असुरक्षित असणाऱ्यांचे रक्षण देखील भगवंतच करतो.
प्रारब्धवशात बाळाची आई जर मेली तर भगवंत तेच प्रेम मावशीमध्ये किंवा आत्ये मध्ये किंवा अन्य कोणामध्ये तरी भरतो आणि बाळ लहानाचे मोठे होते.
जो आरक्षित आहे त्याचे रक्षण देव करतो आहे, मात्र सुरक्षित आहे ते भग्यवशात नाश पावते. वनात टाकलेल्या अनाथाचेही रक्षण होते आणि अनेक प्रयत्न करूनही घरात सांभाळलेले ही नाश पावतो.
मेनकेला विश्वामित्र पासून मूल झाले तिला ते मूल नको होते म्हणून तिने त्याचा त्याग केला. पण भगवान काय त्या बाळाला तसाच सोडणार? भगवंताने जी ममता मानवात भरली आहे तीच ममता पशुपक्षातही भरली आहे. त्या परित्यक्त बाळाचे शंकुत पक्षांनी रक्षण केले ते पक्षी चोचीत पाणी भरून आणून त्या बाळाच्या मुखात घालीत. शंकूत पक्षांनी त्या बाळाचे रक्षण केले असल्यामुळे तिचे नाव शाकुंतला ठेवण्यात आले. कण्व ऋषींनी तिला पाहिल्यावर तिला आश्रमात आणून लहानाचे मोठे केले आणि तिचे दुष्यंत राजाशी लग्न झाले . जंगलात एखाद्या वृक्षाच्या खाली त्यागलेली ही बालिका पुढे राणी झाली, वीर माता झाली. तिला जे वीर संतान झाले, त्याचे नाव भरत. त्या भरताच्या नावावरूनच आपल्या देशाचे नाव भारत पडले (INDIA THAT IS BHARAT).
भारत नाव विचारतात हा भरत ध्यानात येत नसेल तर त्याला कृतघ्नता म्हटली पाहिजे. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की भगवान स्वतः उचललेले जबाबदारी सोडत नाही. म्हणून तो सत्य आहे, म्हणजे अनृत नाही, अप्रामाणिक नाही.
अप्रमाणिकता जी दुसऱ्या गोष्टीमुळे येते ती आहे दिलेला शब्द न पाळणे. भगवंताने दिलेला शब्द पाळलेलाच आहे. त्याने जी जी वचने दिली ती त्यांनी पाळली आहेत. त्याने सांगितलं हे पार्थ जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते व अधर्माचे वृद्धी होते तेव्हा तेव्हा प्रर्दुभूत होतो.
हे पार्थ अशा पुरुषाचा या लोकात किंवा परलोकात नाश होत नाही. कोणतेही शुभ कर्म करणारा म्हणजे भागवत् कर्म करणारा दुर्गतीला प्राप्त होत नाही. तो सत्वर धर्मात्मा होतो आणि शाश्वत परम शांती प्राप्त करतो. हे अर्जुना नक्की समज की माझा भक्त नाश पावत नाही. जे अनन्य भावाने माझ्यात स्थित झालेले भक्तजन माझे- परमेश्वराचे- निरंतर चिंतन करून निष्काम भावनेने माजी उपासना करतात अशा, माझ्यात नित्य स्थित झालेल्या जनांचा योगक्षम मी वाहतो, सांभाळतो.
हे कोणा सामान्याने दिलेले शब्द नाहीत, हे तर स्वयं भगवंताने दिलेले शब्द आहेत. त्याने पुरे केलेच आहेत.

Comments
Post a Comment