श्राद्धपक्ष
श्राद्धपक्ष
भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्षाचा पंधरवडा श्राद्धपक्ष अथवा पितृपक्ष किंवा महालय पक्ष म्हणून संबोधण्यात येतो. हे दिवस म्हणजे पूर्वजांच्या आणि ऋषीमुनींच्या स्मरण तर्पनाचे दिवस. श्राद्ध म्हणजे श्रद्धाया यत् क्रियेते तत्| श्रद्धेने जी अंजली अर्पण करण्यात येते. त्याला श्राद्ध म्हणण्यात येते. या पूर्वजांनी व पितरांनी आपल्या कल्याणासाठी चामडी झिजविली, रक्ताचे पाणी केले, त्या सर्वांचे श्रद्धेने स्मरण करून ते ज्या योनीत असतील त्या योनीत त्यांना दुःख होऊ नये, सुख व शांती मिळावी, यासाठी पिंडदान व तर्पण करायचं म्हणजे श्राद्ध.
तर्पण करायचं म्हणजे तृप्त करायचे, संतुष्ट करायचे. ज्या विचारासाठी ज्या धर्म व संस्कृतीसाठी त्यांनी स्वतःचे जीवन खर्च केलेले असेल ते विचार धर्म व संस्कृती टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्न केला, त्यांची अब्रू, प्रतिष्ठा वाढावी असे वर्तन व जीवन ठेवले तर ते आवश्य तृप्त होतील. रोज देव, पितर व ऋषी तृप्त राहावेत असे जीवन जगले पाहिजे आणि वर्षभरात एक दिवस ज्या पितरांना, ऋषींना आपण मानलेले असेल त्यांच्या श्रद्धा निमित्त आपण आपल्या जीवनाचे आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि किती पुढे गेलो व कोणत्या चुका केल्यास राहून विचार केला पाहिजे.
श्राद्ध परंपरा टेकविली पाहिजे, सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवला पाहिजे. निसर्ग ज्याला शरीराने घेऊन जातो त्याचे श्रद्धामय जीवन अमर बनवले पाहिजे. काळ आणि ज्याचा नाश केला आहे पण करणे व विचार यांनी ज्यांना चिरंजीव बनविलेले आहे अशा धर्मवीरांचे व कर्मवीरांचे, कृतज्ञ भावाने पूजन करून ह्या दिवसात कृतकृत्य व्हायचं असते. मानवी जीवन विविध ऋणमुक्तीसाठी आहे. आपल्या रविवार देवाचे ऋण आहे. आणि ऋषींचे ऋण आहे. या निस्वार्थ कर्मयोगी यांच्या रुतून मुक्त होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे त्याचा या पंधरा दिवसात विचार करायचा असतो.
श्रद्धाचा दिवस म्हणजे ऋषीकरपणाचा दिवस. भारतीय संस्कृतीची महानता, भव्यता, दिव्यता ही ऋषींची कर्तबदारी आहे. भारताला आजही विश्वात किंमत मिळत आहे त्याचे कारण आपले ऋषी आहेत. भावी पिढीने आनंदमय जीवन जगावे यासाठी निरपेक्ष भावाने रक्ताचे पाणी करून त्यांनी दिव्य विचारसरणी दिली आहे. स्वतः जवळून लोकांची जीवनी प्रकाशित केले आहेत; म्हणून समाज त्यांचा ऋणी आहे. ऋषींचे ऋण चुकते करण्यासाठी ऋषींच्या विचारांचा प्रचार केला पाहिजे. ऋषींची संस्कृती टिकवण्यासाठी व तिचा फैलाव, प्रसार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांच्या कृपेने आपण लहानाचे मोठे झालो आपल्या कल्याणासाठी ज्यांनी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग केला त्या पितरांचे आपल्यावर ऋण आहे. कोणाही मानवाने निस्वार्थ भावाने आपले काही काम केले, आपल्यावर काही उपकार केले तर आपण त्याचे ऋणी झालो असे म्हणतात. आपल्या पितराने आपल्यावर असंख्य उपकार केले आहेत. त्यांची तृप्ती होईल असे काही करणे हाच पितृ ऋणातून मुक्त होण्याचा उपाय आहे एखाद्या कारणास्तव पिता स्वतःच्या जीवनाचे निश्चित ध्येय साध्य करू शकला नाही तर ते साध्य करण्याची जबाबदारी पुत्राची असते. पुत्र ही अभिलाषा पूर्ण करेल तर पिता संतोष होईल, हे स्वाभाविक आहे. 'सम्यक् तनोती तनु विस्तारे' पित्याने दिलेल्या ध्याला पुढे घेऊन जातो त्याला संतान म्हणतात. असा पुत्रच पित्याचे खरे तर पण करू शकतो.
पितृ तर्पण म्हणजे पितरांचे आठवण करून त्यांनी दि दिलेले ध्येय मी पुढे घेऊन गेलो त्याचा आढावा घेणे. जो जन्मतो तो मरतो; श्रद्धाचे दिवस म्हणजे हा आटळ मृत्यूचा विचार करण्याचे दिवस. मृत्यूला पवित्र मानून, नृत्य पितर व ऋषी यांची आठवण करण्याच्या दिवसांनाही आपण पवित्र मानतो मलाही माझ्या पितरण प्रमाणे जायचं आहे त्याचे स्मरण श्राद्ध पक्षात ठेवून सतत कृत्याचे पात्र बांधायला तयार झाले पाहिजे.
विविध रोणातून मुक्त होण्याचा ह्या दिवसातच विचार करायचा आहे. एवढेच नाही तर आपल्यामध्ये हे ज्ञान येतात ते दुसऱ्यालाही द्यायचे. श्रद्धेने होते ते श्राद्ध. पण आज तर सर्व श्रद्धेचे श्राद्ध करून बसले आहेत. परिणामतः मानव जीवनाचे सबंध भाव शून्य ममत्व रहित व यंत्रवत बनले आहेत. चार्वाकच्या परंपरेतील लोक आजही श्रद्धाची मस्करी करतात. हे मानव जीवनाचे खरे मर्म समजू शकले नाहीत. पश्चिमेच्या चष्म्यातून पूर्वजांना पाहणारे पूर्वजांचे हृदय कसे समजू शकणार? 'येथे ब्राह्मणांना खाऊ घातलेले इतरांना जर पोचत असेल तर मुंबईत खाल्लेले दिल्लीला राहणारा का पोहोचत नाही' असे त्यांचे तर्कज्ञान आहे. भारताच्या बँकेत भरलेला पैसा अमेरिकेत येथील चलनात प्राप्त होतो. मुंबईच्या स्नेहाचा आवाज टेलिफोनवर जसाच्या तसा कलकत्त्याला ऐकू शकतो, तर मग भक्ती भावाने, शुद्ध अंतकरणाने आणि अनन्य श्रद्धेने केलेले श्राद्ध मंत्री शक्तीच्या बळावर पितरांना तृप्ती देते ही गोष्ट आधुनिक चार लोकांच्या डोक्यात का उतरत नाही हा एक प्रश्न आहे. त्यांच्या ह्या भ्रांत व चुकीच्या समजुतीला दूर करून कृतघ्न बनत चाललेल्या या सर्वांना कृतज्ञ बनविण्याचे काम समजदार लोकांचे आहे. ते करण्यासाठी प्रभुणे आपल्याला शक्ती द्यावी हेच प्रार्थना!
Comments
Post a Comment