असुरक्षित असणाऱ्यांचे रक्षण देखील भगवंतच करतो.
प्रारब्धवशात बाळाची आई जर मेली तर भगवंत तेच प्रेम मावशीमध्ये किंवा आत्ये मध्ये किंवा अन्य कोणामध्ये तरी भरतो आणि बाळ लहानाचे मोठे होते. जो आरक्षित आहे त्याचे रक्षण देव करतो आहे, मात्र सुरक्षित आहे ते भग्यवशात नाश पावते. वनात टाकलेल्या अनाथाचेही रक्षण होते आणि अनेक प्रयत्न करूनही घरात सांभाळलेले ही नाश पावतो. मेनकेला विश्वामित्र पासून मूल झाले तिला ते मूल नको होते म्हणून तिने त्याचा त्याग केला. पण भगवान काय त्या बाळाला तसाच सोडणार? भगवंताने जी ममता मानवात भरली आहे तीच ममता पशुपक्षातही भरली आहे. त्या परित्यक्त बाळाचे शंकुत पक्षांनी रक्षण केले ते पक्षी चोचीत पाणी भरून आणून त्या बाळाच्या मुखात घालीत. शंकूत पक्षांनी त्या बाळाचे रक्षण केले असल्यामुळे तिचे नाव शाकुंतला ठेवण्यात आले. कण्व ऋषींनी तिला पाहिल्यावर तिला आश्रमात आणून लहानाचे मोठे केले आणि तिचे दुष्यंत राजाशी लग्न झाले . जंगलात एखाद्या वृक्षाच्या खाली त्यागलेली ही बालिका पुढे राणी झाली, वीर माता झाली. तिला जे वीर संतान झाले, त्याचे नाव भरत. त्या भरताच्या नावावरूनच आपल्या देशाचे नाव भारत पडले (INDIA THAT IS BHARAT). भारत नाव विच...