जिवन आणि मरण
श्रुती सांगते अशिष्ठ: - जो माणूस आशावान आहे तोच माणूस या जगात आनंद उपभोगू शकतो. स्वतःबद्दल, लोकांबद्दल आणि प्रभु बद्दल निराश झालेल्या माणसांकडून जीवनाचा आनंद उपभोगला जाणारच नाही. जो कधी निराश होत नाही, जीवनाला कंटाळलेला नाही, ज्याला मृत्यूतही जीवनाचे बीज दिसते तो 'युवक' होय. ज्याची जीवननिष्ठा दुर्दम्य आहे तो माणूस अशिष्ठ: - आशावान होय. असेच लोक एको मानुष: आनंद्: च्या कक्षेत येतात या आनंदासाठी देदीप्यमान जीवन निष्ठा असली पाहिजे. अशिष्ठ: म्हणजे जीवनात कंटाळलेला नाही तो. जीवन कधीही मृत्यूमध्ये समाप्त होत नाही. लहान मुलांना व युवकांना दुर्दम्य जीवन निष्ठा असते. म्हातारा काय किंवा तरुण काय सर्वांना मरण हे अटळ आहे, पण एक मरणाच्या भीतीने जीवनाला आलिंगन देतो आणि दुसरा मरणाची तमा न बाळगता जीवनाला आलिंगन देतोच पण मरणालाही आलींगन देतो. दोघांमध्ये एवढा फरक आहे.
जीवनाची गोष्ट मरणात पूर्ण होते हे भगवान श्रीकृष्णाला मान्यच नाही; मरणात जीवणाचे बीज आहे.
संपूर्ण दुनिया तुम्हाला दूर लोटेल पण भगवान दूर लोटणार नाही. जो स्वतःबद्दल, जीवनाबद्दल कंटाळलेला नाही, निराश नाही तो
आशिष्ठ: तसेच जो भगवंताला म्हणतो की, 'जग सुधारेल, त्याची मी सुरुवात करेन' तो सुद्धा आशिष्ठ: कोणी म्हणेल, 'तु एकटा काय करू शकशील' तेव्हा सांगा, का नाही!
विजेतव्या लङका चरणतरणीयो जलनिधि:
विपक्ष: पौलस्त्यो रणभुवि सहायाश्च कपय:|तथाप्येको राम: सकलमवधिद्राक्षसकुलम् क्रियासिद्धी: सत्वे भवती महाता न उपकरणे||.
क्रियासिद्धी कशात आहे साधने गोळा करण्यात आहे. जशी वृत्ती असेल तशी गती मिळेल.
तुम्ही जिवन कसे जगलात, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता ठेवलात, त्याप्रमाणे तुमची वृत्ती बनेल आणि मरण समयी माणसाची जशी वृत्ती असेल तशी गती मिळेल. हा मानवी जीवनाचा जमा- खर्च आहे. म्हणून जीवनाचा खरा दृष्टिकोन जोपासण्याची सुरुवात आज पासूनच करायला हवी.
मेल्यावर सर्वांचे चैतन्य प्रभूपासीच जाते. पण त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी समज असते. भक्तांना मरण म्हणजे प्रभू मिलन वाटते. तत्त्ववेत्यांना मरणात आत्मप्रतिती दिसते. कर्मयोग्यांना मरण म्हणजे विश्रांती वाटते. आणि सामान्य लोकांना मरण म्हणजे कर्माचा न्यायप्रसंग आहे असे वाटते.
भक्तांना वाटते की मरण म्हणजे प्रभू प्रभूशी मिलन. सकाळी उठताच प्रभू डोळ्यात शक्ती भरतो, त्यांना कामी लावतो आणि जीवनाचा व्यवहार सुरू होतो. जर तुम्ही तुमच्या मित्राला रोज भेटायला जाता तर एखादे दिवशी तुमचा मित्र तुम्हालाही भेटायला येईल की नाही? अशाच प्रकारे तीनशे पासष्ट दिवस आणि ऐंशी वर्ष रोज भगवान इथे भेटायला आला तर एक दिवस मी त्याला भेटायला जाईन. याचे नाव मरण अशी भक्ताची समजूत असते.
तत्वेत्यांसाठी मरण म्हणजे आत्मप्रतीति असते. जीवन एक सावली, छाया आहे आणि छाया कधी खरी नसते. त्यांच्या दृष्टीने जीवन सत्य नाही. आत्मशक्ती सत्य आहे. म्हणून त्यांना मरण म्हणजे आत्मप्रतीति वाटते. तत्त्ववेत्ता आणि भक्ताच्या मरणाच्या दृष्टिकोनात फरक आहे.
भक्ताची समज असते की भगवंत माझा धनी आहे आणि मी त्याची पत्नी आहे. पत्नी पतीच्या घरी जाते आणि घराचा कब्जा घेते. तत्त्ववेत्ता या प्रकारचे मिलन मानतच नाही. तो आत्मप्रतीति मुळे अहं ब्रह्मास्मि असेच समजतो. 'मी एकटाच आहे' तो तर असेच म्हणतो की घर माझेच आहे.
भगवान हजारो गोपी सोबत खेळला आणि नंतर गोपींना सोडून गेला. जीवाचे हे असेच असते. सकाळपासून संध्याकाळ पर्यंत आपल्या मनात हजारो वृत्ती निर्माण होत असतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत आपण त्या वृत्तीसोबत खेळत असतो, त्यांचा आनंद उपभोगत असतो. मग त्या दुःखाच्याही असतील आणि सुखाचे देखील असतील तेव्हा उदासीनतेच्याही असतील. त्या सर्व वृत्ती अनुभवल्यानंतर रात्री झोपेत एकीचे स्मरण असत नाही. भगवान श्रीकृष्ण हजारो पत्नीसह राहिला पण तरीही तो ब्रह्मचारी आहे. जीवन हजारो वृत्ती उपभोगून मुक्त आहे. जिव बध्दच नाहीये.
Comments
Post a Comment