मी माणूस आहे

 'मी माणूस आहे' 
     
पुष्कळदा आश्चर्य वाटतं की आपण केवढी भजने आणि श्लोक घोकतो. तासन् तास श्लोकांची अंताक्षरी पण खेळतो. आपल्याला दुनियेभराच्या गोष्टी लक्षात राहतात. रेल्वेचे टाईम - टेबल पण पाठ असते आणि पैशाची देवाण-घेवाण सुद्धा. सर्व काही लक्षात असते. आपली स्मरणशक्ती केवढी 'पावरफुल' आहे! अरे, अनेक वर्षांपूर्वीची घटना ही जशीच्या तशी लक्षात असते. पण हे तीन शब्द की 'मी माणूस आहे', हे मात्र आपल्या लक्षात राहत नाही.
      
शस्त्रकारांचा आग्रह आहे की हे तीन शब्द, 'मी माणूस आहे' हे लक्षात ठेव. पण खेदाची गोष्ट ही आहे कीअनेकदा घोकूनही ते माणूस विसरतो. तुम्ही त्याला स्मरण करून द्याल तर तो तुमच्यावर रागवेल आणि विचारेल की, मी माणूस % तर कोण आहे? तुम्ही त्याला वानर म्हणाल तर ते त्याला पटणार नाही. पण तो स्वतःच्या मरकटलेला चालू ठेवेल. तुम्ही त्याला बोका म्हणाल तर तुमच्या तोंडावर गुरकावेल आणि अहंकाराच्या अंधकारात उभा राहून तो स्वतःचा गुरगुराट करतच राहील. तुम्ही त्याला कुत्रा म्हणाल तर तो तुमच्यावर भुंकेल पण दिवसाढवळ्या त्याच्या प्रणय चेष्टा चालूच राहतील.
    
आज माणसाला पशू म्हणाल तर त्याला राग येतो. त्याला देव म्हटले तर ते त्याच्या डोक्यात उतरत नाही, मग तो आहे तरी कोण? शास्त्रकारांना विचाराल तर ते म्हणतात, 'अरे बाबा! तू तर मोठा माणूस आहेस. 
      
फार मोठे पुण्य खर्चून हे शरीर विकत घेतले आहेस. 'हे मानवी शरीर वारंवार मिळत नाही. एवढे वैभव पुन्हा मिळणार नाही. तुम्ही उत्क्रांतीप्रमाणे मानवी जीवनाचा विचार कराल तर करोडो वर्षापासून हे चालत आले असेल आणि त्या काळाच्या दरम्यान माणूस म्हणून तो जन्मतो तेव्हा त्यात त्याला माणूस म्हणून जगून स्वतःचे कर्तुत्व दाखवण्यासाठी जास्तीत जास्त पंचवीस पन्नास वर्षे मिळतात. भगवंताने जीवाला मनुष्य देह दिला आहे, तो वापरण्यासाठी दिला आहे.
     
तुम्ही कोणाचे मडके उसने घेऊन आलात आणि ते तुमच्या स्वयंपाक घरात ठेवले असेल आणि तो माणूस वाटेल तेव्हा येऊन त्याचे मडके घेऊन गेला तर आपण त्याला विचारू शकत नाही की, 'अहो, तुम्ही ते असेच कसे घेऊन जाता?' चुपचाप बघत बसावे लागते. त्याचप्रमाणे शरीर उसने घेतलेले आहे, म्हणूनच तर त्याच्या इच्छे प्रमाणे तो देव परत घेतो.
  

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन