अर्जुनाने भगवंताला केलेला प्रश्न ?


ददामिबुध्दीयोगं
  
योगच्चलितमानसा: - अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला होता की देवा! मी कामाला लागतो. समजा आज माझे वय पंचेचाळीस वर्षे आहे पण मध्येच माझे प्राण निघून गेले तर? तुमच्या नादाला लागून संसाराचे काम केले नाही आणि तुमचेही काम झाले नाही, तर माझी काय गती होईल? इहलोक पण बिघडेल आणि परलोक पण बिघडेल.
 तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की, हे अर्जुना! भिऊ नकोस.
      तोच बुद्धी संयोग तुला पुढच्या जन्मात मिळेल. तू काही नवीन घेऊन येत नाहीस, केवळ नवा जन्म, नवे रूप, नवा रंग आणि नवे नाव घेऊन येतोस. बाकी सर्व तेच तुला सूक्ष्म रूपाने मिळते आणि ते तुला विकसित करायचे आहे. म्हणून प्राणालाच आयुष्य समजणे योग्य नाही. हा प्राण सुद्धा आयुष्य होऊ शकतो, केव्हा? जेव्हा हे प्राण ब्रह्मोपासते| प्राणो ही भूतानाम् आयु:| प्राणाला ब्रह्म समजून उपासना करण्यात आली तर त्याला सर्वायुषमुच्यते इति| सर्वायुष्य म्हणता येईल.


  

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.