सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म ( यह जो जिंदगी हमारी अमानत प्रभू तुम्हारे )


 

सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म

परंतु सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म असे फक्त म्हणून ब्रह्माचे स्पष्ट कल्पना येत नाही. कारण की केवळ 'काय आहे' एवढ्याने त्याचे वर्णन होऊ शकत नाही. त्यामुळे 'काय नाही' हे देखील वर्णन केले पाहिजे. तत्त्वाचे अधिक स्पष्टता यावी यासाठी सांगावे लागते की ते सत्य आहे, अनृत नाही; ज्ञान आहे जड नाही आणि अनंत आहे, मर्यादित नाही.

अनृत चे तीन अर्थ होतात.

         (१) खोटा

         (२) अप्रमाणिक व

         (३) अनित्य. 

ब्रह्म खोटे नाही, म्हणून ते सिद्ध करावे लागत नाही, खोटी गोष्ट सिद्ध करावी लागते.

 भगवान खोटा नाही की त्याला सिद्ध करावे लागेल. अनेक लोक मला म्हणतात, 'भगवान आहे हे सिद्ध करा.' पण त्यांना कसे समजवायचे की जो सिद्धच आहे त्याला सिद्ध कसे करायचे? काही लोक 'अस्ति परमेश्वरो वा, नास्ति परमेश्वरो वा' परमेश्वर आहे की नाही हा चर्चेचा विषय बनवतात. एखादा म्हणतो 'मी आहे' हे सिद्ध करा. तर ती काही सिद्ध करायची गोष्ट नव्हे. 'मी नसेन' तर 'मी आहे' हे सिद्ध करावे लागते. म्हणून भगवान आहेच . ते सिद्ध करावेच लागत नाही.

 I breathe therefore I am- मी श्वासोच्छ्वास करतो म्हणजे मी आहेच. आणि जोपर्यंत श्वास चालू राहणार आहे तोपर्यंत मी आहेच. ते सिद्ध करायची गरज नसते. त्याप्रमाणे भगवान हा सिद्ध करण्याचा विषयच नाही. त्याच्याबद्दल चर्चा करणे हा केवळ शाब्दिक विलास आहे. भगवान आहेच म्हणजे तो खोटा नाही.   

 अनृत चा दुसरा अर्थ आहे जे प्रमाणिक नाही. ते ब्रह्म अप्रामाणिक नाही. अप्रामाणिकता दोन गोष्टीमुळे येते 

    (१) घेतलेली जबाबदारी सोडणे ही अप्रामाणिकता आहे आणि

    (२) दिलेला शब्द न पाळणे ही अप्रामाणिकता आहे.


भगवंत घेतलेली जबाबदारी सोडत नाही. व्यक्तीला जन्म दिल्यानंतर प्रत्येक मानवाचे जीवन चालवण्याची जबाबदारी त्याने उचललेलीच आहे‌. जीव जन्म घेऊन येतो तेव्हा आई मध्ये प्रीती कोणी भरली? बाळाने आईदंओओत प्रेम भरले? नाही; मग या स्त्रीत प्रेम निर्माण झाले तरी कशाप्रकारे? बाळाबद्दलच्या प्रेमामुळे ती बाळाचे मलमूत्र देखील साफ करते.

भगवंताने स्रीत प्रेम भरल्यामुळे स्री आपशुकच बाळाचे सर्व काम करू लागते. भगवंताने स्रीकडून कबूल नाही करून घेतले की तुला बाळ देईन पण त्याचे मलमूत्र तुलाच साफ करावे लागेल.

आपल्याकडूनच आपली कामे कशी करून घ्यावी हे भगवान चांगल्या प्रकारे जाणतो. म्हणून तर सर्वज्ञ आणि समर्थ म्हणून भगवंताचे वर्णन आहे.

बाळ जन्माला आले नव्हते तोपर्यंत स्री मध्ये इतके प्रेम नव्हते. परंतु बाळ जन्माला आले की लगेचच ती स्री माता बनते आणि तिच्यात बाळाबद्दलचे प्रेम दिसून येते. 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन