ध्येयनिष्ठ जीवन
प्राणब्रह्माची उपासना म्हणजे ध्येयनिष्ठ जीवन. वस्तुतः भगवंतापाशी जाण्याचे ध्येय माणसाला लहानपणापासूनच मिळाले पाहिजे. त्याला जीवनाचा मंत्र दिला पाहिजे. मंत्र म्हणजे काय? ज्याची आज गरज नाही, पण पुढे दीर्घकाळ ज्याची गरज पडते त्याचे नाव मंत्र. भूक लागल्यावर खा, हे बापाने मुलाला शिकवावे लागत नाही. भूक लागल्यावर तो खाणारच. तहान लागल्यावर पाणी पिणारच. थकल्यावर झोप येते म्हणून झोपणारच. मोठा झाल्यावर 'तू लग्न कर' असे मुलाला सांगावे लागत नाही. तो लग्न करणारच. आई - बापाला अमुकेक कुटुंब व्यवस्था टिकवायची असली तर ते मुलाचे लग्न स्वतः करून देतील. ज्याची माणसाला आवश्यकता वाटते ते त्याला शिकवावे लागत नाही. परंतु ज्याची त्याला आज आवश्यकता वाटत नाही ते त्याच्या कानात सांगणे याचे नाव मंत्र. पिता तु एव मंत्रद:| पित्याला म्हणूनच मंत्रद: म्हटलेले आहे. बाप मुलाला मंत्र देतो की बाळ याची तुला आज गरज वाटत नसेल; कदाचित तुला ही गोष्ट आवडतही नसेल. तरीही जीवनात ही गोष्ट फार आवश्यक आहे. म्हणून तू ती तुझ्या जीवनात आण. जीवन अशा प्रकारचे बनव जीवन श्रेष्ठ बनव. हे बापाने मुलाला सांगितले पाहिजे, याचेच नाव मंत्र.
जीवन बदलायचे म्हणजे प्रथम विचार बदलावे लागतात. जीवन तेजस्वी बनवायचे असेल तर आधी विचारांना तेजस्विता आवडली पाहिजे. विचारांना प्रभू आवडला पाहिजे. आमच्या विचारांना प्रभू आवडतो की नाही हीच शंका आहे. विचार बदलायचे असतील, जीवन बदलायचे असेल तर आधी डोके बदलावे लागते. त्याशिवाय जीवन बदलत नाही. डोके बदलण्यासाठी माणसाचा कान पकडला पाहिजे. बैल उधळतो तेव्हा त्याचे सिंग पकडले तर तो तुम्हाला उडवून देईल. त्याचे शेपूट पकडले तर लाथ मारल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला विचारा तो सांगेल की अशा बैलाचा कान पकडला तर लागलीच तो थार्यावर येतो. शांत उभा राहतो.
आज लोक म्हणतात, आज कालची पिढी फारच वेगवान आहे. अरे! मुले बिथरलेली असतील तर त्यांचा कान पकडा. म्हणजेच स्वाध्याय करून घ्या. नाही ठिकाणावर आली तर बघा. माणसाचा कान हातात आला पाहिजे. वाटेल तेवढा बिथरलेला माणूस असो त्याचा कान हातात आला की तो ठिकाणावर आलाच म्हणून समजा. भद्रं कर्णेभि श्रृणुयाम देवा:| त्याच्या कानावर भद्र विचार, उच्च विचार जाऊ द्या. हेच खरे शिक्षण आहे, हेच खरे वाङ्मय आहे.
वरील लेखात ध्येयनिष्ठ जीवन कसे असावे याबद्दल महत्त्वपूर्ण विचार मांडले गेले आहेत. याचा मुख्य सार असा आहे की, माणसाने आपल्या जीवनाला उद्दिष्टपूर्ण बनवावे. प्राणब्रह्माची उपासना म्हणजेच जीवनाला ध्येय आणि दिशादर्शक मार्गदर्शन देणे.
मुख्य मुद्दे:
1. मंत्राचा अर्थ आणि महत्त्व:
मंत्र म्हणजे असे काही जे आज आवश्यक वाटत नसले तरी भविष्यात जीवनात खूप महत्त्वाचे ठरते. वडील मुलाला जीवनाचे ध्येय सांगतात आणि आवश्यकतेपेक्षा पुढे कसे जावे हे शिकवतात. त्यामुळेच वडिलांना "मंत्रदः" (मंत्र देणारा) म्हणतात.
2. विचारांचा बदल हा जीवन बदलण्याचा पाया आहे:
जीवन तेजस्वी बनवायचे असेल तर विचार बदलावे लागतात. विचारांत प्रभू, उच्च मूल्ये, आणि ध्येय रुजवले तर जीवन स्वतःच उजळते.
3. डोके बदलल्याशिवाय जीवन बदलत नाही:
माणसाचा दृष्टिकोन आणि विचार बदलण्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. जसे बैलाला नियंत्रित करण्यासाठी कान पकडावा लागतो, तसेच विचार बदलण्यासाठी कानावर योग्य विचार आणणे आवश्यक आहे.
4. भद्र विचारांचे महत्त्व:
शिक्षण आणि वाङ्मय हे असे असावे की ते माणसाला सकारात्मक आणि उच्च विचार देईल. त्याच्या कानावर चांगले विचार पडले की, तो योग्य मार्गावर येतो.
ध्येयनिष्ठ जीवनासाठी उपाय:
स्वाध्याय: आत्मपरीक्षण आणि उत्तम विचारांचे अवलोकन जीवन सुधारण्यास महत्त्वाचे आहे.
सद्गुणांचा स्वीकार: चांगल्या विचारांना स्वीकारून जीवन अधिक तेजस्वी बनवणे.
ध्येय निश्चिती: लहानपणापासूनच जीवनाचा उद्देश समजावून सांगणे.
ध्येयनिष्ठ जीवन हेच खरे जीवनाचा मार्ग आहे, कारण त्यातच जीवनाला स्थैर्य, समाधान, आणि समृद्धी मिळते.
Comments
Post a Comment