योगक्षेमं वहाम्यहम्
योगक्षेमं वहाम्यहम्
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते|
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्||
माझ्याशिवाय अन्य कोणाचाही आश्रय ज्यांनी धरलेला नाही असे जे माझे भक्त, माझे चिंतन करत निरंतर मला भजतात, अशा सतत माझ्यातच आसक्तचित्त भक्तांचा 'योगाक्षम' मी चालवतो. मात्र आज माणूस स्वतःच्याच माणसाचे शोषण करून योगक्षेम चालवण्याचा प्रयत्न करतो. स्वतः झिजून भगवान ज्याला 'माझा' मानतो त्याचा योगक्षम सांभाळतो आणि माणूस ज्याला स्वतःचा मानतो त्याचे शोषण करून स्वतःचा योगक्षण चालवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःचा भक्त संकटात पडतो तेव्हा देव त्याच्यासाठी खड्ड्यात उडी मारायलाही तयार होतो आणि माणसाला कळले की त्याचा मित्र संकटात आहे तर तो काही माहितीच नसल्यासारखा तोंड फिरवून निघून जातो. अशा प्रकारे ईश्वर आणि जीवाचा मेळ कसा व्हावा?
देव सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे, देव शक्तीचे भंडार आहे, जीव अल्प शक्ती आहे. त्याच्या मार्गाने जीव कसा काय चालणार?
भगवान सत्यं शिवं सुंदरम् आहे आणि माणसात यातील एकाचा तरी ठिकाण आहे? देव बनण्याची गोष्ट तर दूरच राहिली, देवाच्या रस्त्याने चालण्याची ही ज्याची तयारी नाही असा हा पामर जीव, भगवान जे सांगतो आहे ते कसा काय करू शकणार? चला हे सर्व समजण्यासारखे आहे की भगवंताच्या रस्त्याने आपण चालू शकत नाही, ते फार कठीण वाटते, परंतु मी माणूस आहे याचीही माणसाला कल्पना नाही.
Comments
Post a Comment