आशावादी व्यक्तिमत्त्व
दैवी संपत्तीवान माणसाने आशावादी असले पाहिजे. भक्कम असले पाहिजे. निराश होता कामा नये. कंटाळता कामा नये. जो माणूस जीवनाला कंटाळलेला असतो, निराश बनलेला असतो तो माणूस जीवनात आनंद उपभोगू शकत नाही. तरुण माणूस आशावादी असला पाहिजे. अशिष्ठ: शब्दाचा अर्थ 'जो कंटाळलेला नाही, निराश नाही, दुबळा नाही' अशा नकारात्मकतेत पूर्ण होत नाही. जसे 'मी क्षुद्र नाही' असे बोलून जीवननिष्ठेचा अर्थ पूर्ण होत नाही, तर 'मी महान आहे' असे बोलून जीवननिष्ठा पूर्ण होते, तसा आशिष्ठ: चा विधायक अर्थ आहे. ' आस्तिक'. मी विधाता आहे, संपूर्ण जगाचा चेहरा - मोहरा पालटायचा असेल तर तो मीच पालटेन. या जगाची अशी अवस्था कोणी केली? माणसाने. तर माणूसच ती सुधारू शकतो. अशी दुर्दम्य अशा ज्याच्यात आहे तो आस्तिक. अशिष्ठ: शब्दात अस्तिक असाही एक अभिप्रेत अर्थ आहे. अशिष्ठ: म्हणजे ज्याची मांगल्यावर श्रद्धा आहे आणि भगवंतावर विश्वास आहे तो. जो केवळ आशावादी आहे आणि जो निराश होत नाही असा तर रावणी वृत्तीचा माणूसही असू शकतो. दुर्योधन कधी निराश झाला होता? महाभारताच्या युद्धात सगळे धारातीर्थी पडले, भीष्म गेले, द्रोण गेले, कर्ण गेला आणि कित्येक महान धनुर्धारी त्याच मार्गाने गेले. शेवटी शल्याला सेनापतीपदावर नियुक्त केले तेव्हा आधीच्या एवढाच निर्धाराने दुर्योधन बोलतो, मी पांडवांना जिंकेन. तेव्हा त्याचा दुत, नोकर म्हणतो, 'राजाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्याला काही कळत नाही. पांडव जर मरणारच असते तर भीष्म लढत होते तेव्हाच मेले असते.
भीष्म गेले, द्रोण गेले ,कर्ण गेला तरीही दुर्योधनाची अशा केवढी बलवान आहे की शल्य अजूनही पांडवांना जिंकेल असे दुर्योधनाला वाटते आहे. म्हणजे असुरी काम करणारा सुद्धा आशावादी असतो. मात्र असे रेड्या पाशी बसून दूध मागणारे लोक महामूर्ख आहेत. रेड्यांना खाऊ घालून दूध तयार होत नाही शिंगे तयार होतात ते खाऊ घालणाऱ्यालाच शिंगावर घेतात. म्हशीला खाऊ घातले तर म्हैस दूध देईल पण असे लोक म्हशीला उपाशी ठेवतात आणि रेड्याला खाऊ घालतात. खाऊ घालणे हे पुण्य नाही, तर कोणाला खाऊ घालावे हे समजून खाऊ घालणे हे पुण्य आहे. भगवद्विरोधी लोकही आशावान असतात. ह्या लोकांना शेवटपर्यंत अशा असते की काही होईल, काही निष्पन्न होईल. 'अजून रेडा दूध देत नाही? मग जास्त खाऊ घाला, खूप खाऊ घालाल तर दूध देईल.' अशाप्रकारे जडवादी माणसे ही खंबीर असतात, आशावान असतात. पण ती अशिष्ठ: च्या कक्षेत बसणारी नाहीत. अशिष्ठ: मध्ये आस्तिकतेचा अर्थ अभिप्रेत आहे.
वरील लेखात "आशावादी" हा शब्द एका सकारात्मक आणि सर्जनशील दृष्टीकोनातून मांडलेला आहे. लेखकाने "अशिष्ठ:" या संकल्पनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आशावादी माणसाचे स्वरूप उलगडले आहे.
मुख्य मुद्दे:
1. आशावादी दृष्टिकोन:
माणसाने जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. निराशा आणि कंटाळवाणेपणा सोडून जीवनाला उत्साहाने सामोरे जावे.
2. अशिष्ठ: म्हणजे काय?
"अशिष्ठ:" म्हणजे असा माणूस जो निराश नाही, दुबळा नाही, परंतु तो केवळ नकारात्मकतेपासून मुक्त नसून जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगतो.
आस्तिकतेचा भाव (जग सुधारण्याची जबाबदारी स्वतःवर घेतल्याचा दृष्टिकोन) "अशिष्ठ:" या शब्दात सामावलेला आहे.
3. नकारात्मक आणि खऱ्या आशावादामधील फरक:
लेखकाने दुर्योधनाचा उदाहरण घेऊन दाखवले आहे की केवळ जिद्द किंवा आशा ठेवणे पुरेसे नाही. जर ती जिद्द चुकीच्या मार्गावर असेल तर ती विनाशकारी ठरते.
खऱ्या आशावादामध्ये विचारशीलता आणि सृजनशीलता असावी लागते.
4. समजूतदारपणा:
जीवनात कोणाला मदत करायची हे ओळखणे महत्त्वाचे आहे. योग्य विचारांवर आधारित कर्मच खऱ्या अर्थाने पुण्य आहे.
अयोग्य ठिकाणी आशा ठेवणे किंवा प्रयत्न करणे मूर्खपणाचे ठरते, जसे रेड्याला दूध मिळवण्यासाठी खाऊ घालणे.
निष्कर्ष:
आशावादी असणे म्हणजे केवळ सकारात्मक विचार करणे नाही तर योग्य कृती, विवेकबुद्धी आणि सृजनशील दृष्टिकोन यांचा समन्वय साधणे होय. असा माणूसच खऱ्या अर्थाने "अशिष्ठ:" ठरतो.
Comments
Post a Comment