Posts

Showing posts from October, 2024

नरक चतुर्दशी

Image
 नरक चतुर्दशी      ह्या दिवशी लक्ष्मीचे पूजन सांगितले आहे. पर पेरणासाठी वापरली जाते ती अ-शक्ति, स्वार्थासाठी वापरतात ती शक्ती, रक्षणासाठी वापरतात ती काली तर प्रभू कार्यासाठी वापरतात ती महाकाली. स्वतःच्या स्वार्थासाठी शक्ती वापरणारा दुर्योधन, दुसऱ्याच्या चरणावर शक्ति वाहणारा कर्ण तसा प्रभू कार्यात शक्ती हवन करणारा अर्जुन. महाभारतात या तीन पात्रांचे उत्कृष्ट चित्रण करून महर्षी वेद व्यासांनी आपल्याला स्पष्ट जीवनदर्शन दिले आहे.      नरक चतुर्दशीला काली चतुर्दशीदेखील म्हणतात. नरक चतुर्दशीची कथा असे आहे : प्रागज्योतिषपुराचा राजा नरकासुर शक्ती मुळे सैतान बनला होता. स्वतःच्या शक्तीने तो सर्वांना त्रास देत होता. एवढेच नाही तर सौंदर्याचा शिकारी असा तो स्त्रियांनाही 27 होता. त्याने स्वतःच्या जणां खाण्यात 16000 कन्यांना कैद करून ठेवले होते. भगवान श्रीकृष्णाने त्याचा नाश करायचा विचार केला. श्री उद्धाराचे हे काम असल्यामुळे सत्य वाहने नारकासुराचा नाश करण्याचा विडा उचलला. भगवान श्रीकृष्ण मदतीला राहिले‌. चतुर्दशी दिवशी नारकासुराचा नाद झाला. त्याच्या त्रासात...

धनत्रयोदशी

Image
दीपोत्सव   दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव, प्रसन्नतेचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव! दीपोत्सव हा केवळ एक उत्सव नाही. तर उत्सवाचे स्नेहसंमेलन आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी सुरू होणारे नवे वर्ष आणि भाऊबीज असे पाच उत्सव, पाच विविध सांस्कृतिक विचारधारा घेऊन ह्या उत्सवात संमेलन झालेले आहेत पूर्ण जाणीवपूर्वक जर हा उत्सव साजरा करण्यात आला तर मानवाला समग्र जीवनाचे स्पष्ट दर्शन यातून मिळेल.   धनत्रयोदशी   धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. भारतीय संस्कृतीने लक्षमी तुच्छ किंवा त्याचे मानण्याची चूक कधी केली नाही. लक्ष्मीला आई समजून तिला पूजनीय मानले आहे. वैदिक ऋषींनी तर लक्ष्मीला उद्देशून गाईलेले आहे.  ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमही| तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात्||  'महालक्ष्मीला मी जाणतो. विष्णुपत्नीचे ध्यान करतो त्या लक्ष्मीने आमच्या मनबुद्धीला प्रेरणा द्यावी.'      सुईच्या क्षेत्रातून उंट निघून जाईल पण श्रीमंताला स्वर्ग मिळणार नाही. ह्या ख्रिस्ती धर्माच्या विधानाशी भारतीय विचारधारा सहमत नाही. भारतीय दृष्टीने धनवा...

विकसित जीवन

विकसित जीवन      जगातील सर्वच पदार्थ, जड वस्तू पण उत्क्रांत होऊन विकसित होतात, दुसऱ्याचे जीवन सुखी बनवतात. फक्त माणूसच निरोपयोगी आहे! सांगण्याचे तात्पर्य, 'मी माणूस आहे' हेच जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत 'मी ब्रह्म आहे' हे कुठून सिद्ध होणार? म्हणून गीता स्पष्ट समजावते, की माझ्या रस्त्याने चालतो तो माणूस. दैवी संपत्तीचे जीवन जगणे हाच प्रभूचा रस्ता आहे आणि दुसऱ्याचे जीवन दैवी संपत्ती युक्त बनवणे हे भगवंताचे काम आहे आणि भगवंताचे काम जो करतो तोच माणूस आहे.      आज जगात दैवी संपत्तीची उपेक्षा होते आहे. आणि माणसांची सर्व शक्ती असुरी वृत्ती वाढवण्यात खर्ची पडते आहे. प्रभूच्या रस्त्याने जाणे म्हणजे श्रुती सांगते त्याप्रमाणे जे प्राणतत्व आहे त्याला ब्रह्म समजून त्यांची उपासना करायची. त्याला ब्रह्म समज आणि हा प्राण ब्रह्माच्या रस्त्याने जाऊ लागेल तेव्हा तो ब्रह्म होईल. त्याला ब्रह्म समजून प्राणाची उपासना केली पाहिजे.         प्राणाची उन्नती होतेच. झुरळापासून एक एक स्थिती बदलत जाते. उन्नत होत होत जीव माणूस झाला, त्याला बुद्धी दिली, कर्तुत्व दिले...

निरूपयोगी कोण ?

  निरूपयोगी कोण ?     पशु मरतो तेव्हा त्याच्या चामड्याचा जोडा तरी बनतो, पण माणूस मरतो तेव्हा त्याचे काही बनते? माणूस हा या सृष्टीतला निरोपयोगी प्राणी आहे. परंतु या शरीराचा फार मोठा उपयोग आहे असे समजावून संत सांगतात की नर अपनी करनी करे तो नरका नारायण हो जाये - माणूस स्वतःचे कर्तव्य कर्म करेल तर तो नारायण होऊ शकतो. नराचा नारायण होणे याचेच नाव जीवन. त्याने केवळ रूप बदलायचे नारायण नर कसा झाला ते आपल्याला माहित नाही, पण नराचा नारायण व्हायचा असेल तर मेहनत करावी लागतेच. परंतु तो नर राहील तर ना? नर असेल तर नारायण होईल ना?       दुनियेतील सर्व पदार्थांमधील निरोपयोगी पदार्थ कोणता ते शोधून काढले पाहिजे. एका संन्याशापाशी एक युवक आला आणि त्याने तत्त्वज्ञान समजावण्याची विनंती केली. पण तत्त्वज्ञान हे काही असे गाठोडे नाही की पटकन सोडून समजावे. त्यासाठी दृष्टी जोपासावी लागते. परंतु युवक उत्साही होता. जिज्ञासू वृत्तीने आला होता. त्यामुळे संन्याशाने म्हटले की, 'तू जगात जा आणि एक निरुपयोगी पदार्थ घेऊन ये.'       युवकाला वाटले की यात काय मोठीशी कठीण गोष्ट आहे. एक...

मी माणूस आहे

 'मी माणूस आहे'        पुष्कळदा आश्चर्य वाटतं की आपण केवढी भजने आणि श्लोक घोकतो. तासन् तास श्लोकांची अंताक्षरी पण खेळतो. आपल्याला दुनियेभराच्या गोष्टी लक्षात राहतात. रेल्वेचे टाईम - टेबल पण पाठ असते आणि पैशाची देवाण-घेवाण सुद्धा. सर्व काही लक्षात असते. आपली स्मरणशक्ती केवढी 'पावरफुल' आहे! अरे, अनेक वर्षांपूर्वीची घटना ही जशीच्या तशी लक्षात असते. पण हे तीन शब्द की 'मी माणूस आहे', हे मात्र आपल्या लक्षात राहत नाही.        शस्त्रकारांचा आग्रह आहे की हे तीन शब्द, 'मी माणूस आहे' हे लक्षात ठेव. पण खेदाची गोष्ट ही आहे कीअनेकदा घोकूनही ते माणूस विसरतो. तुम्ही त्याला स्मरण करून द्याल तर तो तुमच्यावर रागवेल आणि विचारेल की, मी माणूस % तर कोण आहे? तुम्ही त्याला वानर म्हणाल तर ते त्याला पटणार नाही. पण तो स्वतःच्या मरकटलेला चालू ठेवेल. तुम्ही त्याला बोका म्हणाल तर तुमच्या तोंडावर गुरकावेल आणि अहंकाराच्या अंधकारात उभा राहून तो स्वतःचा गुरगुराट करतच राहील. तुम्ही त्याला कुत्रा म्हणाल तर तो तुमच्यावर भुंकेल पण दिवसाढवळ्या त्याच्या प्रणय चेष्टा चालूच राहतील. ...

योगक्षेमं वहाम्यहम्

Image
 योगक्षेमं वहाम्यहम् अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते|  तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्|| माझ्याशिवाय अन्य कोणाचाही आश्रय ज्यांनी धरलेला नाही असे जे माझे भक्त, माझे चिंतन करत निरंतर मला भजतात, अशा सतत माझ्यातच आसक्तचित्त भक्तांचा 'योगाक्षम' मी चालवतो. मात्र आज माणूस स्वतःच्याच माणसाचे शोषण करून योगक्षेम चालवण्याचा प्रयत्न करतो. स्वतः झिजून भगवान ज्याला 'माझा' मानतो त्याचा योगक्षम सांभाळतो आणि माणूस ज्याला स्वतःचा मानतो त्याचे शोषण करून स्वतःचा योगक्षण चालवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःचा भक्त संकटात पडतो तेव्हा देव त्याच्यासाठी खड्ड्यात उडी मारायलाही तयार होतो आणि माणसाला कळले की त्याचा मित्र संकटात आहे तर तो काही माहितीच नसल्यासारखा तोंड फिरवून निघून जातो. अशा प्रकारे ईश्वर आणि जीवाचा मेळ कसा व्हावा?       देव सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे, देव शक्तीचे भंडार आहे, जीव अल्प शक्ती आहे. त्याच्या मार्गाने जीव कसा काय चालणार?       भगवान सत्यं शिवं सुंदरम् आहे आणि माणसात यातील एकाचा तरी ठिकाण आहे? देव बनण्याची गोष्ट तर दूरच ...

कुठे ईश्वर आणि कुठे तू ?

Image
कुठे ईश्वर आणि कुठे तू? व्यवहारात आपण पुष्कळदा म्हणतच असतो की 'जरा माणसासारखा वाग.' 'याच्यात माणुसकीच नाही.' तर मग माणसाची व्याख्या काय? दोन हात, दोन पाय म्हणजे माणूस? घर बांधतो म्हणून माणूस? दुसऱ्याला भाकरीचे तुकडे फेकून मोठेपणा घेतो तो माणूस? सामान्य रित्या दुसऱ्याला मदत करतो त्याला आपण माणूस म्हणतो. परंतु वस्तुत: हे सत्य नाही. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे- मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वशः   वर्त म्हणजे रस्ता. माझा रस्ता अनुसरून जो चालतो तो माणूस म्हणायचा. परंतु हे आपल्या अनुभवाच्या विरुद्ध आहे.        लोक ईश्वराच्या शब्दाचे श्रवण करतात, अर्थ विश्लेषण करून कथन देखील करतात, पण त्याचे अनुसरण करतात असे वाटत नाही. कारण की आपली समजूत आहे की न देवचरितं चरेत्| देवापाशी आचरण आपल्या कडून कसे होणार? देवासारखे आचरण तर देवालाच शोभते! आपण तसे आचरण केले तर दीड शहाण्यामध्ये गणले जाऊ. एकटेच नाही, कोणी त्या रस्त्याने चालला तर त्याला पण आपण ठपके देत म्हणतो की, 'कुठे ईश्वर आणि कुठे तू? भगवान भले गीतेमध्ये खूप सांगतात, सांगायला त्यांचं काय जात...

प्राण म्हणजे कोण?

Image
  प्राण म्हणजे कोण?      ज्याप्रमाणे यापूर्वी अन्नमय कोषाचे शरीर मानले होते त्याचप्रमाणे प्राणाचा पण शरीर आत्मा मानला आहे. म्हणून प्राणमय शरीर म्हटले आहे.       अन्नमयकोषाला ब्रह्म समजा असे म्हटलेय, कारण की अन्नामुळे तर जीवन चालते. अन्नामुळेच रक्त बनते. त्याच्यामुळेच माणूस मोठा होतो. खाल्ले नाही तर वजन कमी होईल. अशा प्रकारे, समग्र शरीर अन्नामुळेच बनलेले असल्याकारणाने त्याला ब्रह्म समजून उपासना केली पाहिजे.        श्रुती समजावते की शरीर हे काही जीवनाचे सर्वस्व नाही. त्याच्या आत प्राणवायू फिरत राहिला आहे ते महत्त्वाचे आहे. म्हणून त्याला ब्रह्म समजून उपासना करायला सांगितले आहे.        प्राण म्हणजे कोण? आपल्या आतील प्राणवायू. पण प्राणवायू जड आहे. तर मग गावठी भाषेत सांगायचे तर प्राण म्हणजे 'मी'. तर मग काय मी माझीच उपासना करायची? नाही, असे नाही. श्रुतीचे सांगणे आहे की आतली जी प्राणशक्ती आहे. ती विकसित करायची आहे. माणसे क्रियाशील आहेत, ज्ञानशील आहेत, जे ज्ञानबुद्धीत उतरले ते क्रियेमध्ये आणण्याची त्यांची हिमं...

अर्जुनाने भगवंताला केलेला प्रश्न ?

Image
ददामिबुध्दीयोगं    योगच्चलितमानसा : - अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला होता की देवा! मी कामाला लागतो. समजा आज माझे वय पंचेचाळीस वर्षे आहे पण मध्येच माझे प्राण निघून गेले तर? तुमच्या नादाला लागून संसाराचे काम केले नाही आणि तुमचेही काम झाले नाही, तर माझी काय गती होईल? इहलोक पण बिघडेल आणि परलोक पण बिघडेल.  तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की, हे अर्जुना! भिऊ नकोस.       तोच बुद्धी संयोग तुला पुढच्या जन्मात मिळेल. तू काही नवीन घेऊन येत नाहीस, केवळ नवा जन्म, नवे रूप, नवा रंग आणि नवे नाव घेऊन येतोस. बाकी सर्व तेच तुला सूक्ष्म रूपाने मिळते आणि ते तुला विकसित करायचे आहे. म्हणून प्राणालाच आयुष्य समजणे योग्य नाही. हा प्राण सुद्धा आयुष्य होऊ शकतो, केव्हा? जेव्हा हे प्राण ब्रह्मोपासते| प्राणो ही भूतानाम् आयु:| प्राणाला ब्रह्म समजून उपासना करण्यात आली तर त्याला सर्वायुषमुच्यते इति| सर्वायुष्य म्हणता येईल.   

आयुष्याची सुरुवात आणि शेवट यांतील साम्य

Image
नाटकाचा एक अंक      मनुष्य, पशु किंवा देवांना प्राण अनुकूल राखूनच जीवनधारणा करावी लागते. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांची जीवनधारणा या वायूला, प्राणाला अनुकूल राहूनच होते. सर्व भूत मात्रांचे आयुष्य प्राणच आहे. म्हणून प्राणाला आयुष्य समजण्यात येते. परंतु आयुष्य आणि प्राण यात फार मोठा फरक आहे. भगवंतापासून दूर झालो म्हणजे आयुष्याची सुरुवात होते आणि भगवंतात एक रूप झालो म्हणजे आयुष्य पूर्ण होते. एकरूप होत नाही तोपर्यंत जिवाचा नाटकासारखा एक एक अंक खेळला जात असतो. उदाहरणार्थ पहिला अंक असतो. तो पूर्ण झाल्यावर दुसरा अंक पक्षाचा सुरू होतो. नंतर पशुचा अंक आणि त्यानंतर माणसाचा अंक सुरू होतो. माणसामध्ये सुद्धा जसजसे उन्नत जीवन होत जाते तस तसा पुढचा जन्म मिळत जातो.        आपली अशी समजूत आहे की माणसाच्या मृत्यू झाला की त्याचे आयुष्य पूर्ण झाले. परंतु आयुष्य तिथे पूर्ण होत नाही. प्राण एवढी प्रभावी शक्ती आहे की लोक प्राणालाच आयुष्य समजतात.        सर्व लोक आयुष्य प्राणा वरून नक्की करतात. एकदा का आतील प्राणवायू बंद झाला की आयुष्य पूर्ण...

