अवर्णनीय तत्वाला शोधून बघा!


    

ही कर्मभूमी आहे. यात माणसाने जर अमुक प्रकारचा विकास केला नाही तर तो मंदभाग्य आहे, श्रुती सांगते, मंदभाग्य हा मूर्ख शब्दाचा प्रतिशब्द आहे. श्रुतीला असे वाटले की 'मूर्ख' म्हटले तर धक्का बसेल म्हणून मंदभाग्य शब्द वापरला आहे, असे वाटते.
     
एवढा चांगला देह मिळाल्यावर आनंदाकडे माणसाने एक पाऊलही टाकले नाही तर तो कमनशिबी आहे, मंदभाग्य आहे.
     
मानवी देहाद्वारे हा आनंद मिळवायचा असेल तर त्याची समज प्रथम रूढ झाली पाहिजे. आणि ती म्हणजे ते जे अलौकिक, अद्वितीय, अवर्णनीय तत्व आहे तो परमात्मा, मनुष्याच्या आत जे तत्व आहे ते आणि तेजस्वी आदित्यामध्ये असलेले जे तत्व आहे ते एकच आहे. ही समज दृढ होण्यासाठी मेहनत करायची आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा कठीणातला कठीण भाग कोणता असेल तर तो हा भाग आहे.
     
बुद्धिमान माणूस सुरुवातीला विचार करतो की मी कुठून आलो! हे जगत कोणी निर्माण केले? या जगताशी माझा संबंध काय? ज्याने जगत निर्माण केले त्याने मला कशासाठी निर्माण केले? त्या निर्मात्याचा आणि माझा संबंध काय? हे प्रश्न माणसाच्या बुद्धीमध्ये गोंधळ निर्माण करतात. त्याची उकल व्हावी म्हणून सत्संग, सत् - शास्त्र या मार्गाने प्रयत्न केला पाहिजे.
     
हा सृष्टी संचालक आहे कोण? त्याने कशासाठी सर्व निर्माण केले? हे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा दोन परंपरा डोळ्यासमोर उभे राहतात. एक पैतृक परंपरा आणि दुसरी मातृक परंपरा. तू कुणाचा मुलगा आहेस? शोधून काढ. संख्याशास्त्र दोन तत्वे समजावतात. श्रीमद्भगवद्गीता सुद्धा दोन तत्वाचा उल्लेख करते.
    
या जगताच्या मुळाशी दोन तत्त्वे आहेत, प्रकृती आणि पुरुष म्हणजे जड आणि चेतन. प्रकृती जड आणि पुरुष चेतन आहे. माणसाला वाटते की मी जर प्रकृती आणि चैतन्यापासून निर्माण झालो असेल तर माझे मातापिता हे प्रकृती पुरुष आहेत. स्वभावतः माणसाची प्रवृत्ती आजोळावर, मातृवंशावर प्रेम करण्याची दिसते. पितृ वंशावर प्रेम करण्याची त्याची प्रवृत्ती दिसत नाही. प्रकृतीचे गुणधर्म म्हणजे सत्व - रज - तम यातून निर्माण झालेली सुखे माणसाला इतकी आकर्षित करतात, नाचवतात, धाववतात, तेवढे पैतृक परंपरा माणसाला आकर्षित करीत नाही. मातृ वंशावर प्रेम करायचे, पण पितृ वंशाला विसरून नाही, हा पहिला पाठ माणसाला शिकायचा आहे.

या लिखाणात मानवी जीवन, तत्त्वज्ञान, आणि अध्यात्म यावर विचारमंथन केले आहे. मानवी देहाचे महत्त्व, त्याचा उपयोग कसा केला पाहिजे, आणि त्यामागील तात्त्विक आधार यावर प्रकाश टाकला आहे.

मुख्य विचार:

1. मानवी देह आणि मंदभाग्य:

जर माणसाने आपल्या देहाचा उपयोग आत्मविकासासाठी केला नाही, तर तो "मंदभाग्य" ठरतो. श्रुती "मूर्ख" शब्दाऐवजी "मंदभाग्य" हा सौम्य शब्द वापरते.

हा देह आनंदाच्या दिशेने नेणारा साधन आहे; त्याचा उपयोग न केल्यास तो कमनशिबी ठरतो.

2. अवर्णनीय तत्व:

प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात परमात्म्याचे अद्वितीय तत्व आहे.

सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी हे तत्व बाहेर आणि आत समान आहे.

या समजेला दृढ करण्यासाठी विचार, अभ्यास आणि साधना आवश्यक आहे.

3. मानवी विचार प्रक्रिया:

माणूस "मी कोण आहे? कुठून आलो? जगाचा निर्माता कोण?" असे प्रश्न विचारतो.

या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सत्संग आणि शास्त्रांचा अभ्यास आवश्यक आहे.

4. सृष्टीचे दोन तत्त्व:

सृष्टीच्या मुळाशी "प्रकृती" (जड) आणि "पुरुष" (चेतन) ही दोन तत्त्वे आहेत.

मनुष्य प्रकृती आणि चेतन या दोन्हीपासून निर्माण झालेला आहे.

5. पैतृक आणि मातृक परंपरा:

मानवी स्वभावतः मातृक परंपरेकडे झुकतो; पैतृक परंपरेला विसरतो.

मातृ आणि पितृ परंपरांचा समतोल राखणे आवश्यक आहे.

संदेश:

हे तत्त्वज्ञान मानवाला स्वतःचा शोध घेण्याचा मार्ग दाखवते. आत्मपरिचय, जीवनाचा हेतू, आणि सृष्टीशी नाते यांचा शोध घेतल्याशिवाय खरा आनंद मिळणार नाही. मनुष्याने प्रकृतीच्या आकर्षणात अडकून न राहता, चेतनेच्या पातळीवर उन्नती साधायला हवी.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन