भगवंत आणि मानव यांच्यात असलेली सख्यभक्ती



 सख्यभक्ती 

आता ईश्वर निराळा नाही, आता ईश्वर सह्यकर्ता राहिला नाही, आता ईश्वर सखा झाला. ह्याला 'सख्यभक्ती' म्हणतात. मी सिनेमा बघतो तेव्हा माझ्यासोबत माझा भगवंत सिनेमा बघतो, कारण तो अंतरातच बसला आहे. 

सर्वस्य चाहं हृदी सन्निविष्ट:| भगवंत माझ्यासोबत जेवतो. माझा हा पिता माझ्यापासून दूर राहू शकत नाही. तुमचा मुलगा जर असेल तर तो तुमचे पान प्रथम मांडेल आणि त्याचे पान नंतर मांडेल. कामकाजामुळे एखाद्या दिवशी मुलाने लवकर जेवून घेतले आणि बाप नंतर जेवला तर समजू शकतो. पण रविवारी तरी बाप- लेक एकत्रच जेवतील.

सर्वसामान्य बाप आणि लेक एकत्र बसून जेवतात. जगदीशाचे पान आकाशात आणि माझे पान इथे हे शक्यच नाही. भगवंत माझ्यासोबत असला पाहिजे. शास्त्रकार सांगतात, सामान्य बाप जेवणाचे पान घेऊन जवळ बसतो, तर जगदीश संपूर्ण जगाचा पिता हा महान, दयाळू, परम कारूणिक बाप तुझ्या पानातच जेवतो. एकाच पानात दोघेच दोघांचे जेवण....

 अहं वैश्वानरो भुत्वा प्राणिनां देहमाश्रित:| प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्न चतुर्विधम्|| (गीता 15/14)

सामान्य बाप मुलाला सोबत घेतल्याशिवाय सिनेमाला एकटा जात नाही. बापाच्या खुर्चीजवळ मुलाची खुर्ची असते‌. पण हा महान बाप काही न्याराचा आहे. इथे मुलाची व बापाची खुर्ची एकच. तुम्हाला माहित आहे का की पाहणे म्हणजे काय? काही माहीत नसतानाही तुम्ही पाहता आहात. तुम्हाला माहित आहे बोलणे म्हणजे काय? तरीही साठ साठ वर्षापासून बोलता आहात . माहित आहे की आतून कोण बोलतो? तेव्हा भगवंत माझ्यातच बसून सर्व करतो आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन