अन्नाची विपुलता हीच खरी समृध्दी!
आज युग बदलायला लागले आहे. अन्नाला प्रतिष्ठा हे कळून चुकले आहे. ज्या देशात आन्नासाठी भिकारी व्हावे लागते त्याची जगात काही किंमत नाही. जगात आज तीन देश प्रभावीपणे उभे आहेत. अमेरिका, रशिया आणि चीन त्यांच्यापाशी अन्नाची विपुलता आहे; म्हणून ते देश मोठे आहेत. शस्त्रसामुग्री, यंत्रसामुग्री, औद्योगिक सामग्री कमी असली तरी चालेल, परंतु अन्नसामुग्री भरपूर असली तरच देश उभा राहू शकतो.
इंग्लंड हे पहिल्या क्रमांकावर राहिलेले राष्ट्र आहे. त्याच्यापाशी शस्त्रसामुग्री आणि यंत्रसामग्री मोठी होती. दोन महायुद्धानंतर मात्र इंग्लंडला कळून चुकले की ज्याच्यापाशी अन्नसामग्री नसेल त्या देशाला जगात प्रतिष्ठा मिळत नाही. सर्वापेक्षा अन्नसामग्री श्रेष्ठ आहे. इंग्लंडने अन्नाला महत्त्व देऊन शेती उद्योगाला प्राधान्य दिले आणि शेतकऱ्याचे महत्त्व वाढवले.
अन्नब्रह्म आहे ही गोष्ट इंग्लंडला समजून चुकली. इंग्लंड पाशी भरपूर कापूस आहे. कापूस ही शेतातच उगवतो. इंग्लंडपाशी कापड बनवण्याची यंत्रसामुग्री होती, शस्त्रसामुग्री होती पण अन्न नसल्याने ते चीं चीं करीत होते.
प्रभू कृपेने ज्या लोकांना अन्नाची प्रतिष्ठा आहे त्यांनी कार्य समजून घेतले पाहिजे की वाटेल ते करून देशाचे अन्नाच्या बाबतीत स्वावलंबी झालेच पाहिजे. अन्न ही माणसाची मुख्य गरज आहे. राष्ट्राच्या दृष्टीने अन्नाला प्राधान्य दिले पाहिजे. वैयक्तिक दृष्ट्या पाहता माणसापाशी दुपारच्या खाण्यासाठी एक मुठ तांदूळ असला तरी तो विश्वाचा बादशहा आहे आणि जर नसेल तर?
अन्नाला फार मोठी किंमत आहे. उपनिषद सांगणारा शांतपणे उपनिषद सांगतो आणि ऐकणारे शांतपणे ऐकतात कारण घरी गेल्यावर त्यांचे ताट वाढून ठेवलेले असणार आहे. व्यक्तीच्या जीवनात अन्न ही मोठ्यातली मोठी गोष्ट आहे. राष्ट्र जीवनातही अन्नाला अत्यंत महत्त्व आहे.
शेतकऱ्यांनी संस्कृती उभी केली आहे अशा आपल्या देशात मानले जाते. प्रत्येक वर्णाच्या लोकांनी उपजीविकेसाठी काय करायचे ते स्मृतिकारांनी ठरवून दिले आहे. शेती, अन्नब्रह्मा आहे, म्हणून तेजस्वी आहे. ब्रह्म सर्वांसाठी आहे तशी शेती सुद्धा सर्व वर्णनासाठी आहे असे स्मृतिकारांनी सांगितले आहे. ब्राह्मणाने व्यापार केला तर ते चुकीचे समजले जाईल, पण त्याने शेती केली तर? ते चालायचे. क्षत्रिय ब्राह्मणाचे काम करेल किंवा व्यापार करेल तर चुकीचे ठरत होते पण त्याने शेती केली तर चालायचे. कोणाही माणसाने शेती केली तर चालेल असा नियम स्मुर्तीकारानी पाच हजार वर्षांपूर्वी करून ठेवला आहे. ज्या काही लोक अविकसित होते, जंगली अवस्थेत होते, असे काही लोक म्हणतात त्या काळाची ही गोष्ट आहे.
"अन्नाची विपुलता" हा लेख अन्नाच्या महत्त्वावर प्रकाश टाकतो. राष्ट्राच्या प्रगतीसाठी अन्न हे केंद्रबिंदू असल्याचे लेखात स्पष्ट केले आहे. लेखात इंग्लंड, अमेरिका, रशिया, आणि चीन या देशांचे उदाहरण देत अन्नसंपत्तीमुळे त्यांची ताकद कशी वाढली आहे हे सांगितले आहे.
लेखात असे नमूद आहे की, एक देश शस्त्रसामुग्री किंवा यंत्रसामग्रीत पिछाडीवर असला तरी अन्नसंपत्ती भरपूर असल्यास तो देश जगात उभा राहू शकतो. इंग्लंडने दोन महायुद्धांनंतर अन्नाच्या महत्त्वाची जाणीव करून घेतली आणि शेती व शेतकऱ्यांना प्राधान्य दिले.
शेतकऱ्यांचे श्रम आणि शेतीमुळे संस्कृती उभी राहिली आहे. शेतकरी हा समाजाचा आधारस्तंभ असून, शेती ही प्रत्येक वर्णासाठी योग्य व्यवसाय असल्याचे प्राचीन स्मृतिकारांनी सांगितले आहे.
या लेखाचा मुख्य संदेश असा आहे की, अन्न ही मानवाच्या जीवनाची प्राथमिक गरज आहे. वैयक्तिक किंवा राष्ट्रीय स्तरावर अन्नसंपत्तीची उपलब्धता म्हणजे स्वावलंबनाची आणि प्रतिष्ठेची खूण आहे. अन्न हीच खरी संपत्ती आहे, आणि त्याशिवाय प्रगती शक्य नाही.
Comments
Post a Comment