ब्रह्मविद्



 ब्रह्मविद्

 सद्वर्तनाने, धर्माने जीव जवळ येताच सत्संगात एखाद्या महापुरुषाच्या संसर्गाने माणसाला कळू लागते की ईश्वर माझ्यासोबत आहे. ईश्वराला बाहेर शोधायची गरजच नाही. हे शरीर ईश्वर चालवतो, मी नाही. त्यानंतर त्याला पुढे असे वाटू लागते की, 'ईश्वर माझ्यासोबतच आहे' ह्यात 'माझे' स्वतंत्र अस्तित्व आहे. पण वास्तविक या जगात मला अस्तित्व कुठे आहे?

तुम्ही गीता वाचाल तर तुम्हाला कळेल, हे शरीर दोन मसाल्यांनी भरलेले आहे एक मसाला चैतन्य व दुसरा मसाला पंचमहाभूते‌. पंचमहाभूते म्हणजे 'मी' नव्हे. पंचमहाभूते जड आहेत. 'मी' जड नाही. तर मग चैतन्य म्हणजे 'मी' आहे का? नाही. चैतन्य म्हणजे प्रभू. पंचमहाभूते आणि चैतन्य याशिवाय तिसरी गोष्ट इथे नाही, तेव्हा 'मी' उरलोच नाही. भगवंताच राहिला.

ही सुंदर सृष्टी बनवल्यावर भगवान माझ्या मार्फत पाहतो आहे. या शरीरात सर्व कर्म ईश्वरच करतो आहे, ही समाज ज्याला आली त्याला ब्रह्मवीद् माणूस म्हणतात.

आपण या जगात आलो हे खरे पण आपल्याला पाठवले कुणी? पाठवले कशासाठी? आलो कशाप्रकारे? ते आपल्याला ठाऊक नाही. पण आपण दिवस-रात्र एक करून काम धंदा करतो, काळेबेरेही करतो, बत्तीशी पडून जाते, सरळ असतो ते वाकडे होतो आणि एक दिवस ॐ तत् सत्.. ह्याला का सिध्दी म्हणतात?

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.