष्टी शिक्षा रूप नाही, हा तुरुंग नाही. ही शुभ दृष्टीने बनवली आहे, म्हणजे जीवा -शिवाचे मिलन व्हावे यासाठी बनवली आहे. ह्या सृष्टीमध्येच ईश्वराशी विवाह होऊ शकतो. ही सृष्टी विवाहस योग्य अशी परम पवित्र वेदी आहे. सृष्टीत भेद निर्माण केलेला आहे पण भेदातून अभेदात जाण्याचा आनंद आहे‌.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन