ब्रम्ह - भगवंताची नित्यता
भगवंताची नित्यता
ब्रह्म आपण कोणी पाहिलेले नाही.
किं नाम ब्रह्म! ब्रह्म म्हणजे काय? त्याचे लक्षण काय? ब्रह्माची व्याख्या आहे उत्पत्ती, स्थिती, लय करणारे ते ब्रह्म. ब्रह्माचे ते तटस्थ लक्षण म्हटले जाते. कारण उत्पत्ती, स्थिती व लय करण्यापूर्वी ब्रम्ह नव्हते? होतेच. नाहीतर मग सृष्टीच्या सोबतच ब्रह्माचा जन्म झाला असे होईल.
जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा आहे तो ईश्वर. पण ही व्याख्या अपुरी आहे. जर उत्पत्ती, स्थिती आणि लय नसेल तर त्यावेळी ते ब्रह्म नव्हते काय? ब्रह्म ईश्वर नसेल तरी पण ब्रह्म ते ब्रह्मच आहे. ब्रह्म हे ईश्वर केला केव्हा होते? सगुण साकार झाल्यानंतर, सृष्टी निर्माण करते तेव्हा ते ईश्वर होते, पण ते ब्रह्मरूप आहेच.
व्यवहारिक दृष्ट्या विचार करायचा असेल तर बाळ जन्माला येते तेव्हा आईचा जन्म होतो. त्याप्रमाणे सृष्टीच्या सृजनकर्त्याचा जन्म सृष्टी बरोबरच झाला असे बोललो तर तो आला कुठून? सृष्टी निर्माण करण्याची शक्ती कोणी दिली? इत्यादी प्रश्न निर्माण होणारच.
गीतेत भगवंत सांगतो : कविं पुराण.... त्यानुसार तो अतिशय जुना आहे. हजारो वर्षाचे आयुष्य मोजले तरीसुद्धा आयुष्याला मर्यादा आलीच नाही काय! म्हणून ब्रह्माचे उत्पत्तीस्थितीलयकारणत्वम् हे तटस्थ लक्षण गणले जाते.
तटस्थ लक्षणाची व्याख्याच अशी आहे की कदाचित् यावर्तक होय. त्याला तटस्थ लक्षण म्हणतात.
ब्रह्माच्या एका लक्षणाने त्याची स्पष्ट कल्पना येणार नाही. मग दुसरे लक्षण म्हणजे स्वरूप लक्षण आहे. जे इतराहून वेगळे असेल पण सत् असेल, कायमचे असेल त्याला स्वरूप लक्षण म्हणतात.
श्यामरावांचा मुलगा कोणता? तर जो नकटा आहे तो! नकटेपणा हा इतरांपेक्षा वेगळा आहे म्हणजे यावर्तक आहे, पण नकटेपणा हे मुलाचे कायमचे लक्षण आहे म्हणून ते स्वरूप लक्षण म्हटले जाते.
अशाप्रकारे ब्रह्माचे तटस्थ लक्षण इतरांपेक्षा वेगळा आहे पण स्थायी नाही. उत्पत्ती, स्थिती, लय ह्या क्रिया आहेत. व्यावहारिक भाषेत सांउउगायचे म्हटले तर तो भगवंताचा व्यवसाय आहे. ब्रह्माचे स्वरूप लक्षण, इतराहून वेगळे आणि तरीही स्थायी असे लक्षण श्रुतीने येथे सांगितले आहे. सत्यं ज्ञानमनन्तम् ब्रह्म आहे.
ब्रम्ह सत्यम् आहे म्हणजे ते त्रिकाला बाधित आहे. सत् म्हणजे सत्ता, अस्तित्व म्हणजे आहेच. कोणताही गुण किंवा धर्म ज्याला पकडून राहिला आहे हे सत्य आहे.
ज्ञानम् म्हणजे ते ज्ञानरूप आहे आणि जे अनन्तम् आहे म्हणजे ज्याला मर्यादा नाही, जे अमर्याद आहे.

Comments
Post a Comment