कुठे ईश्वर आणि कुठे तू ?

कुठे ईश्वर आणि कुठे तू?

व्यवहारात आपण पुष्कळदा म्हणतच असतो की 'जरा माणसासारखा वाग.' 'याच्यात माणुसकीच नाही.' तर मग माणसाची व्याख्या काय? दोन हात, दोन पाय म्हणजे माणूस? घर बांधतो म्हणून माणूस? दुसऱ्याला भाकरीचे तुकडे फेकून मोठेपणा घेतो तो माणूस? सामान्य रित्या दुसऱ्याला मदत करतो त्याला आपण माणूस म्हणतो. परंतु वस्तुत: हे सत्य नाही. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे- मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वशः  वर्त म्हणजे रस्ता. माझा रस्ता अनुसरून जो चालतो तो माणूस म्हणायचा. परंतु हे आपल्या अनुभवाच्या विरुद्ध आहे.
      
लोक ईश्वराच्या शब्दाचे श्रवण करतात, अर्थ विश्लेषण करून कथन देखील करतात, पण त्याचे अनुसरण करतात असे वाटत नाही. कारण की आपली समजूत आहे की न देवचरितं चरेत्| देवापाशी आचरण आपल्या कडून कसे होणार? देवासारखे आचरण तर देवालाच शोभते! आपण तसे आचरण केले तर दीड शहाण्यामध्ये गणले जाऊ. एकटेच नाही, कोणी त्या रस्त्याने चालला तर त्याला पण आपण ठपके देत म्हणतो की, 'कुठे ईश्वर आणि कुठे तू? भगवान भले गीतेमध्ये खूप सांगतात, सांगायला त्यांचं काय जाते .अरे, आपलेच्याने त्यांच्या रस्त्याने चालणे कसे होईल?'
      
ममत्वाच्या दृष्टीने सुद्धा विचार केला तरी भगवान अख्ख्या दोन्हीकडे प्रेमाने बघतो आहे, परंतु माणूस स्वतःच्या खिडकीच्या बाहेर दुसऱ्या कडे बघायला तयार नाही. भगवान सुष्टांचे रक्षण करतो आणि दुष्टांना शासन करतो.जीव सुष्टाची उपेक्षा करतो आणि दुष्टाला सलाम करतो. भगवान ज्याला 'माझा' म्हणतो त्याचा योगक्षेम सांभाळतो.... 

.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन