धनत्रयोदशी
दीपोत्सव
दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव, प्रसन्नतेचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव! दीपोत्सव हा केवळ एक उत्सव नाही. तर उत्सवाचे स्नेहसंमेलन आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी सुरू होणारे नवे वर्ष आणि भाऊबीज असे पाच उत्सव, पाच विविध सांस्कृतिक विचारधारा घेऊन ह्या उत्सवात संमेलन झालेले आहेत पूर्ण जाणीवपूर्वक जर हा उत्सव साजरा करण्यात आला तर मानवाला समग्र जीवनाचे स्पष्ट दर्शन यातून मिळेल.
धनत्रयोदशी
धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. भारतीय संस्कृतीने लक्षमी तुच्छ किंवा त्याचे मानण्याची चूक कधी केली नाही. लक्ष्मीला आई समजून तिला पूजनीय मानले आहे. वैदिक ऋषींनी तर लक्ष्मीला उद्देशून गाईलेले आहे.
ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमही| तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात्||
'महालक्ष्मीला मी जाणतो. विष्णुपत्नीचे ध्यान करतो त्या लक्ष्मीने आमच्या मनबुद्धीला प्रेरणा द्यावी.'
सुईच्या क्षेत्रातून उंट निघून जाईल पण श्रीमंताला स्वर्ग मिळणार नाही. ह्या ख्रिस्ती धर्माच्या विधानाशी भारतीय विचारधारा सहमत नाही. भारतीय दृष्टीने धनवान लोक भगवंताचे लाडके मुलगी आहेत. गेल्या जन्मातील योग भ्रष्ट जीवात मे आहेत. 'शुचनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते|' तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्| यस्यां हिरण्यं वींदेय गामाश्वं पुरुषानहम्||
'हे जातवेदस्! जी प्राप्त होताच मी सुवर्ण, गायी, घोडे आणि ईष्टमित्र मिळू शकेन अशी अविनाशी लक्ष्मी मला तू दे.'
लक्ष्मी चंचल नाही तर लक्ष्मी वाहन मानवाची मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे. त्याने मानव देवही बनू शकतो आणि दानव देखील होऊ शकतो. लक्ष्मीला भोगप्राप्तीचे साधन समजणारा मानव पतनाच्या खोलघरतेत गडगडत जातो तर लक्ष्मीचे मातृवत पूजन करून तिला प्रभूचा प्रसाद समजणारा मानव स्वतः पवित्र बनतो व सृष्टीला पावन करतो. विपरीत मार्गाने वापरले जाते ती अलक्ष्मी, स्वार्थात वापरले जाते ते वित्त, पराठे वापरले जाते तो ती लक्ष्मी, आणि प्रभू कार्यार्थ वापरले जाते ती महालक्ष्मी. हत्तीवर बसून वाजत गाजत येते. हत्ती हा अवदर याचे प्रतीक आहे. सांस्कृतिक कार्यात उदारम हाताने लक्ष्मी खर्च करणाऱ्याच्या घरात ती पिढ्या आणि पिढ्या राहिलेली आहे. रघुवंश याचे ज्वलंत उदाहरण आहे. लक्ष्मी ही एक महान शक्ती असल्यामुळे ती चांगल्या लोकांच्या हातातच राहिली पाहिजे. त्यामुळे त्याचा सुयोग्य उपयोग होतो. राजर्षीचे गुणगान करणारी आपली संस्कृती फिलॉसॉपर किंग ची कल्पना देणाऱ्या ग्रीक तत्त्वचिंतक प्लेटोच्या मनात हेच विचार खेळविते.
Comments
Post a Comment