प्राण म्हणजे कोण?

Image
  प्राण म्हणजे कोण?      ज्याप्रमाणे यापूर्वी अन्नमय कोषाचे शरीर मानले होते त्याचप्रमाणे प्राणाचा पण शरीर आत्मा मानला आहे. म्हणून प्राणमय शरीर म्हटले आहे. अन्नमयकोषाला ब्रह्म समजा असे म्हटलेय, कारण की अन्नामुळे तर जीवन चालते. अन्नामुळेच रक्त बनते. त्याच्यामुळेच माणूस मोठा होतो. खाल्ले नाही तर वजन कमी होईल. अशा प्रकारे, समग्र शरीर अन्नामुळेच बनलेले असल्याकारणाने त्याला ब्रह्म समजून उपासना केली पाहिजे.        श्रुती समजावते की शरीर हे काही जीवनाचे सर्वस्व नाही. त्याच्या आत प्राणवायू फिरत राहिला आहे ते महत्त्वाचे आहे. म्हणून त्याला ब्रह्म समजून उपासना करायला सांगितले आहे.        प्राण म्हणजे कोण? आपल्या आतील प्राणवायू. पण प्राणवायू जड आहे. तर मग गावठी भाषेत सांगायचे तर प्राण म्हणजे 'मी'. तर मग काय मी माझीच उपासना करायची? नाही, असे नाही. श्रुतीचे सांगणे आहे की आतली जी प्राणशक्ती आहे. ती विकसित करायची आहे.       माणसे क्रियाशील आहेत, ज्ञानशील आहेत, जे ज्ञानबुद्धीत उतरले ते क्रियेमध्ये आणण्याची त्यांची हिमं...

पंचप्राणांची व्यवस्था

  पंचप्राणांची व्यवस्था  या प्राणमय आत्म्याचा प्राण माथा आहे. व्यान उजवा पक्ष आहे, अपान डावा पक्ष आहे म्हणजे प्राण, अपान , व्यान, उदान आणि समान अशी पंचप्राणांची व्यवस्था केली आहे. एकच माणूस पाच ठिकाणी काम करत असतो तेव्हा तो वेगवेगळ्या नावाने ओळखला जातोच ना! घरात माणसाला सर्वजण दादा म्हणून हाक मारतात, पण ऑफिसमध्ये तो सेक्रेटरी साहेब म्हणून ओळखला जातो. क्लब मध्ये सगळे त्याला प्रेसिडेंट म्हणून संबोधतात. वेगवेगळ्या कामानुसार जशी माणसाला वेगवेगळी नावे असतात त्याप्रमाणे एकच प्राणवायू आहे पण तो वेगवेगळी कामे करत असल्याने तो वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.        प्राणवायू हृदयात असतो, अपानवायू मलमूत्रविसर्जनाचे काम करतो. अपानवायू बिघडला तर मल मूत्रविसर्जनाचे काम योग्यरीत्या होत नाही. आपली संपूर्ण आयुर्वेदाची पद्धती ही त्रिदोष पद्धती आहे आणि ती कफ, पित्त आणि वात यावर आधारित आहे. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी मध्ये केवळ औषधांचा फरक नाही तर त्यांच्या मूलभूत चिकित्सा पद्धतीतच फरक आहे. शरीरात कफ, पित्त आणि वात हे तीनही असले पाहिजेत आणि ते सम राहिले पाहिजेत. त्यांना सामान ठेवण्याच...