महान व्यक्तिमत्त्वाची ओळख | Recognition of great personality

         
जीवन प्रगल्भ बनले पाहिजे.तर आनंद - म्हणजे काय हे लक्षात येईल. ही जीवणाची साधना आहे. साधना करता करता जीवन बदलून जाते. सुरुवातीला माणसाचे जीवन शुद्ध बनले तरी लोकांना तो मोठा भगत बुवा वाटतो. त्याला अजून तर आणखी चार पायऱ्या चढायचे आहेत. हे चारचे चार गुण ज्यांच्या जीवनात येतात ते वाल्मिकी, याज्ञवल्क्य सारखे महापुरुष गणले जातात. लहान सहान भगत तर पुष्कळ सापडतात. त्यांच्या जीवनात काही गुण आलेले सुद्धा दिसतात. ते लोकांचे मार्गदर्शक सुद्धा बनतात. त्यांच्या योगे लोकांची जीवने चांगली बनतातही. पण तरीही ते पैल तीरावर पोहोचलेले भक्त गणले जाऊ शकत नाहीत. मी त्यांना कमी लेखत नाही, पण हकीकत आहे ती सांगावीच लागते. मला अशांची नावे घेण्याची इच्छा देखील होते पण मी ती इच्छा रोखून धरत असतो. कारण समज कमी असलेल्या लोकांचा त्यांच्याबद्दल गैरसमज होईल. याज्ञवल्क्य, वाल्मिकी यांची जीवने शुद्ध, दैवी, तेजस्वी, प्रगल्भ आहे. म्हणून ते पूर्णोऽहम् आणि धन्योऽहम चा आनंद अनुभवत आहेत. सैषा वारुणी विद्या - तिलाच वारुणी विद्या म्हणतात. तिलाच भार्गवी विद्या म्हणतात. जीवनात ही विद्या आणा आणि जगात महान कीर्ती मिळवा, देवाच्या दरबारात कीर्ती मिळवा. ही विद्या तुम्ही मिळविलीत, पचवीलीत की महान कीर्ती मिळणारच. हा माणूस भगवंताचा बनला त्याला मग मिळवायचे काय बाकी राहिले? मानवी जीवनात हे प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

वरील लेखनात जीवनाच्या प्रगल्भतेवर, साधनेवर, आणि शुद्ध जीवनाच्या महत्त्वावर विचार मांडले आहेत. लेखक जीवन शुद्ध, तेजस्वी आणि प्रगल्भ बनवण्याचा संदेश देतो. साधनेच्या माध्यमातून मनुष्याच्या जीवनात चार प्रमुख गुण येतात, जे त्याला महान व्यक्तिमत्त्वाकडे नेऊ शकतात.

मुख्य मुद्दे:

1. साधनेचे महत्त्व: जीवन शुद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. यामुळे माणसाचे जीवन बदलून जाते.

2. महान व्यक्तिमत्त्वाची ओळख: वाल्मिकी, याज्ञवल्क्य यांसारख्या महापुरुषांचे जीवन दैवी, तेजस्वी, आणि पूर्णत्वाकडे पोहोचलेले आहे.

3. लोकांचे मार्गदर्शन: लहान भगत लोकांसाठी मार्गदर्शक असतात, परंतु पूर्णत्वापर्यंत पोहोचण्यासाठी अजून प्रगल्भतेची आवश्यकता असते.

4. सैषा वारुणी विद्या: जीवनात वारुणी किंवा भार्गवी विद्या आणल्याने मानवाला महान कीर्ती प्राप्त होते आणि तो भगवंताचा बनतो.

संदेश:
मनुष्याने साधनेच्या माध्यमातून जीवनात शुद्धता आणि प्रगल्भता आणावी, जेणेकरून जीवनाचा आनंद मिळेल आणि महान कीर्ती प्राप्त होईल. हीच साधना जीवनाचा खरा अर्थ आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन