अध्यायक - उत्पत्ती करणारा

संपूर्ण सृष्टी निसर्ग आपला मोठ्यातला मोठा शिक्षक आहे. पर्वताचे स्थैर्य पाहून स्थित प्रज्ञाचे दर्शन होते. चंद्राची शितलता पाहून मनुष्य जीवनात शितलतेचा गुण ध्यानी येतो. या दृष्टीने, दिव्य श्रद्धेने माणूस निसर्गापाशी गेला तर दगड, वृक्ष, पाने सुद्धा त्याच्याशी बोलतील. आपल्या ऋषीमुनींनी एवढे प्रचंड वाॾमय लिहीलेले आहे पण त्यासाठी ते काय शाळेत शिकायला गेले होते? कधीच नाही. त्यांनी झाडाकडे, पानाकडे पाहिलं आणि पाने त्यांच्याशी बोलली.
      
जिज्ञासा, बुद्धी आणि दिव्य श्रद्धा या तीन गोष्टी ज्याच्यात असतील त्याला अध्यायक: म्हणतात. जो माणूस अध्यायनशील आहे तो माणूस या जगात आनंद मिळू शकतो. 
      
अध्यायक चा दुसरा अर्थ आहे उत्पत्ती करणारा. जो सृजन करतो तो तरुण. ज्याच्यापाशी सृजनात्मक शक्ती आहे, ज्याला 'काही उभे करायचा आहे' अशी इच्छा आहे, तो अध्यायक: आहे. 'या जगामध्ये भावाची, तेजस्वीतेची उत्पत्ती करीन, रसोत्पत्ती करीन, माझ्यापाशी असलेली बुद्धीशक्ती एवढ्यासाठीच वापरेन.' अवघाची संसार सुखाचा करीन असे सांगणारे ज्ञानेश्वर तरुण आहेत याचे कारण त्यांनी रसोत्पति उभी केली आहे. घराघरात चेहरे हसरे असावेत ही खरी रसोत्पत्ति होय. कोणी म्हणेल, 'आम्ही तर सर्वांना खायला प्यायला देऊन चेहरे हासरे करू.' नुसते खायला- प्यायला द्याल तर माणसाचा बकरा होण्याचा संभव आहे. जसे शरीराला खायला देता तसेच मेंदूलाही खाद्य पुरवा. भाव द्या. भाव देण्याची व्यवस्था तुम्ही कधी केली? ही व्यवस्था जर होत नसेल तर माणूस आळशी बनेल. याचे पाप लागेल. आळशी बनने श्रेष्ठ गोष्ट नाही. कोणाला लाचार, बापडा बनवू नका. मदतीची गरज असेल तर जरूर मदत केली पाहिजे. पण समोरच्याला लाचार, बापडा बनवून नाही. मंदिरे अशी असली पाहिजेत की जिथे असे विचार मिळतील. देवदर्शन करून बाहेर निघालेली माणसे प्रफुल्लित: लोचन: बनली पाहिजेत. संतुलित अंत:करणाची बनली पाहिजेत. गतकाळाचे सर्व विसरून, मोकळा, आनंदी होऊन माणूस मंदिरातून बाहेर पडला पाहिजे. ती खरी रसोत्पति.

अध्यायक: चा तिसरा ही एक अर्थ आहे. मार्ग दाखवतो, दृष्टी देतो, इशमार्गाची दृष्टी देतो तो युवाध्यायक: होय. ज्याच्या जीवनात काही करण्यासारखे आहे त्याच्या जीवनात स्वाद आहे. ज्याच्या जीवनातून स्वाद निघून गेला असेल ते सर्व म्हातारे आहेत. लहानपणी स्वाद असतो, भाव असतो. दहा हजार रुपयांचे वीस हजार करायचे आहेत आणि हे पत्नीच्या नावावर करायचे आहेत. पत्नीचा मृत्यू होईल किंवा म्हातारी होईल, मुले स्वतःच्या पायावर उभी असतील, मग काय करायचे? माणसाची ही फार विचित्र स्थिती असते. दहा हजारांचे वीस हजार करण्यात आता आनंद राहिलेला नसतो, कारण आता वीस लाख रुपये आहेत. सतत काही ना काही कार्य हाती घ्याल तर जीवनात आनंद राहील. ध्येयहीन जीवनात आनंद नाही. ते आळणी जीवन आहे. केवळ 'खा, प्या, जगा, पैसा कमवा, घर बांधा, मुलांची लग्न लावा, म्हातारे व्हा आणि मरून जा'; हे काही जीवन नाही.
      
