प्रभूला व्यक्त करण्याची कला उपनिषद सांगते आहे.
ब्रह्म तत्वाचे वर्णन सुरू आहे. ब्रह्म तत्व व्यापक आहे तर ते व्यक्त केव्हा होते. माणसाचा शब्द आणि आवाज व्यापक आहे. तुम्ही जर जोरात आवाज काढला तर तो सर्वत्र जाईल. आणि एक प्रकारे दाब देण्यात आला तर तो आवाज आलम दुनियेत पोहोचवतो. कारण शब्दाचा आधार आकाश आहे जे व्यापक आहे; उदाहरणार्थ, आत्ता एखाद्या ठिकाणी रेडिओवर काही गीताचे सूर चालू असतील पण इथे ते ऐकू येत नाहीत, म्हणून ते इथे नाहीत असे नाही. इथे रेडिओचा सुर झेलू शकेल असे यंत्र बसून दिले तर रेडिओचे सुर लक्ष वेधून घेतील. त्यासाठी बाहेरून आवाज (ध्वनी) आणावा लागत नाही. ध्वनी इथे आहेच. फक्त त्याचे अभिव्यक्तीकरण करावे लागते. अशाप्रकारे, ब्रह्म सर्व व्यापक आहे तरी त्याला व्यक्त करण्यासाठी कोणीतरी लागतो, तेव्हाच कोणी त्याला बघू शकतो आणि कोणाला त्याचा प्रत्यय येऊ शकतो.
आता ही जी प्रभूला व्यक्त करण्याची कला आहे, ती उपनिषद सांगते आहे आणि ती जीवनाची सर्वोच्च कला म्हटले आहे. ही कला ज्यांना साध्य आहे ते श्रेष्ठ पुरुष, मुक्त पुरुष म्हटले जातात. म्हणजे व्यापक,अशरीरी, अवर्णनीय.
अवर्णनीय म्हणजे निराधार - कोणाचा आधार नाही असा. भगवंताला, परब्रम्हाला कोणाचा आधार नाही. माझा मला आधार आहे? माझा दुसऱ्याला आधार असू शकतो. माणसाच्या खांद्यावर पोपट बसला तर त्याला माणसाचा आधार आहे असे म्हणू शकतो. अर्थात माझा दुसऱ्याला आधार आहे परंतु मला माझा आधार आहे असे म्हणता येत नाही. भगवंतच अनंत रुपे घेऊन बसला असेल तर त्याला आधार कोणाचा? म्हणून भगवान निराधार आहे.
परब्रम्हाचे वर्णन निराधार असे केले आहे. त्याला कोणाचा आधार नाही, कारण हे एकच तत्व असे आहे, दुसरे कोणतेही तत्त्व असे नाही. एकमेवाद्वितीयं ब्रह्म| सर्वं खलु इदं ब्रह्म| 'मी चैतन्य आहे म्हणून माझाच मला आधार' ही भाषा योग्य नाही. अनिरुक्ते - ते तत्व भयरहित आहे.
प्रत्येक ठिकाणी भय आहे. भोग आला की रोगाचे भय येतेच. प्रमाणात खाल्ले पाहिजे. खाल्ले नाही तर आपण जगणार नाही आणि जास्त खाल्ले तर आजारी पडून मरून जाऊ. तारेवरची कसरत करणाऱ्या मदार्यासारखी कसरतच आहे. काही लोक म्हणतात, ' आम्ही संयम मानत नाही.' त्यांना सांगावे लागते की, 'संयम न मानून कसे चालेल? संयम तर स्विकारावाच लागेल.' सत् - कुळात जन्मलेल्या लोकांची स्थिती भयानक असते. खरी गोष्ट अशी आहे की ज्यांची कपडे स्वच्छ असतात त्यांना ते मळण्याचे भय असते. माणूस सोमवारी सकाळी पांढरा शर्ट घालून ऑफिसला जायला निघतो आणि बायको म्हणते, 'जाता जाता कोळशाच्या दुकानात जाऊन दोन पोती कोळसा घरी पाठवायला सांगा.' असा माणूस कोळशाच्या वखारीत कशाप्रकारे संकोच्याने, अंग चोरून उभा राहिलेला असतो ते बघण्यासारखे असते. स्वतःच्या पांढऱ्या कपड्यांना डाग लागेल याचे सतत भय त्याच्या डोक्यात असते. त्याचे कपडे पांढरे आहेत त्याला ते मळण्याचे भय असते. ज्याचे सत् कुळ असते त्यालाच स्वतःच्या कुळाची प्रतिष्ठा, खानदान सांभाळण्याची चिंता असते. माझे वाडवडील असे श्रेष्ठ होते आणि मी असा झालो तर कसे शोभेल?
पैसा आला की राजाचे भय वाटतेच. वित्तवान आणि राजा यामध्ये सतत एक संघर्ष चालू असतो. राजाला वाटते की मी त्याला पकडेनच. आणि वित्तवानाने अशी खुण गाठ मनाशि बांधलेली असते की मी राजाच्या तावडीत सापडणार नाही.
माणसाला मान मिळाल्यावर तो टिकेल की नाही याची चिंता सतावते. बळ आले की त्याला हरवणारा शत्रू येणारच. चांगले रूप आले की वृद्धावस्था आली की ते जाणारच. शास्त्र आले की वाद विवादाचे भय येते आणि गुण आले की दुर्गुणी मला आपल्यात खेचतील याचे भय वाटते. शरीराला शेवटी यम राज्याचे भय आहे. अशाप्रकारे सारे विश्व भयाने भरलेले आहे. केवळ विष्णुपद निर्भय आहे. भयरहित स्थिती केवळ चित्तशक्ती पाशीच आहे. आणि ती व्यापक आहे, अशरीरी आणि अवर्णनीय आहे, निराधार आहे. या चित्तशक्तीला ओळखून ज्याने तिचे पाय पकडले, जो तिच्या मांडीवर जाऊन बसला तो या जगातात निर्भय आहे. तुम्ही कितीही मोठी पदवी मिळवली, कितीही पैसा कमावला तरी भय राहणारच. मात्र जो प्रभुचा झाला तोच निर्भय होतो. त्याला मृत्यूचेही भय राहत नाही. ज्याने प्रभुचे पाय धरले आहेत त्याला कोणतेही भय सतावत नाही. विकसित भगवत् भक्त समजत असतो की, 'मी भगवंताचा मुलगा आहे आणि हे जगत भगवंतांनी माझ्यासाठी बनवले आहे, म्हणून ते माझे आहे.' जग स्वतःचेच आहे असे समजून जो राहायला लागला तो निर्भय
Comments
Post a Comment