जीवनमुक्त ( जीवन एक कला )


 

जीवन मुक्ती

जो ब्रह्मविद् आहे, म्हणजे ज्याने ब्रह्म जाणलेले आहे, तो म्हणतो, 'मी काम करत नाही, ब्रह्म करते आहे.' ब्रह्म खेळते आहे, ब्रह्म पाहत आहे, ब्रह्म खात आहे, ब्रह्म पित आहे, असा ज्याला अनुभव आला आहे, अशी ज्याने समज निर्माण केली आहे. त्या माणसाला परम् आप्नोति म्हणजे निरतिशय सुख प्राप्त होते, म्हणजे ज्याच्याहून अधिक सुखाची गोष्ट नाही, अशा स्थितीला तो प्राप्त होतो. या जगात निरतिशय सुखाची स्थिती मिळवणे म्हणजे कोणत्या जबाबदारीविना जगणे. जबाबदारी नसलेला माणूस हा जगात सुखी माणूस. 

जबाबदारी विना जगतो म्हणजे, काय केले? किती केले? केले की नाही? असे प्रश्न ज्याला विचारण्यात येत नाहीत आणि त्याचे उत्तर द्यावे लागत नाही तो जबाबदारी विना माणूस. या जगातली ही परम सिद्धी आहे‌. या जगातून गेल्यानंतर तर कोणी याला विचारणार नाही आणि जगाला विचारण्याचे कारण देखील नाही.

या जगात राहायचे, फिरायचे पण कोणत्याही प्रकारची जबाबदारी शिरावर घ्यायची नाही, ही निरातिशय गोष्ट आहे; ही एक प्रकारची उत्कृष्ट कला आहे, It's an art. जीवन एक कला आहे. अशा प्रकारचे जीवन जगणे ज्याला जमले तो जीवन जगला. ब्रह्मच माझ्यामार्फत राहते अशी समज ज्याला आली तो परमोच्य सुखाचे जीवन प्राप्त करतो, जगतो. ती जीवन मुक्त स्थिती आहे.

भगवंताविषयी प्रेम निर्माण झाले पाहिजे, त्याच्या कार्याकरता मी मरण पत्करणे असे वाटले पाहिजे. आपले व भगवंताचे अंतर कमी झाले पाहिजे आणि अंतर कमी होता होता भगवान आपल्याला सोबत आहे की समज निर्माण झाली पाहिजे. भगवंतच माझ्यात बसला आहे असे वाटायला हवे.  ही ब्रह्मविदची स्टेज आहे.

ह्या ब्रह्मविदच्या स्टेजवर असलेला जीव परम् आप्नोति म्हणजेच निरतिशय ,उत्कृष्ट दैवी जीवन जगतो. म्हणजेच जबाबदारी विना जीवन जगतो. त्यालाच म्हणतात 'जीवनमुक्त

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन