जीवानाचा विकास
जीवाचा विकास
केवळ सदवर्तन किंवा पुण्यकारक कर्मावरच समाधान मानून चुपचाप न बसता तो जीव मग भगवंताला शोधू लागतो. खूप शोध घेऊ लागतो की ईश्वर कुठे आहे?
एक माणूस हातात जळता कंदील घेऊन इथे तिथे फिरत होता. सगळे लोक त्याच्याकडे पाहत होते. कोणाला असे वाटले की त्याची काहीतरी वस्तू हरवली असेल. पैसे पडले असतील, हिरा पडला असेल, दागिना हरवला असेल किंवा दुसरे काहीतरी पडले असेल ते तो शोधत असेल. कोणाला वाटले त्याच्या मुलाला शोधत असेल. असे एक एक समजून रस्त्यातून येणारे जाणारे लोक त्याच्याकडे पाहत होते की गरीब माणूस आहे. काही हरवले आहे ते शोधतो आहे, शोधू द्या त्याला आपण कोणाच्या वैयक्तिक बाबी मध्ये पडण्याची काय गरज? इतकी माणसे जात-येत होती. त्यामध्ये एक कोणी ईश्वर भक्त होता. त्याला वाटले की हा माणूस काय शोधतो आहे ते त्याला विचारू या. तर मग थोडे अंतर थांबून त्याच्याजवळ जाऊन त्याने विचारले, 'अहो तुम्ही ते काय शोधत आहात?' तेव्हा तो माणूस म्हणाला, 'काय करू, माझ्या कंदील शोधतो आहे . 'कंदील? कंदील तर हा काय तुमच्या हातातच आहे.' तेव्हा तो शोधणारा माणूस म्हणाला, 'अरे हे काय! खरच की! बरं झालं तुम्ही भेटलात. मी वेडा, हा कंदील कुठे आहे ते शोधत होतो.'
आनेकदा बुद्धीला भ्रम होतो. अशावेळी 'तुझा कंदील तुझ्या हातातच आहे'. असा एखादा कोणीतरी सत्याचे दर्शन करून देतो. अशाच प्रकारे ईश्वर कुठे आहे? हे शोधत राहिलेला जीव, कशासाठी फिरत राहिला आहे हे विचारावे असे सर्वसामान्य माणसांना वाटत नाही, इच्छा होत नाही आणि गरजही वाटत नाही. अशाच प्रकारे गणपतरावला, शंकररावला पुज्या आर्च्या करताना आजूबाजूची अगणित माणसे पाहत असतात. या माणसात त्याची बायको असते, मुलगा असतो, सर्व असतात पण लोकांना असे वाटते हा देवाची पूजा करतो आहे. बिचाऱ्याला पैसे मागायचे असतील, मागू देत. कोणाला असे वाटते की ह्याला कीर्ती हवी असेल. ते तर भगवंता जवळच मागणार ना? दुसऱ्या कोणाकडे मारणार?
श्रीमद आद्य शंकराचार्य सांगतात तसे क्षुधा तृषार्ता जननी स्मरन्ति|
कोणाला वाटते की याला मुलगा हवा असेल. कोणाला काय वाटते नी कोणाला काय? मागणी करण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत! यावर आधीक काही सांगण्याची गरज नाही. भगवंता! आमक्याचे केस चांगले आहेत तितके माझे नाहीत, मला चांगले केस दे. ते चांगले पाहिजेत, कपडे चांगले पाहिजेत, आणखी इतरही काही चांगले-चुंगले पाहिजे असेल. कोणाला चांगले नकोय?
Comments
Post a Comment