युवा स्यात् साधू युवाध्यायक: अशा माणसाच्या जीवनात निश्चितच खरा आनंद आहे. त्याला दुनियाचे वैभव मिळते. खायला काय मिळेल याचा त्याला प्रश्नच नाही. ध्येय आहे हाच आनंद आहे. त्याच्या परिश्रमामुळे आपण स्वातंत्र्य उपभोक्तो आहोत, त्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांपाशी जबरदस्त बुद्धी होती. तरीही त्यांनी ती स्वतःसाठी वापरली नाही. अरे, काही खायला मिळाले नाही तर दोन आण्याचा पाव खात. पण असे असूनही ते सूखी होते कारण त्यांच्या जीवनात ध्येय होते.

या लेखात "अध्यायक" या संकल्पनेचे विस्तृत विवेचन केले आहे. अध्यायक म्हणजे केवळ ज्ञान ग्रहण करणारा नाही, तर तो सृजनशील, मार्गदर्शक आणि जीवनात ध्येयाच्या मार्गाने चालणारा असतो. हा विचार तीन मुख्य अंगांनी मांडलेला आहे:

1. निसर्ग: सृष्टीचा महान शिक्षक

निसर्गाकडून माणसाला शिकता येते. पर्वताचे स्थैर्य, चंद्राची शीतलता, वृक्ष- पानांचे मौन हे सगळं शिकवणारं आहे. लेखक सांगतात की, प्राचीन ऋषी-मुनींनी शाळेत जाऊन नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात शिकले. जिज्ञासा, बुद्धी आणि श्रद्धा असणारा माणूस अध्यायक होतो. तो अभ्यास, चिंतनातून आनंद शोधतो.

2. सृजनशीलता: अध्यायक म्हणजे उत्पत्ती करणारा

अध्यायक हा सृजनशील असतो. त्याच्याकडे जीवनात काहीतरी निर्माण करण्याची जिद्द आणि विचार असतो. संत ज्ञानेश्वरांनी रसोत्पत्ती केली, म्हणजे समाजात आनंद, समाधान आणि विचारांचे पोषण दिले. शरीराला अन्न पुरवणे महत्त्वाचेच, पण त्याचबरोबर मन आणि बुद्धीला भावनिक आणि बौद्धिक खाद्य मिळायला हवे. मंदिरे, शिक्षणसंस्था अशा ठिकाणी माणसाला विचार, आनंद आणि नवीन दृष्टिकोन मिळायला हवा.

3. मार्गदर्शन: युवाध्यायक म्हणजे दिशा देणारा

अध्यायक हा मार्गदर्शक असतो. त्याच्या जीवनात ध्येय असते, ज्यामुळे त्याला आनंद आणि समाधान मिळते. लेखक म्हणतात, ध्येय नसलेले जीवन आळणी असते. जीवनाला स्वाद मिळवण्यासाठी सतत काहीतरी अर्थपूर्ण कार्य हातात असावे लागते. ध्येयवादी लोकांचा संघर्ष देखील आनंददायक असतो, कारण त्यामागे मोठे उद्दिष्ट असते. स्वातंत्र्यसैनिकांचे उदाहरण देत लेखक सांगतात की, त्यांनी स्वतःच्या फायद्याची अपेक्षा न करता ध्येयासाठी झगडले आणि त्यामुळेच ते खरे आनंदी होते.

लेखाचा गाभा

लेखाचा सार असा आहे की, "युवा स्यात् साधू युवाध्यायक" म्हणजे युवकांनी साधूवृत्तीने अध्ययनशील, सृजनशील आणि मार्गदर्शक व्हावे. जीवनात ध्येय असल्याशिवाय आनंद आणि समाधान मिळत नाही. अभ्यास, चिंतन, सृजनशीलता आणि ध्येयवाद यांच्यामुळेच खरे जीवन सुसंस्कृत आणि समृद्ध होते.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन