आयुष्याची सुरुवात आणि शेवट यांतील साम्य

नाटकाचा एक अंक
    
मनुष्य, पशु किंवा देवांना प्राण अनुकूल राखूनच जीवनधारणा करावी लागते. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांची जीवनधारणा या वायूला, प्राणाला अनुकूल राहूनच होते. सर्व भूत मात्रांचे आयुष्य प्राणच आहे. म्हणून प्राणाला आयुष्य समजण्यात येते. परंतु आयुष्य आणि प्राण यात फार मोठा फरक आहे. भगवंतापासून दूर झालो म्हणजे आयुष्याची सुरुवात होते आणि भगवंतात एक रूप झालो म्हणजे आयुष्य पूर्ण होते. एकरूप होत नाही तोपर्यंत जिवाचा नाटकासारखा एक एक अंक खेळला जात असतो. उदाहरणार्थ पहिला अंक असतो. तो पूर्ण झाल्यावर दुसरा अंक पक्षाचा सुरू होतो. नंतर पशुचा अंक आणि त्यानंतर माणसाचा अंक सुरू होतो. माणसामध्ये सुद्धा जसजसे उन्नत जीवन होत जाते तस तसा पुढचा जन्म मिळत जातो.
      
आपली अशी समजूत आहे की माणसाच्या मृत्यू झाला की त्याचे आयुष्य पूर्ण झाले. परंतु आयुष्य तिथे पूर्ण होत नाही. प्राण एवढी प्रभावी शक्ती आहे की लोक प्राणालाच आयुष्य समजतात.
      
सर्व लोक आयुष्य प्राणा वरून नक्की करतात. एकदा का आतील प्राणवायू बंद झाला की आयुष्य पूर्ण झाले असे समजतात. वास्तविक आयुष्य पूर्ण होत नाही, ते ट्रान्सफर होते. शास्त्रीय परिभाषेत सांगायचे तर ते चालूच राहते. तोच लिंगदेह घेऊन माणसाला पुढे जायचं आहे. आणि तोच लिंगदेह परत येणार आहे. जेवढी बुद्धीची कमाई केली असेल, बुद्धी जेवढे सुसंस्कारी केली असेल तेवढी पुढील जन्मात उपयोगी पडेल. नसेल केली तर नव्या जन्मात तशीच मिळेल.
  

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन